पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ब्राझिलच्या अध्यक्षांनी साधला दूरध्वनीवरून संपर्क
पश्चिम आशियामधील परिस्थितीबाबत दोन्ही नेत्यांनी केली चर्चा
दहशतवाद, हिंसाचार आणि नागरिकांच्या जीवित हानीबाबत दोघांनी सामाईक केल्या परस्परांच्या चिंता आणि एकत्रित प्रयत्नांचे केले आवाहन
ब्राझिलच्या जी20 अध्यक्षतेला भारताचा संपूर्ण पाठिंबा असल्याची पंतप्रधानांची ग्वाही
सर्व क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्याचा आणखी विस्तार करण्याच्या उपाययोजनांवर दोन्ही नेत्यांनी केली चर्चा
प्रविष्टि तिथि:
10 NOV 2023 8:39PM by PIB Mumbai
ब्राझिलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.
दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियामध्ये सध्या सुरू असलेल्या घडामोडींबाबत परस्परांच्या चिंता सामाईक केल्या.
दहशतवाद, हिंसाचार आणि नागरिकांच्या जीवित हानीबाबत दोघांनी तीव्र चिंता व्यक्त केली आणि या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
पंतप्रधानांनी ब्राझिलच्या जी20 अध्यक्षतेच्या यशस्वितेसाठी भारताचा संपूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही दिली. यावेळी त्यांनी नवी दिल्लीत जी20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या भेटीनंतर सर्व क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्याचा आणखी जास्त विस्तार करण्याच्या उपायांवर देखील चर्चा केली.
***
S.Kane/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1976297)
आगंतुक पटल : 135
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam