पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी नागरिकांना 'व्होकल फाॅर लोकल' होण्याचे केले आवाहन
Posted On:
08 NOV 2023 1:49PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेला डिजिटल माध्यमांचा वापर करत स्थानिक प्रतिभावान उत्पादकांच्या वस्तूंची खरेदी करून भारताच्या उद्योगशीलता आणि सर्जनशीलतेला समर्थन देण्याचे आवाहन केले आहे.
नागरीकांनी वस्तू किंवा त्याच्या निर्मात्यासोबत सेल्फी काढून नमो ॲपवर पोस्ट करु शकतील त्यासाठी एक लिंक देखील पंतप्रधानांनी सामायिक केली आहे.
पंतप्रधानांनी आपल्या X वर पोस्टवर म्हटले आहे :
"नमो ॲपवरील थ्रेड्ससाठी व्होकल फाॅर लोकल होऊन भारताची उद्योगशीलता आणि सर्जनशीलता याचा गौरव करत ही दिवाळी साजरी करू या!
स्थानिक पातळीवर तयार केलेली उत्पादने खरेदी करा आणि नंतर नमो ॲपवर उत्पादन किंवा निर्मात्यासोबत सेल्फी पोस्ट करा. या थ्रेडवर सामील होण्यासाठी तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना आमंत्रित करा आणि सकारात्मकतेची भावना पसरवा.
स्थानिक प्रतिभावंतांच्या उत्पादनांना पाठिंबा देण्यासाठी, भारतीय बंधुभगिनींच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आपल्या परंपरा जोपासण्यासाठी डिजिटल मीडियाच्या सामर्थ्याचा वापर करूया."
***
N.Meshram/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1975600)
Visitor Counter : 148
Read this release in:
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam