गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज तेलंगणा येथे हैदराबाद मुक्ति दिन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून केले संबोधित


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे, जो आपण सेवा दिन म्हणूनही साजरा करतो

Posted On: 17 SEP 2023 3:29PM by PIB Mumbai


 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज तेलंगणा येथे हैदराबाद मुक्ति दिनाच्या सोहळ्याला  प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित केले. अमित शहा यांनी सशस्त्र सीमा दल (एसएसबी) , इब्राहिमपट्टणमच्या  20 कोटी रुपये खर्चाच्या 48 टाईप -III  घरांची दूरदृश्य प्रणालीद्वारे पायाभरणी केली. यावेळी केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी, केंद्रीय गृह सचिव, सांस्कृतिक मंत्रालयाचे  सचिव, संचालक, गुप्तचर  विभागाचे महासंचालक, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक, सशस्त्र सीमा दलचे (एसएसबी ) महासंचालक  यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपल्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, आज तेलंगणा मुक्तीला 75 वर्षे पूर्ण होत असून लोहपुरुष सरदार पटेल नसते तर तेलंगण  इतक्या लवकर मुक्त झाले नसते.  ते म्हणाले की, सरदार पटेल यांनीच राष्ट्र प्रथम या तत्त्वाचे पालन करून हैदराबाद पोलिस कारवाईची योजना आखली आणि रक्तपात न करता निजामाच्या रझाकारांच्या सैन्याला  शरण येण्यास  भाग पाडले. शाह म्हणाले की, सरदार पटेल आणि केएम मुन्शी या जोडीने कर्नाटकातील तेलंगणा प्रांतातील बिदर आणि मराठवाड्याचा हा विशाल भाग भारताशी जोडण्याचे काम केले. ते म्हणाले की, तेलंगणाच्या मुक्तीसाठी स्वामी रामानंद तीर्थ, एम चिन्नारेड्डी, नरसिंह राव, शेख बंदगी, के व्ही नरसिंह राव, विद्याधर गुरू, पंडित केशवराव कोरटकर, अनाभेरी प्रभाकरी राव, बद्दम येल्ला रेड्डी, रवी नारायण रेड्डीबुरुगुला रामकृष्ण राव नारायणराव , दिगंबरराव बिंदू , वामनराव नाईक , वाघमारे आणि त्यांच्यासारख्या असंख्य लोकांनी सर्वस्व अर्पण  केले.

त्यांनी तेलंगणा, कल्याण कर्नाटक आणि मराठवाड्यातील जनतेला आवाहन केले की, आपण या दिवसाच्या स्मृती, आपला संघर्ष आणि हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण केले पाहिजे जेणेकरून भावी पिढी यातून प्रेरणा घेऊन देशाच्या विकासासाठी स्वत: ला समर्पित करेल.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, आज आपले प्रिय  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे, जो आपण सेवा दिन म्हणूनही साजरा करतो. गेल्या 9 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कल्पनेतील  भारताच्या उभारणीच्या दिशेने मोठी  प्रगती केली आहे असे ते म्हणाले .

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

 

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1958289) Visitor Counter : 113