पंतप्रधान कार्यालय

युएनडब्ल्यूटीओतर्फे सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम म्हणून गौरवण्यात आल्याबद्दल पंतप्रधानांनी गुजरातमधील धोर्डो गावाची केली प्रशंसा

Posted On: 20 OCT 2023 3:34PM by PIB Mumbai

 

गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील धोर्डो गावाला संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेतर्फे (युएनडब्ल्यूटीओ) सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्रामाचा किताब जाहीर झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धोर्डो गावाची प्रशंसा केली आहे.

धोर्डो गावाला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत, पंतप्रधानांनी वर्ष 2009 आणि 2015 मध्ये या गावाला दिलेल्या भेटींदरम्यान काढलेली काही छायाचित्रे सामायिक केली.

एक्स मंचावर पंतप्रधान लिहिले:

कच्छमधील धोर्डो गावाचा समृध्द सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्य यांचा उत्सव साजरा होत आहे हे पाहून अत्यंत रोमांचित झालो आहे.हा सन्मान केवळ भारतीय पर्यटन विभागाची क्षमता दर्शवत नाही तर विशेष करून कच्छ मधील लोकांचा निश्चय देखील दर्शवतो.

धोर्डो गावाचे नाव असेच उज्वल राहो आणि हे गाव जगभरातील पर्यटकांना आकर्षित करत राहो!

वर्ष 2009 आणि 2015 मध्ये मी या गावाला गेलो असतानाच्या काही आठवणी सामायिक करत आहे. तुमच्यापैकी ज्यांनी यापूर्वी धोर्डो गावाला भेट दिली असेल तर त्यांना त्यांच्या आठवणी सामायिक करण्यासाठी मी आमंत्रित करतो.यामुळे अधिकाधिक लोकांना या गावाला भेट देण्याची प्रेरणा मिळेल. आणि #AmazingDhordo हा हॅशटॅग वापरायला विसरू नका.

***

G.Chippalkatti/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1969467) Visitor Counter : 108