ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

देशांतर्गत उपलब्धता कायम राखण्यासाठी सरकारने कांद्याच्या निर्यातीसाठी प्रति मेट्रिक टन  800 अमेरिकी डॉलर्स इतका किमान निर्यात दर केला अधिसूचित


सरकार आधीच खरेदी केलेल्या 5 लाख टन कांद्याव्यतिरिक्त साठवणुकीसाठी आणखी 2 लाख टन कांदा खरेदी करणार

कांद्याचे दर स्थिर ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना रास्त भाव मिळावा यासाठी साठ्यामधून कांद्याची सतत खरेदी आणि वितरण सुरु

Posted On: 28 OCT 2023 7:03PM by PIB Mumbai

 

सरकारने कांद्याच्या निर्यातीसाठी प्रति मेट्रिक टन  800 अमेरिकी डॉलर्स इतका किमान निर्यात दर अधिसूचित केला आहे. FOB च्या आधारावर 29 ऑक्टोबर 2023 पासून 31 डिसेंबर 2023 या अवधीसाठी हा दर अधिसूचित करण्यात आला आहे. रब्बी हंगामात कांद्याचा साठा कमी होत असल्यामुळे कांदा निर्यातीला आळा घालून ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत देशांतर्गत कांद्याची उपलब्धता पुरेशी राखण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. प्रति मेट्रिक टन 800 अमेरिकी डॉलर्स हा किमान निर्यात दर म्हणजे सुमारे 67 रुपये प्रति किलो होतात.

कांदा निर्यातीवर किमान निर्यात दर आकारण्याच्या निर्णयासोबतच, सरकारने आधीच खरेदी केलेल्या 5 लाख टनांच्या व्यतिरिक्त 2 लाख टन कांदा साठवणुकीसाठी खरेदी करण्याची घोषणा केली आहे. देशभरातील प्रमुख ग्राहक केंद्रांमध्ये ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून साठवणुकीतील हा कांदा खुल्या बाजारात आणला जात आहे आणि एनसीसीएफ तसेच नाफेड मार्फत मोबाईल व्हॅनद्वारे किरकोळ ग्राहकांना 25 रुपये प्रति किलो दराने पुरवला जात आहे. आतापर्यंत या साठ्यामधून सुमारे 1.70 लाख मेट्रिक टन कांदा जारी करण्यात आला आहे. कांद्याला योग्य भाव मिळवून देताना ग्राहकांसाठी दर कमी करण्यासाठी साठ्यामधून कांद्याची सतत खरेदी आणि वितरण सुरु आहे.

प्रति मेट्रिक टन 800 अमेरिकी डॉलर्स इतका किमान निर्यात दर आकारण्याचा निर्णय, देशातील ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांदा पुरवण्याचा सरकारचा निर्धार दर्शवतो.

***

M.Pange/S.MukhedarP.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1972667) Visitor Counter : 121