रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

प्रसारमाध्यमांसाठी ताजी माहिती (21/11/2023)


सिलक्यारा बोगदा कोसळलेल्या ठिकाणी बचावकार्याने घेतला वेग

Posted On: 21 NOV 2023 7:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2023

मानवी जीव वाचवण्याप्रती अढळ कटिबद्धता दर्शवत केंद्र सरकारने उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगदा कोसळून 41 कामगार अडकलेल्या ठिकाणचे बचावकार्य अधिक वेगवान केले आहे.

बचावकार्य करणाऱ्यांनी सदर बोगद्याचे काँक्रीट काम पूर्ण झालेल्या आणि अडकलेल्या कामगार सुखरूप राहतील, याची खात्री देणाऱ्या 2 किलोमीटरच्या भागावर लक्ष केंद्रित केले आहे. बोगद्याच्या या सुरक्षित भागात वीज तसेच पाणी यांचा पुरवठा सुरु असून 4 इंचाच्या समर्पित कॉम्प्रेसर पाईपलाईन मधून या कामगारांना अन्न तसेच औषधपुरवठा करण्यात येत आहे.

विविध सरकारी संस्थांना या ठिकाणी सुरु असलेल्या कार्यासाठी जागरुक करण्यात आले असून कामगारांची सुरक्षितपणे सुटका करण्याच्या उद्देशाने या संस्थांना विशिष्ट कार्ये नेमून देण्यात आली आहेत. अडकलेल्या कामगारांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी सरकार त्यांच्याशी सतत संपर्क करत आहे.

बचावकार्याबाबतची महत्त्वाची ताजी माहिती:

1.एनएचआयडीसीएल लाइफलाईनतर्फे केले जाणारे प्रयत्न:

  • या बचावकार्यात कालचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला कारण कालच्या दिवशी अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याच्या उद्देशाने एनएचआयडीसीएलने बोगद्याच्या ठिकाणी 6 इंच व्यासाची एक अतिरिक्त जीवनवाहिनी खोदली. अन्न पुरवठा करणारी दुसरी जीवनवाहिनी संपूर्ण क्षमतेने काम करत असून अडकलेल्या कामगारांना भरपूर अन्नपुरवठा होईल हे सुनिश्चित करत आहे.
  • अडकलेल्या कामगार पथकाशी व्हिडीओ संपर्क स्थापन करण्यात आला असून कॉम्प्रेस्ड हवा आणि पाण्याच्या दबावाचा वापर करून पाईपलाईनमधील मलबा स्वच्छ करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

2.एनएचआयडीसीएलतर्फे करण्यात आलेले क्षितीजसमांतर खोदकाम:

  • कामगारांची सुटका करण्यासाठी एनएचआयडीसीएलने ऑगर बोरींग मशिनच्या मदतीने सिलक्याराच्या बाजूकडून क्षितीजसमांतर खोदकामाची सुरुवात केली आहे. 
  • बोरींगचा व्यास वाढवण्यासाठी तसेच पाईपलाईनच्या वेल्डिंगसाठी ड्रिलिंग मशीनसाठी संरक्षक छताच्या उभारणीचे काम सुरु आहे.

3.कामगारांच्या सुटकेसाठी एसजेव्हीएनएलतर्फे उभ्या पद्धतीचे ड्रिलिंग:

  • उभ्या पद्धतीचे ड्रिलिंग करण्यासाठी एसजेव्हीएनएलचे मशीन अपघातस्थळी आले असून या मशीनची उभारणी सुरु आहे.या कारणासाठी गुजरात तसेच ओदिशा येथून ड्रिलिंग मशीन्स मागवण्यात आली आहेत.

4. टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉरपोरेशन द्वारे(THDCL) बारकोटच्या बाजूला आडव्या रितीने ड्रिलिंग:

  • THDC ने बारकोट टोकापासून बचाव बोगद्याचे बांधकाम सुरू केले आहे, त्यासाठी दोनवेळा आधीच स्फोट घडवून आणले आहेत, परिणामी तो आता 6.4-मीटर इतका रूंद झाला आहे. दिवसाला तीन स्फोट करून हे‌ काम पूर्ण करण्याची योजना आखली आहे.

5. रेल्वे विकास निगम लिमिटेड (RVNL) द्वारे काटकोनी-आडव्या रीतीने ड्रिलिंग:

  • आरव्हीएनएल (RVNL) मजुरांना वाचवण्यासाठी आडव्या दिशेने ड्रिलिंग करून लहान बोगदा तयार करण्यासाठी यंत्रसामग्रीची वाहतूक करत आहे. यासाठी ओडिशातून अतिरिक्त बॅकअप मशीन्स आणल्या जात आहेत.

6.तेल‌ आणि नैसर्गिक वायु मंडळाद्वारे‌(ओएनजीसी) बारकोटच्या दिशेने उभ्या रीतीने ड्रिलिंग:

  • तेल‌ नैसर्गिक वायु मंडळ (ओएनजीसी) उभ्या रीतीने ड्रिलिंग करण्यासाठी यूएसए, मुंबई आणि गाझियाबाद येथून यंत्रसामग्री मागवून घेत आहे.

7.टीएचडीएल (THDCL)/आर्मी/कोल इंडिया आणि एनएचआयडीसीएल (NHIDCL) यांच्याकडून संयुक्तपणे प्रत्यक्ष हाताने-अर्ध यांत्रिक पद्धतीने (मॅन्युअल -सेमी मेकनाईझ्ड) ड्रिफ्ट टनेल बनविणे:

  • 180 मीटर ते 150 मीटरपर्यंत सुरक्षित चॅनेल स्थापित करून बोगद्याच्या आत एक प्रवाह निर्माण करण्याचे काम सुरू आहे. यासाठी लष्कराकडून बॉक्स कल्व्हर्ट्स  मागवून आणले जात आहे.

8.सीमा सुरक्षा दलाद्वारे (BRO) रस्ता कापणे आणि सहाय्यक कामे:

  • सीमा सुरक्षा दलाने 48 तासांच्या आत एसजीव्हीएनएल (SJVNL) द्वारे उभ्या ड्रिलिंगसाठी आत जाण्यासाठी योग्य एक मार्ग बनवला आहे. ओएनजीसी कडून भूगर्भीय सर्वेक्षण करून योग्य मार्ग बनवण्याचे  काम  ओएनजीसी करत आहे.

पार्श्वभूमी:

  • दि. 12.11.2023 रोजी, सिल्क्यारा ते बारकोटपर्यंत बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यामध्ये सिल्क्याराच्या बाजूला 60 मीटरचा भाग कोसळला. या घटनेनंतर, राज्य आणि केंद्र  सरकारने या अपघातामध्‍ये  अडकलेल्या 41 मजुरांच्या सुटकेसाठी तातडीने प्रयत्न सुरू केले आणि आवश्‍यक ती सामुग्री जमा केली.
  • तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हा सर्वोत्तम आणि जलद शक्य उपाय तोडगा काढण्‍यात आला. त्यानुसार कोसळलेल्या भागाच्या राडा –रोडाचिखल, यातून  900 मिमी व्यासाची नळी  टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • तथापि, 17.11.2023 रोजी, जमिनीअंतर्गत होणा-या  हालचालीमुळे संरचना सुरक्षित केल्याशिवाय हा पर्याय वापरणे  असुरक्षित झाले. आतमध्‍ये अडकलेल्या  माणसांचा  विचार करून, त्या कामगारांची लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी सर्व शक्य आघाड्यांवर एकत्रितपणे वाटचाल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • यासाठी पाच पर्याय निश्चित करण्‍यात आले आणि या  पर्यायांवर काम करण्‍यासाठी  पाच वेगवेगळ्या एजन्सींवर जबाबदारी सोपवण्‍यात आली.
  • यासाठी , ‘एनएचआयडीसीएल’ च्या वतीने अन्नासाठी आणखी 6 इंची पाइपलाइन तयार करत आहे. तसेच  60 मीटरपैकी 39 मीटर ड्रिलिंग पूर्ण झाले आहे. हा बोगदा तयार झाल्यावर त्यातून अधिक खाद्यपदार्थ पोहोचवणे   सुलभ होईल.
  • बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच सीमा रस्ते संघटनेने अवघ्या एका दिवसात जोड मार्ग बांधण्याचे काम पूर्ण केल्यानंतर, आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी ‘आरव्‍हीएनएल’ च्या वतीने  दुसर्‍या एका  पाइपलाइनवर काम करत आहे.
  • ‘एनएचआयडीसीएल’ काम करीत असलेल्या   सुरक्षा व्यवस्थेनंतर सिल्क्यारा च्या बाजूने ड्रिल करणे सुरू ठेवणार आहे.
  • सतलज जल विद्युत निगम लिमिटेड (एसजेव्‍हीएनएल) अडकलेल्या मजुरांची सुटका करण्यासाठी उभ्या पद्धतीने  ड्रिलिंगचे काम करीत आहे.
  • ओएनजीसीला खोल ड्रिलिंगमध्ये प्राविण्य आहे, त्यामुळे बारकोटच्या टोकापासून उभ्या ड्रिलिंगसाठी सुरुवातीचे कामही सुरू केले आहे.  

 

R.Aghor/S.Chitnis/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1978610) Visitor Counter : 106