आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

विकसीत भारत संकल्प यात्रा


देशातील 995 ग्रामपंचायतींमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 5,470 आरोग्य शिबिरांचा 7,82,000 पेक्षा जास्त नागरिकांनी घेतला लाभ

शिबिरांमध्ये 9,35,970 पेक्षा जास्त आयुष्मान कार्ड तयार करण्यात आली 1,07,000 पेक्षा जास्त प्रत्यक्ष कार्डचे केले वितरण

शिबिरांमध्ये 1,95,000 पेक्षा जास्त नागरिकांची केली क्षयरोग चाचणी

19,500 पेक्षा जास्त नागरिकांना पाठवण्यात आले पुढील टप्प्यातील सार्वजनिक आरोग्य सुविधासाठी

सिकलसेल आजारासाठी 54,750 पेक्षा जास्त नागरिकांची केली तपासणी

2,930 जणांना पाठवण्यात आले पुढील टप्प्यातील सार्वजनिक आरोग्य सुविधासाठी

उच्च रक्तदाब आणि मधुमेहासाठी सुमारे 5,51,000 नागरिकांची केली तपासणी,48,500 हून अधिक लोकांना पुरविण्यात आल्या पुढील टप्प्यातील सार्वजनिक आरोग्य सुविधा

Posted On: 27 NOV 2023 3:59PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2023

केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ देशभर पोहोचावा यासाठी 15 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील खुंटी, येथून विकसित भारत संकल्प यात्रा सुरू केली. विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत ऑन-स्पॉट (जागेवरच ) सेवेचा एक भाग म्हणून, ग्रामपंचायतींमध्ये आयईसी व्हॅनचा थांबा असलेल्या ठिकाणी आरोग्य शिबिरे आयोजित केली जात आहेत.

या उपक्रमामध्ये 26 नोव्हेंबर 2023 पर्यंत, 995 ग्रामपंचायतींमध्ये 5,470 आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली असून या ठिकाणी 7,82,000 पेक्षा जास्त लोकांनी भेट दिली आहे.

Rupnagar, Punjab

Sundargarh, Odisha

Chamba, Himachal Pradesh

Krishna, Andhra Pradesh

Nashik, Maharashtra

Tinsukia, Asam

आरोग्य शिबिरांमध्ये राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची यादी पुढील प्रमाणे:

आयुष्मान भारत - प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (एबी- पीएमजेएवाय):

विकसित भारत संकल्प यात्रेसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या फ्लॅगशिप (महत्वाकांक्षी) योजनेअंतर्गत आयुष्मान अॅपच्या सहाय्याने आयुष्मान कार्ड बनवली जात आहेत आणि लाभार्थ्यांना प्रत्यक्ष कार्ड वितरीत केली जात आहेत. या शिबिरांमध्ये बाराव्या दिवसाच्या अखेरीपर्यंत 9,35,970 पेक्षा जास्त आयुष्मान कार्ड तयार करण्यात आली आणि 1,07,000 हून अधिक प्रत्यक्ष कार्ड वितरीत करण्यात आली.

क्षयरोग (टीबी):

क्षयरोगाचे रुग्ण ओळखण्यासाठी क्षयरोगाची लक्षणे आणि थुंकीची तपासणी केली जात आहे. यासाठी उपलब्धतेनुसार NAAT मशीनच्या सहाय्याने तपासणी केली जात आहे. क्षयरोगाच्या संशयित रुग्णांना पुढील टप्प्यासाठी योग्य ठिकाणी पाठवले जात आहे. शिबिरांच्या बाराव्या दिवसाच्या अखेरीपर्यंत, 1,95,000 पेक्षा जास्त नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 19,500 हून अधिक लोकांना पुढील टप्प्यातील सार्वजनिक आरोग्य सुविधांसाठी  पाठवण्यात आले आहे.

प्रधानमंत्री क्षय मुक्त भारत अभियान (पीएमटीबीएमए) अंतर्गत, क्षय रुग्णांना नि:क्षय मित्रांकडून मदत मिळण्यासाठी त्यांची संमती घेतली जाते. नि:क्षय मित्र होऊ इच्छिणाऱ्यांची  उपस्थित असताना त्याच ठिकाणी नोंदणी देखील केली जाते. पीएमटीबीएमबीए अंतर्गत बाराव्या दिवसाच्या अखेरीपर्यंत एकूण  11,500 हून अधिक क्षयरुग्णांनी संमती दिली आणि 5,500 हून अधिक नवीन नि:क्षय मित्रांची नोंदणी झाली.

नि:क्षय पोषण योजनेअंतर्गत क्षयरोग रुग्णांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे आर्थिक मदत दिली जाते. यासाठी प्रलंबित  लाभार्थींच्या बँक खात्याचा तपशील गोळा करण्यात येत असून त्यांची खाती आधारकार्डांशी जोडण्यात येत  आहेत. बाराव्या दिवसाच्या अखेरपर्यंत अशा 3,371 लाभार्थ्यांचा तपशील संकलित करण्यात आला आहे.

सिकल सेल रोग: आदिवासी बहुल लोकसंख्या असलेल्या भागात, सिकल सेल रोगासाठी पॉइंट ऑफ केअर चाचण्यांद्वारे किंवा विद्राव्यता चाचणीद्वारे सिकल सेल रोगाचे रुग्ण शोधून काढण्यासाठी  संभाव्य लोकसंख्येची (40 वर्षांपर्यंत) तपासणी केली जात आहे.लागण झालेल्या रुग्णांना पुढील उपचारांसाठी  मोठ्या रुग्णालयांत  पाठवले जात आहे. बाराव्या दिवसाच्या अखेरपर्यंत, 54,750 हून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 2,930 लोक पॉझिटिव्ह आढळले आणि त्यांना मोठ्या रुग्णालयांतील सार्वजनिक आरोग्य सुविधांकडे  पाठवण्यात आले.

अ-संसर्गजन्य रोग (NCDs): उच्च रक्तदाब आणि मधुमेहासाठी संभाव्य लोकसंख्येची (30 वर्षे आणि त्यावरील) तपासणी केली जात आहे आणि मोठ्या रुग्णालयांतील सार्वजनिक आरोग्य सुविधांकडे  पाठवण्यात  येत आहेत. बाराव्या दिवसाच्या अखेरीस, सुमारे 5,51,000 लोकांची उच्च रक्तदाब आणि मधुमेहासंदर्भात तपासणी करण्यात आली. 31,000 हून अधिक लोक उच्च रक्तदाबाचे संशयित रुग्ण असून 24,000 हून अधिक लोक मधुमेहाचे संशयित आहेत  आणि 48,500 हून अधिक लोकांना उच्च सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये  पुढील उपचारासाठी पाठविण्यात  आले आहे.

 

N.Chitale/Rajashree/Sampada/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1980152) Visitor Counter : 163