पंतप्रधान कार्यालय

देशभरातील रेल्वे स्थानकांच्या पुनर्निर्मितीला आमच्या सरकारचे प्राधान्यः पंतप्रधान

Posted On: 30 SEP 2023 1:15PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्वाल्हेर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी सुरू असलेल्या कामाची प्रशंसा केली आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची X वरील पोस्ट सामायिक करताना पंतप्रधान म्हणाले;

खूप छान! देशभरातल्या रेल्वे स्थानकांचा कायापालट करणे, ही आमच्या सरकारची प्राथमिकता आहे. या अत्याधुनिक सुविधांच्या बरोबर ग्वाल्हेर रेल्वे स्थानकाच्या होणाऱ्या विकास कार्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

***

S.Pophale/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1962388) Visitor Counter : 91