आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागातील विशेष मोहीम 3.0 अंतर्गत गाठलेली उद्दिष्टे
या मोहिमेच्या माध्यमातून 22,454 प्रत्यक्ष फायलींचे पुनरावलोकन करण्यात आले, 8,621 प्रत्यक्ष फायली निकाली काढल्या, 3,260 सार्वजनिक तक्रारींवर तोडगा शोधण्यात यश, 1787 ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली, या मोहिमेमुळे 35,268 चौरस फूट जागा मोकळी, तसेच यावेळी निघालेल्या भंगार साहित्याच्या विक्रीतून 13,70,211 रुपये उत्पन्न प्राप्त
Posted On:
01 NOV 2023 4:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर 2023
स्वच्छता आणि प्रलंबित बाबींच्या निपटारा करण्याच्या हेतूने आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागात (DoHFW) विशेष मोहीम 3.0 राबवण्यात आली. यावेळी विभागाच्या मुख्य कार्यालयासह सर्व संलग्न आणि अधीनस्थ कार्यालये, स्वायत्त संस्था आणि देशाच्या विविध भागांमध्ये असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या केंद्रीय आस्थापना (CPSE) इत्यादी ठिकाणी ही विशेष मोहीम राबवण्यात आली. कामकाजातील प्रलंबित्व कमी करणे, संस्थात्मक स्वच्छता, कार्यालयातील अंतर्गत देखरेख यंत्रणा मजबूत करणे, अभिलेख व्यवस्थापन करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे, अभिलेख व्यवस्थापन सुधारण्यासाठी प्रत्यक्ष अभिलेखांचे डिजीटलीकरण करणे ही या मोहिमेची उद्दिष्टे होती. या मोहिमेदरम्यान,आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांवर आणि या क्षेत्रीय कार्यालयांनी मोहिमेअंतर्गत हाती घेतलेल्या विविध उपक्रमांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.
या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे सचिव सुधांश पंत, संयुक्त सचिव एलंगबम रॉबर्ट सिंग आणि विशेष मोहीम 3.0 चे नोडल अधिकारी यांनी झालेल्या कार्याचा नियमित आढावा घेतला.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने या मोहिमेच्या अंमलबजावणीतल्या प्रत्येक टप्प्याची प्रगती प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाच्या (DARPG) स्पेशल कॅम्पेन फॉर डिस्पोजल पेंडिंग मॅटर्स (SCDPM) या पोर्टलवर (https://scdpm.nic.in) नियमितपणे नोंदवली गेली.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने या विशेष मोहीम 3.0 (01.10.2023-31.10.2023) कालावधी दरम्यान, खासदारांचे 224 संदर्भ आणि 3,260 सार्वजनिक तक्रारींचा निपटारा केला. 22,454 प्रत्यक्ष फायलींचे पुनरावलोकन करण्यात आले आणि 8,621 फायली निकाली काढल्या गेल्या. तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या विविध कार्यालयांद्वारे 1,787 ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली, ज्याच्या माध्यमातून कार्यालयांच्या वापरासाठी 35,268 चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेतून अनावश्यक असलेले भंगार साहित्य विकून विभागाने 13,70,211/- रुपयांचा महसूल देखील प्राप्त केला.
* * *
R.Aghor/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1973823)
Visitor Counter : 81