मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
जागतिक मत्स्यव्यवसाय दिनानिमित्त मत्स्यव्यवसाय विभाग, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय तर्फे 21 आणि 22 नोव्हेंबर 2023 रोजी अहमदाबाद येथे जागतिक मत्स्य व्यवसाय परिषद,भारत:2023 चे आयोजन
Posted On:
16 NOV 2023 8:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2023
मच्छीमार आणि मत्स्यपालक आणि इतर भागधारकांचे योगदान अधोरेखित करण्यासाठी आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या शाश्वत व समान विकासासाठीच्या वचनबद्धतेला बळकटी देण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग, जागतिक मत्स्यव्यवसाय दिनानिमित्त जागतिक मत्स्यव्यवसाय परिषद,भारत: 2023 चे आयोजन करून जागतिक मत्स्य व्यवसाय दिवस साजरा करत आहे. ही दोन दिवसांची 21 आणि 22 नोव्हेंबर 2023 रोजी अहमदाबादमधील गुजरात सायन्स सिटी येथे होणार असून 'सेलिब्रेट द फिशरीज अँड एक्वाकल्चर वेल्थ' या संकल्पने वर ती आधारित असेल. केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री परशोत्तम रुपाला यांनी आज नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पत्रकार परिषदेत मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री डॉ. एल. मुरुगन उपस्थित होते.
या परिषदेसाठी परदेशी प्रतिनिधीमंडळे, तज्ज्ञ , शासकीय अधिकारी, अभ्यासक, शैक्षणिक संस्था, आंतरराष्ट्रीय संस्था, उद्योग संघटना आणि इतर प्रमुख भागधारकांना आमंत्रित केले असल्याचे रुपाला यांनी सांगितले.
डॉ.एल मुरुगन यांनी सांगितले की मंत्रालय या क्षेत्राच्या शाश्वत वाढीवर लक्ष केंद्रित करत आहे. जागतिक मत्स्यव्यवसाय परिषद,भारत: 2023 द्वारे मच्छीमार, शेतकरी, उद्योग, किनारी समुदाय, निर्यातदार, संशोधन संस्था, गुंतवणूकदार, प्रदर्शक यासारख्या सर्व भागधारकांना एकत्रित येऊन कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी, संबंधित तंत्रज्ञानावरील माहिती आणि बाजारपेठेशी जोडले जाण्याच्या संधींसाठी एक व्यासपीठ मिळेल, असे त्यांनी सांगितले.
S.Kakade/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1977502)
Visitor Counter : 413