ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
खुला बाजार विक्री योजना (देशांतर्गत ) एकविसाव्या ई-लिलावाच्या फेरीत 2334 बोलीदारांनी 2.84लाख मेट्रिक टन गहू आणि 5830 मेट्रिक टन तांदूळ केले खरेदी
Posted On:
16 NOV 2023 8:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2023
भारत सरकारच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून, तांदूळ, गहू आणि पीठाच्या किरकोळ किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून बाजारात हस्तक्षेप करून,गहू आणि तांदूळ या दोन्हींचे साप्ताहिक ई लिलाव आयोजित केले जात असतात. खुला बाजार विक्री योजना (देशांतर्गत) 21व्या ई-लिलाव फेरीत 15.11.2023 रोजी 3 लाख मेट्रिक टन गहू आणि 1.79 लाख मेट्रिक टन तांदूळ लिलावासाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी 2.84 लाख मेट्रिक टन गहू आणि 5830 मेट्रिक टन तांदूळ 2334 बोली लावणाऱ्यांना विकण्यात आले.
याव्यतिरिक्त, 2.5 एलएमटी गहू केंद्रीय भांडार /भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ,NCCF/नाफेड सारख्या निम-शासकीय आणि सहकारी संस्थांना खुल्या बाजार विक्री योजनेत (देशांतर्गत) गव्हाचे पिठात रूपांतर करण्यासाठी देण्यात आला आहे. हे पीठ 'भारत आटा' या ब्रँड अंतर्गत किरकोळ विक्रीसाठी 27.50/किलो
रुपयांहून जास्त किंमत न घेता विक्रीसाठी उपलब्ध करता येईल .14.11.23 पर्यंत 15337 मेट्रिक टन गहू या तीन सहकारी संस्थांकडून पीठात रुपांतरित करण्यासाठी उचलण्यात आला आहे.
व्यापार्यांना खुला बाजार विक्री योजना (देशांतर्गत ) गहू विक्रीच्या लिलावांपासून दूर ठेवण्यात आले आहे.साठेबाजी टाळण्यासाठी 14.11.23 पर्यंत देशभरात 1917 ठिकाणी पूर्वसूचना न देता तपासण्या करण्यात आल्या आहेत.
S.Kakade/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1977496)