पंतप्रधान कार्यालय
दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची पदकसंख्या ऐतिहासिक 100 वर पोहोचल्याबद्दल पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त
Posted On:
28 OCT 2023 11:41AM by PIB Mumbai
हांगझोऊ येथे सुरू असलेल्या दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंनी 100 वे पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
या ऐतिहासिक कामगिरीसाठी त्यांनी खेळाडू, प्रशिक्षक आणि त्यांना मदत करणाऱ्या चमूचे कौतुक केले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 100 पदके! हा एक अतुलनीय आनंदाचा क्षण आहे. हे यश आपल्या खेळाडूंच्या अतुलनीय पराक्रम, कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाचे फळ आहे.
या ऐतिहासिक कामगिरीमुळे आमचे हृदय अभिमानाने भरून आले आहे. मी, आपले प्रतिभावान खेळाडू, प्रशिक्षक आणि त्यांच्यासोबत काम करणार्या संपूर्ण चमूचे मनापासून कौतुक करतो आणि त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतो.
ही ऐतिहासिक कामगिरी आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील. या खेळाडूंची कामगिरी आपल्याला नेहमी स्मरण करून देत राहील की, आपल्या तरुणांसाठी कोणतीही गोष्ट अशक्यप्राय नाही."
***
SushamaK/VikasY/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1972415)
Visitor Counter : 90
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam