कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोळसा मंत्रालयाने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत केली 500 दशलक्ष टन कोळशाची विक्रमी वाहतूक


उर्जा क्षेत्रासाठी पाठवण्यात आला 400 मेट्रीक टनापेक्षा जास्त कोळसा

एकूण कोळसा वितरण यावर्षी एक अब्ज टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता

Posted On: 19 OCT 2023 2:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 ऑक्‍टोबर 2023

 

कोळसा मंत्रालयाने 2023-24 या आर्थिक वर्षात 1012 दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन करून ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मंत्रालयाने, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत विक्रमी कामगिरी करताना, 17 ऑक्टोबर 2023 पर्यंत 500 मेट्रिक टन कोळसा पाठवण्यात यश मिळवले आहे. पावसाळा असूनही पहिल्या सहामाहीच्या 200 दिवसांत 500 मेट्रिक टन कोळसा पाठवणे ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे.

वर्षाच्या उत्तरार्धात उत्पादन आणि ते पोहचते करण्याचा दर सामान्यतः पहिल्या सहामाहीपेक्षा जास्त असतो.  त्यामुळे यंदा कोळसा पाठवण्याचे प्रमाण एक अब्ज टनांपेक्षा जास्त होईल, अशी अपेक्षा आहे. गेल्या आर्थिक वर्षात 9 नोव्हेंबर 2022 पर्यंत 500 मेट्रिक टन कोळसा पाठवण्याचे उद्दिष्ट गाठले गेले होते, तर चालू आर्थिक वर्षात हे उद्दिष्ट संबंधित कालावधीच्या 23 दिवस आधी गाठले गेले आहे.

विशेष म्हणजे या 500 मेट्रिक टन कोळशापैकी 416.57 मेट्रिक टन कोळसा ऊर्जा क्षेत्रासाठी आणि 84.77 मेट्रिक टन अ-नियंत्रित क्षेत्रासाठी पाठवण्यात आला होता. उर्जा क्षेत्रातील कोळसा वाहतुक वाढीचा दर वर्षाला 7.27 टक्के आहे आणि अ-नियंत्रित क्षेत्रात दरसाल 38.02 टक्के आहे. 31 मार्च 2023 पर्यंत 893.19 दशलक्ष टन कोळसा पाठवण्यात आला.

कोळसा मंत्रालयाच्या या ऐतिहासिक कामगिरीमध्ये कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल), सिंगरेनी कोलीरीज कंपनी लिमिटेड (एससीसीएल) आणि बंदिस्त/व्यावसायिक खाणींनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

 

* * *

S.Tupe/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1969048) Visitor Counter : 95