गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सिक्कीम दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांच्यासोबत घेतली उच्चस्तरीय बैठक.


केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी आपल्या सिक्कीम दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक घेतली.

प्रविष्टि तिथि: 08 OCT 2023 7:57PM by PIB Mumbai

 

राज्यावर नुकत्याच कोसळलेल्या पुराच्या संकटानंतर जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी आवश्यक प्रयत्नांवर चर्चा करणे हा या बैठकीच्या चर्चेचा मुख्य विषय होता. बैठकीत दोन्ही नेत्यांनी सर्वसमावेशक चर्चा केली तसेच सद्यस्थितीला सामोरे जाण्यासाठी तात्काळ आणि दीर्घकालीन धोरणांचा आढावा घेतला.  बचाव आणि मदत कार्य जलद गतीने करण्यासाठी आवश्यक संसाधने आणि मदत यांच्या समन्वयावर या चर्चेत भर देण्यात आला.

राज्याला जलद आणि प्रभावीरित्या पूर्वपदावर आणणे सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारला सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या केंद्र सरकारच्या वचनबद्धतेचा  केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी पुनरुच्चार केला. 

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1965817) आगंतुक पटल : 163
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Nepali , हिन्दी , Assamese , Bengali , Punjabi