पंतप्रधान कार्यालय
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 वे शतक झळकावल्याबद्दल विराट कोहलीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक
Posted On:
15 NOV 2023 9:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर 2023
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतके झळकावणारा पहिला क्रिकेटपटू बनल्याबद्दल विराट कोहली याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“आज, विराट कोहलीने आपले 50 वे एकदिवसीय शतक झळकावण्यासोबत उत्कृष्टता आणि चिकाटीच्या भावनेचेदेखील उदाहरण प्रस्थापित केले आहे, जे सर्वोत्तम खेळभावनेचे प्रतीक आहे.
त्याने गाठलेला हा उल्लेखनीय टप्पा त्याच्या अतुट समर्पणाचा आणि अतुलनीय प्रतिभेचा पुरावा आहे.
मी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. भावी पिढ्यांसाठी तो सदैव नवनवीन आदर्श प्रस्थापित करत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो.”
S.Kakade/V.Yadav/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1977237)
Visitor Counter : 133
Read this release in:
Kannada
,
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam