माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये आकाशवाणी दाहोद एफएम प्रसारण केंद्र प्रकल्पाची केली पायाभरणी


10 किलोवॅट क्षमतेचे एफएम केंद्र गुजरात आणि मध्य प्रदेशातील 25 लाख रहिवाशांना सेवा पुरवणार

Posted On: 27 SEP 2023 8:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 सप्‍टेंबर 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये आकाशवाणी दाहोद एफएम प्रसारण केंद्र प्रकल्पाची पायाभरणी केली. राज्यातील बोडेली येथे आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधानांनी इतर काही प्रकल्पांसह, 10 किलो वॅट क्षमतेच्या एफएम प्रसारण केंद्राची दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पायाभरणी केली.

या प्रकल्पासाठी अंदाजे रु. 11 कोटी खर्च अपेक्षित आहे. या केंद्राचे स्थान अंदाजे 55 किमी त्रिज्या क्षेत्राचा समावेश करण्याच्या दृष्टीने निश्चित करण्यात आले असून, यामध्ये दाहोद या  आदिवासी जिल्ह्याचा अंदाजे 75% परिसर समाविष्ट आहे. त्याशिवाय, हा ट्रान्समीटर मध्य प्रदेशातील अलीराजपूर आणि झाबुआसह शेजारच्या आदिवासी जिल्ह्यांमध्ये अंशतः सेवा पुरवण्यासाठी सक्षम आहे.

दाहोद स्थानक सुरू झाल्यामुळे, गुजरात आणि मध्य प्रदेशातील 25 लाखांहून अधिक रहिवाशांना उच्च-गुणवत्तेच्या एफएम प्रसारण सेवेचा लाभ मिळेल.

हा प्रकल्प केवळ या प्रदेशाची सांस्कृतिक आणि प्रादेशिक वीण मजबूत करणार नसून, आपल्या सेवा क्षेत्रातील समुदायांमध्ये उत्तम संवाद आणि संपर्क देखील सुलभ करेल.

या व्यतिरिक्त प्रसार भारती भुज, भावनगर, द्वारका, राधनपूर आणि देसा यासह अन्य प्रमुख ठिकाणी 39 कोटींहून अधिक खर्चाचे विविध ऊर्जा क्षमतेचे एफएम ट्रान्समीटर बसवण्याचे काम करत आहे. हे प्रकल्प माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अर्थसहाय्या द्वारे हाती घेतलेल्या, प्रसारण पायाभूत सुविधा नेटवर्क विकास योजनेचा भाग आहेत.

आकाशवाणी एफएम सेवा देशभरातील लाखो श्रोत्यांपर्यंत उच्च दर्जाचे आणि वैविध्यपूर्ण आशय संपन्न कार्यक्रम पोहोचवण्यासाठी वचनबद्ध आहे. समृद्ध इतिहास आणि दूरगामी दृष्टिकोनासह, आकाशवाणी एफएम सेवा मनोरंजन, माहिती आणि सांस्कृतिक समृद्धीचा विश्वसनीय स्रोत आहे.

 

* * *

S.Kane/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1961451) Visitor Counter : 87