पंतप्रधान कार्यालय
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
प्रविष्टि तिथि:
15 OCT 2023 8:42AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना त्यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी डॉ. कलाम यांच्या नम्र स्वभाव आणि वैज्ञानिक प्रतिभेचे स्मरण केले. डॉ कलाम यांनी देशासाठी दिलेले अतुलनीय योगदान कायम स्मरणात राहील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर पोस्ट केले:
"आपला विनम्र व्यवहार आणि विशिष्ट वैज्ञानिक प्रतिभेमुळे
लोका लोकांमध्ये प्रिय असलेले माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम जी यांना त्यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी वंदन. देशाच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांचे सदैव श्रद्धापूर्वक स्मरण केले जाईल.
***
MI/VPY/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1967850)
आगंतुक पटल : 166
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam