संसदीय कामकाज मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या जी 20 (G20) अध्यक्षतेखालील पहिल्या पी 20 (P20) शिखर परिषदेचा समारोप

Posted On: 14 OCT 2023 9:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 ऑक्‍टोबर 2023

 

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीने आयोजित केलेल्या पहिल्या जी 20 (G20) संसदीय सभापती शिखर परिषदेचा (P20 समिट) आज, 14 ऑक्टोबर 2023 रोजी, दिल्लीतल्या द्वारका येथील यशोभूमी,  इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे समारोप झाला. या परिषदेमध्ये जगभरातील संसद सदस्य एकत्र आले आणि त्यांनी G20 प्रक्रियेत प्रभावी आणि अर्थपूर्ण संसदीय योगदान देण्यासाठी आपले संयुक्तिक कार्य सुरू ठेवण्याबाबतच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. 13 ऑक्टोबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या, या संसदीय सभापती (P20) शिखर परिषदेच्या नवव्या पर्वाचा  आज लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भाषणाने समारोप झाला.

  Image  Image

आज समारोपाच्या सत्रात, आपले सहकारी खासदार आणि इतर नेत्यांना संबोधित करताना, लोकसभा अध्यक्षांनी "एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य" यात संसद सदस्यांची भूमिका या विषयावरील पी 20  शिखर परिषद यशस्वी करण्यात योगदान दिल्याबद्दल जी 20 (G20) राष्ट्रांच्या संसदेच्या पीठासीन अधिकाऱ्यांचे आणि आमंत्रित राष्ट्रांचे आभार मानले. संयुक्त निवेदन स्वीकारल्यामुळे पी 20 प्रक्रिया अधिक बळकट झाली आहे, असेही बिर्ला यांनी नमूद केले. शाश्वत विकास उद्दिष्टे, हरित ऊर्जा, महिलांच्या नेतृत्वाखालील विकास आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांवरील सत्रांमध्ये उपस्थितांनी सामायिक केलेले मौल्यवान विचार आणि माहिती मानव-केंद्रित विकासासाठी जी 20 प्रक्रिया अधिक बळकट करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Image  Image

जी20 च्या संसदीय आयामांचा उल्लेख करताना, सभापतींनी नमूद केले की गेल्या दोन दिवसांत झालेल्या चर्चेने जी20 च्या संसदीय आयामांचे महत्त्व स्पष्टपणे अधोरेखित केले आहे आणि एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य ही सामूहिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जगातील विविध देशातील संसद सभागृहे एकत्र कसे काम करू शकतात हे देखील प्रस्थापित केले आहे. 

Image  Image

बहुपक्षीयवादावर भर देताना बिर्ला यांनी नमूद केले की, सध्याच्या एकमेकांशी जोडलेल्या जगात आपण कोणत्याही विशिष्ट समस्येकडे विकेंद्रितपणे पाहू शकत नाही.  त्यांनी संयुक्त निवेदनाच्या परिच्छेद 27 चा पुनरुच्चार केला.

Image  Image

बिर्ला यांनी आगामी काळात सीओपी-20, जी-20 आणि त्यापुढील सामायिक वचनबद्धतेचा पाठपुरावा करण्यासाठी जी20 राष्ट्रांच्या संसद सभागृहांच्या सामूहिक निर्धाराचा पुनरुच्चार केला.  संसद सदस्यांच्या भूमिकेवर बोलताना सभापतींनी नमूद केले की, लोकप्रतिनिधी या नात्याने लोकांच्या आशा, आकांक्षा आणि गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक धोरणे आणि कायदे तयार करण्यासाठी संसद सदस्यांची विशेष भूमिका असते.  “सरकारच्या प्रयत्नांना पूरक अशी आपली  भूमिका आहे;  लोककल्याणाच्या उद्देशाने सुशासन सुनिश्चित करण्यात आपले  विशेष योगदान आहे.”

भारताच्या पी20 अध्यक्षपदाच्या समारोपाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्षांनी ब्राझीलच्या संसदेकडे अध्यक्षपद सोपवले.

 

 

 

 

 

 

 

More information on P20 Summit:

  1. Ninth G20 Parliamentary Speakers’ Summit (P20) and Parliamentary Forum
  2. Prime Minister to inaugurate 9th G20 Parliamentary Speakers' Summit (P-20) in New Delhi on 13th October
  3. Presiding Officers of G20 Nations begin arriving in India for 9th P20 Summit
  4. 9th P20 Summit to be preceded by Parliamentary Forum on Mission LiFE
  5. Mission LiFE has given the world a new comprehensive approach for protecting environment and addressing challenges such as climate change: Lok Sabha Speaker
  6. President of African Union and Speakers of Parliaments of Australia, UAE and Bangladesh call on Lok Sabha Speaker on the sidelines of 9th P20 Summit
  7. PM inaugurates 9th G20 Parliamentary Speakers' Summit (P20)
  8. P20 Summit unanimously adopts Joint Statement
  9. Parliamentary Systems of G20 Countries

Join the conversation on social media, using the hashtag: #Parliament20.

 

* * *

S.Kane/Vikas/Gajendra/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1967779) Visitor Counter : 184