पंतप्रधान कार्यालय
‘मीराबाई जन्मोत्सवा’त सहभागी होण्यासाठी पंतप्रधान 23 नोव्हेंबर रोजी मथुरेला जाणार
संत मीराबाई यांच्या 525 व्या जयंतीनिमित्त ‘मीराबाई जन्मोत्सवा’चे आयोजन
Posted On:
21 NOV 2023 6:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2023
संत मीराबाई यांच्या 525 व्या जयंतीनिमित्त उत्तर प्रदेशात मथुरा येथे आयोजित ‘मीराबाई जन्मोत्सवा’मध्ये सहभागी होण्यासाठी येत्या 23 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी मथुरेला भेट देणार आहेत. संत मीराबाई यांच्या सन्मानार्थ यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते स्मारक टपाल तिकीट तसेच नाणे देखील जारी करण्यात येईल. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. संत मीराबाई यांच्या स्मरणार्थ पुढील वर्षभर साजऱ्या करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची सुरुवात देखील सदर कार्यक्रमाने होईल.
संत मीराबाई भगवान कृष्णांच्या प्रती असलेल्या समर्पणभावासाठी ओळखल्या जातात. त्यांनी अनेकानेक भजने आणि ओव्या रचल्या ज्या आजही लोकप्रिय आहेत.
R.Aghor/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1978581)
Visitor Counter : 146
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam