पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा दोन अंतर्गत उत्तर प्रदेशातील शंभर टक्के गावांनी प्राप्त केलेल्या ओडीएफ प्लस दर्जाचे केले कौतुक

प्रविष्टि तिथि: 29 SEP 2023 10:11AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा दोन अंतर्गत उत्तर प्रदेशातील शंभर टक्के गावांनी प्राप्त केलेल्या ओडीएफ (हगणदारीमुक्त) प्लस दर्जाचे कौतुक केले आहे.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या एक्स वरील संदेशाच्या उत्तरात पंतप्रधान म्हणाले;

"खूप खूप शुभेच्छा! बापूंच्या जयंतीपूर्वी उत्तर प्रदेशची ही अभूतपूर्व कामगिरी संपूर्ण देशाला प्रेरणा देणारी आहे. स्वच्छतेच्या क्षेत्रात आपले सातत्यपूर्ण प्रयत्न हे नारी शक्तीच्या सन्मानासाठी तसेच आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत.

***

S.Thakur/VinayakG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1961917) आगंतुक पटल : 166
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam