राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

तिसऱ्या लेखापरीक्षण दिवस समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले संबोधित

प्रविष्टि तिथि: 16 NOV 2023 5:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2023

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (16 नोव्हेंबर, 2023) नवी दिल्ली येथे तिसऱ्या लेखापरीक्षण दिवस समारंभाला उपस्थित राहून संबोधित केले.

भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्या नेतृत्वाखाली, सरकारच्या लेखापरीक्षण कार्यदलाने एकसंधता, प्रशासन आणि व्यवस्था  उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

राष्ट्रपती म्हणाल्या की, भारतातील लोकांना  2047 पर्यंत विकसित भारत बनवण्याच्या दिशेने वेगाने आगेकूच करायची आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्यासह देशातील सर्व महत्त्वाच्या संस्था आणि समुदायांना योगदान द्यावे लागेल.

भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यात संपूर्ण नियंत्रक आणि महालेखा परीक्षक  पथकाची महत्त्वाची भूमिका असेल,असेही राष्ट्रपतींनी नमूद केले.

राष्ट्रपती म्हणाल्या की, जागतिक स्पर्धेच्या काळातील आजच्या बाजार व्यवस्थेचा प्रभाव सर्व संस्था आणि उद्योगांवर  पडणे, लक्षात घेऊन  नैतिकतेच्या आधारावर स्पर्धा करण्याची क्षमता देशातील सर्व उद्योग आणि उपक्रमांमध्ये सतत वाढली पाहिजे, असे राष्ट्रपतींनी अधोरेखित केले.  गतिमान  वाढ आणि विकासाची राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्यामधील अडथळे दूर करणे आणि आर्थिक योग्यता आणि कायदेशीरपणा सुनिश्चित करणे हा नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांसह सुशासनासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक संस्था आणि व्यक्तीच्या प्रभावी योगदानाचा परिपाक आहे. लेखापरीक्षकांना टीकाकार  नव्हे तर सुशासनाचे सूत्रधार मानले पाहिजे असेही राष्ट्रपतींनी आवर्जून सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, आपण लेखापरीक्षकांना मार्गदर्शक मानले पाहिजे कारण त्यांचे तपासाचे कार्यच आपल्याला योग्य मार्गावर चालण्यास शिकवते.

जागतिक समुदायात भारताचे अग्रगण्य स्थान लेखापरीक्षणाच्या क्षेत्रातही दिसून येत असल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले.

 

 

S.Kakade/V.Yadav/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1977422) आगंतुक पटल : 160
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , Tamil , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Punjabi , Odia