आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आरोग्य सुविधा लोकांपर्यंत शंभर टक्के पोहोचवता याव्यात म्हणून 17 सप्टेंबर 2023 पासून देशभरात आयुष्मान भव अभियान सुरु


देशभरात गेल्या तीन दिवसांत 30,000 हून अधिक आयुष्मान मेळाव्यांचं आयोजन

गेल्या 3 दिवसांत 8 लाखांहून अधिक आयुष्मान ओळखपत्रे जारी

Posted On: 20 SEP 2023 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 सप्‍टेंबर 2023

 

आवश्यक त्या आरोग्य सुविधा लोकांपर्यंत शंभर टक्के पोहोचवता याव्यात, म्हणून 17 सप्टेंबर 2023 पासून 'सेवा पंधरवाड्या अंतर्गत' आयुष्मान भव अभियान सुरू आहे.  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी  13 सप्टेंबर, 2023 रोजी  'आयुष्मान भव' मोहिमेचे उद्घाटन केले. संपूर्ण देशभरात आरोग्यसेवेची सुलभता आणि सर्वसमावेशकता पुन्हा परिभाषित करण्याच्या उद्दिष्टाची अंमलबजावणी ‘सेवा पंधरवड्यात’ केली जाईल. यात संपूर्ण राष्ट्र आणि संपूर्ण समाजाचा दृष्टिकोन अंतर्भूत आहे. प्रत्येक गाव तसेच शहरी प्रभागांमध्ये सर्वसमावेशक आरोग्य सेवा पोहचवणे, भौगोलिक अडथळे पार करणे आणि कोणीही वंचित राहणार नाही याची खातरजमा करणे हे सेवा पंधरवड्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.

आयुष्मान भव अभियाना अंतर्गत, 17 सप्टेंबर 2023 पासून 30,000 हून अधिक आयुष्मान मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. यात 19 सप्टेंबर 2023 पर्यंत 2.5 लाखांहून अधिक रुग्णांनी सेवांचा लाभ घेतला. आयुष्मान मेळाव्याचे सूचक आणि लाभार्थी यांची 17 सप्टेंबर 2023 पर्यंतची सर्वसमावेशक यादी खालीलप्रमाणे आहे:

खालील तक्ते आयुष्मान भव अंतर्गत आयुष्मान मेळाव्यांच्या उद्दिष्टप्राप्तीवर प्रकाश टाकतात:

आयुष्मान भव मोहिमे अंतर्गत, गेल्या 3 दिवसांत, 2.5 लाखांहून अधिक ABHA ओळखपत्रे देण्यात आली. 10 लाखांहून अधिक लोकांना मोफत औषधे मिळाली आहेत आणि 8 लाखांहून अधिक लोकांना मोफत निदान सेवा मिळाल्या आहेत.  आयुष्मान ओळखपत्रांचे वितरण, एबीएचए ओळखपत्रे तयार करणे आणि असंसर्गजन्य रोग, क्षयरोग (निक्षय मित्र), सिकलसेल यासारखे आजार तसेच रक्तदान आणि अवयव दान मोहीम यासारख्या महत्त्वाच्या आरोग्य योजना याबाबत जागरुकता निर्माण करणे हे सेवा पंधरवड्याचे उद्दिष्ट आहे.  

सेवा पंधरवाड्या अंतर्गत प्रदान केल्या जाणाऱ्या सेवांचा लाभ प्रवेश घेण्यासाठी, नागरिकांना त्यांच्या जवळच्या आरोग्य आणि कल्याण केंद्रांना भेट देण्यास प्रोत्साहित केले जाते.

S. No.

Indicators

Cumulative Report Since 17 Sept

1

Total Health Mela Completed

2,271

2

Patients Registered

2,64,042

 

S. No.

 

Indicators

Total Number of People who benefitted since 17 Sept

1

Patients Consulted General OPD

1,98,835

2

Patients Consulted Specialist OPD

80,601

3

Major Surgeries

870

4

Minor Surgeries

2,376

5

Diagnosed Hypertension

27,067

6

Diagnosed Diabetes

23,594

7

Screened/Diagnosed Oral Cancer

3,597

8

Screened/Diagnosed Breast Cancer

2,089

9

Screened/Diagnosed Cervical Cancer

1,602

10

Diagnosed Cataract

4,884

11

RCH Services Availed

23,191

12

Lab Tests

1,03,212

13

Referred

5,519

 

* * *

S.Bedekar/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1959156) Visitor Counter : 180