पंतप्रधान कार्यालय

ईशान्य एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरल्याने झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

Posted On: 12 OCT 2023 3:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2023

ईशान्य एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरल्याने झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख  व्यक्त केले आहे. प्रशासन  अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत  करत आहे , असे मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले:

ईशान्य  एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरल्यामुळे झालेल्या अपघातातील जीवितहानीमुळे दुःख झाले आहे. शोकाकुल   कुटुंबियांप्रति  संवेदना . जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी  मी प्रार्थना करतो.  प्रशासन  अपघातग्रस्तांना  सर्वतोपरी मदत  करत आहे : पंतप्रधान

 

S.Patil/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1967036) Visitor Counter : 79