राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दुर्गापूजेच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 21 OCT 2023 6:11PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 ऑक्‍टोबर 2023

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दुर्गापूजेच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दुर्गा पूजेच्या या मंगल पर्वानिमित्त मी भारतात आणि भारताबाहेर वास्तव्य करणाऱ्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देते, असे राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

दुर्गा पूजनाचा उत्सव अमंगलावरील मांगल्याच्या, अज्ञानावर जागरूकतेच्या आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे. अनेक रूपांमध्ये पूजन केली जाणारी दुर्गा माता आपल्याला विभाजनकारी आणि विध्वंसक शक्तींना दूर ठेवण्याचे सामर्थ्य देते.

समाजाच्या हितासाठी कार्य करण्यासाठी आणि नैतिकतेच्या मार्गावर चालण्यासाठी माता दुर्गा आपल्याला मार्गदर्शन करो, अशी मी दुर्गा मातेला प्रार्थना करते. आपण महिलांना राष्ट्र उभारणीत समान आणि सन्माननीय भागीदार बनवून सक्षम केले पाहिजे.

चांगले आचरण आणि सेवेच्या भावनेने आपण देशाच्या एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी काम करू, अशी शपथ घेऊया.

राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

 

* * *

M.Pange/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1969767) Visitor Counter : 84