कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

निवृत्तीवेतन आणि निवृत्तिवेतनधारक कल्याण विभागाद्वारे 1 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत देशव्यापी डिजिटल हयात दाखला अभियान 2.0 सुरू


भारतातील सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 100 शहरांमध्ये 500 ठिकाणी देशव्यापी डिजिटल हयात दाखला अभियान 2.0 चे आयोजन

Posted On: 03 NOV 2023 12:29PM by PIB Mumbai

 

केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांची जीवनसुलभतावाढवण्यासाठी, निवृत्तीवेतन आणि निवृत्तिवेतनधारक कल्याण विभाग डिजिटल हयात दाखला (डीएलसी) यासाठी प्रोत्साहन देत आहे.  2014 मध्ये, बायोमेट्रिक उपकरणांचा वापर करून डीएलसी सादर करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर, विभागाने आधारडेटाबेसवर आधारित फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान प्रणाली विकसित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणासोबत काम केले, ज्याद्वारे कोणत्याही अँड्रॉइड आधारित स्मार्ट फोनवरून हयातीचा दाखला सादर करणे शक्य होईल.

50 लाख निवृत्तिवेतनधारकांचे उद्दिष्ट ठेवून 17 निवृत्तीवेतन वितरण बँका, मंत्रालये/विभाग, पेन्शनर्स वेलफेअर असोसिएशन, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या सहकार्याने 1 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत देशभरातील 100 शहरांमधील 500 ठिकाणी राष्ट्रव्यापी मोहीम आयोजित करण्यात आली आहे.

***

N.Chitale/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1974500) Visitor Counter : 71