ग्रामीण विकास मंत्रालय
विकसित भारत संकल्प यात्रेच्या पहिल्या टप्प्यात आदिवासी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना अभिनंदनपत्रांचे वितरण
Posted On:
15 NOV 2023 9:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर 2023
डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम (DILRMP), अर्थात डिजिटल भारत भू अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम ही एक केंद्रीय क्षेत्र योजना असून ती भू-साधनसंपत्ती विभागा (DoLR) च्या माध्यमातून, भारत सरकारच्या 100% निधीसह राबवण्यात येत आहे. डीआयएलआरएमपी चे उद्दिष्ट आधुनिक, सर्वसमावेशक आणि पारदर्शक जमीन अभिलेख व्यवस्थापन प्रणाली विकसित करणे, हे आहे.
भारत सरकार 15 नोव्हेंबर 2023 पासून 26 जानेवारी 2024 पर्यंत विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करत आहे. योजना प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तळागाळापर्यंत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांद्वारे जनजागृती करणे, हे या संकल्प यात्रेचे उद्दिष्ट आहे.
विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत भू-साधनसंपत्ती विभागाने गावागावांतून आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमानुसार, पात्र गावांना अभिनंदन पत्र/प्रमाणपत्र वितरण आणि भूमी अभिलेखांच्या डिजिटलीकरणाचे 99 % किंवा त्याहून जास्त उद्दीष्ट साध्य केल्याबद्दल, पटवारी/लेखपाल/मंडल अशा ग्रामपंचायत/ग्रामस्तरीय पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्याची योजना आखली आहे. सुरुवातीला, 103 जिल्ह्यांचा समावेश असलेल्या 11 राज्यांना, भू साधनसंपत्ती विभागाच्या सचिवांद्वारे(DOLR), सत्कारासाठी वितरित करण्याकरता मंजूर प्रमाणपत्राची डिजिटल आवृत्ती पाठवण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात, विकसित भारत संकल्प यात्रेच्या अनुषंगाने विविध उपक्रम आणि अभिनंदन पत्र वितरण अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
Abhinandan Patra distribution in Waghai Village, District Dang of Gujarat
Awareness Camp at Jirania Block of district West Tripura
S.Kakade/A.Save/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1977251)
Visitor Counter : 164