पंतप्रधान कार्यालय
आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात पंतप्रधानांनी केली प्रार्थना
Posted On:
27 NOV 2023 11:35AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात जाऊन प्रार्थना केली. त्यांनी 140 कोटी भारतीयांच्या उत्तम आरोग्य, कल्याण आणि समृद्धीसाठी भगवान व्यंकटेश्वर स्वामींचे आशीर्वादही मागितले आहेत. मोदींनी तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरातील क्षणचित्रे सामायिक केली आहे.
पंतप्रधानांनी आपल्या X पोस्टवर म्हटले आहे;
"तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात, 140 कोटी भारतीयांच्या उत्तम आरोग्य, कल्याण आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली."
पंतप्रधानांनी येथील आणखी काही झलक सामायिक केली.
त्यांनी पोस्ट केले:
“ओम नमो व्यंकटेश: !
तिरुमलाची आणखी काही क्षणचित्रे .”
S.Kane/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1980100)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam