पंतप्रधान कार्यालय
दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी अनिता, नारायण कोंगनापल्ले यांचे केले अभिनंदन
Posted On:
28 OCT 2023 11:42AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हँगझोऊ येथे सुरू असलेल्या दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रोइंग क्रीडा प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल अनिता आणि नारायण कोंगनापल्ले यांचे अभिनंदन केले.
त्यांच्या कामगिरीचा देशाला अभिमान आहे, असे सांगून पंतप्रधानांनी त्यांच्या सांघिक कार्याचे आणि समर्पणाचे कौतुक केले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"रोइंग PR3 मिश्र दुहेरी स्कल्स क्रीडा प्रकारात अतुलनीय असे रौप्य पदक जिंकल्याबद्दल अनिता आणि नारायण कोंगनापल्ले यांचे अभिनंदन.
त्यांचे सांघिक प्रयत्न आणि समर्पणामुळेच ही चमकदार कामगिरी शक्य झाली. त्यांच्या या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान वाटतो आहे.
***
SushamaK/VPY/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1972427)
अभ्यागत कक्ष : 101
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam