पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मधील पुरुष कॅनो दुहेरी 1000 मीटर या क्रीडा प्रकारात अर्जुन सिंग आणि सुनील सिंग सलाम जोडीने कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
03 OCT 2023 4:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2023
अर्जुन सिंग आणि सुनील सिंग सलाम यांनी हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या कॅनो दुहेरी 1000 मीटर स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X पोस्टवर लिहिले आहे :
“आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या कॅनो दुहेरी 1000 मीटर स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल अर्जुन सिंग आणि सुनील सिंग सलाम यांचे अभिनंदन.
त्यांची शानदार कामगिरी आणि दृढनिश्चय याचा देशाला अभिमान आहे. त्यांनी लाखो भारतीय तरुणांना त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आणि क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरित केले आहे.
N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1963667)
आगंतुक पटल : 142
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam