महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सक्षम अंगणवाडी अभियान आणि पोषण 2.0 च्या पोषण भी पढाई भी कार्यक्रमाअंतर्गत महिला आणि बाल विकास मंत्रालय दिव्यांग बालकांसाठी अंगणवाडी प्रोटोकॉल जारी करण्यासाठी एका राष्ट्रव्यापी मोहिमेचे आयोजन करणार

Posted On: 27 NOV 2023 2:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2023

सक्षम अंगणवाडी अभियान आणि पोषण 2.0 अंतर्गत पोषण भी पढाई भी कार्यक्रमाचा एक महत्वपूर्ण भाग म्हणून महिला आणि बाल विकास मंत्रालय दिव्यांग बालकांसाठी अंगणवाडी प्रोटोकॉल जारी करण्यासाठी एका राष्ट्रव्यापी मोहिमेचे आयोजन करणार आहे. केंद्रीय महिला आणि  बाल विकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती झुबिन इराणी, यांच्या अध्यक्षतेखाली उद्या (28 नोव्हेंबर 2023) विज्ञान भवन येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती झुबिन इराणी यांचे प्रमुख भाषण होईल. तसेच महिला आणि  बाल विकास  आणि आयुष राज्यमंत्री  मुंजपारा महेंद्रभाई, देखील या संमेलनाला संबोधित करणार आहेत.

अंगणवाडी केंद्रांची लवकर निवड , तपासणी आणि समावेश करण्याची धोरणे पॅनल चर्चा अधोरेखित करेल. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, दिव्यांग  सक्षमीकरण विभाग आणि राज्यांमधील महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे सचिव तसेच  राष्ट्रीय मानसिक स्वास्थ्य आणि न्यूरो विज्ञान संस्थेसारख्या प्रमुख संस्थांमधील तज्ञ या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. देशभरातील बालविकास प्रकल्प अधिकारी, महिला  पर्यवेक्षक, अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्याही यात सहभागी होतील. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिव्यांग बालकांसाठी काम करण्याचा आणि त्यांची काळजी घेण्याचा अनुभव असल्यामुळे त्यांचे अनुभव आणि उत्कृष्ट पद्धतींबाबत माहिती देण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. बालकांकरता शीघ्र हस्तक्षेप केंद्र, नवजात बालकांसाठी आणि आरोग्याच्या दृष्टीने धोका असलेल्या किंवा दिव्यांग बालकांसाठी तसेच मंदगतीने वाढ होणाऱ्या बालकांसाठी विशेष समर्थन आणि आवश्यक  सेवांद्वारे मुलांच्या कल्याणामध्ये एकूण सुधारणा आवश्यक आणि शक्य आहे हे अधोरेखित करणे हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. दिव्यांग बालकांचा  कौटुंबिक आणि सामुदायिक जीवनातील सहभाग अधिकाधिक वाढावा यासाठी कुटुंबांना आणि समुदायांना शिक्षित करणे आणि पाठिंबा देणे आवश्यक आहे.

S.Kane/B.Sontakke/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1980135) Visitor Counter : 117