गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घायुष्याची आणि उत्तम आरोग्याची केली कामना
नेतृत्वाची क्षमता, संवेदनक्षम मन आणि मेहनती वृत्ती यांचा अनोखा मिलाफ श्री नरेंद्र मोदी यांच्या ठायी आहे
लक्षावधी गरीब लोकांना गरिबीच्या विळख्यातून मुक्त करण्याच्या आणि त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याच्या निर्धारामुळेच आज मोदी यांना ‘दीनमित्र’ म्हणून ओळखले जात आहे
Posted On:
17 SEP 2023 1:03PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले की देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांनी आपली दूरदृष्टी, अथक प्रयत्न आणि निःस्वार्थ सेवा याद्वारे लक्षावधी लोकांच्या जीवनात समृद्धी आणली आणि त्यांना आत्मविश्वास दिला, त्यांना आपण मनापासून शुभेच्छा देत आहोत. त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभावे यासाठी देखील आपण देवाकडे प्रार्थना करतो.
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री म्हणाले की नरेंद्र मोदी यांच्या ठायी नेतृत्व, संवेदनशीलता आणि परिश्रम यांचा दुर्मिळ मिलाफ पाहायला मिळतो. त्यांनी आपल्या देशाच्या उपक्रमांची व्याप्ती आणि आकारमान यामध्ये बदल घडवून आणला आहे, मग तो कोविड-19 प्रतिबंधक लस बनवण्याचा असो किंवा चांद्रयान-3 चे यश असो. आज आपला तिरंगा जगात अभिमानाने फडकत आहे.
प्रत्येक भारतीयाच्या हृदयाशी जोडले जात त्यांना देशाच्या विकासासोबत जोडण्याचे अद्भुत कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साध्य केले आहे, जी एक अभूतपूर्व कामगिरी आहे.
लक्षावधी गरीब लोकांना गरिबीच्या विळख्यातून मुक्त करण्याच्या आणि त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याच्या निर्धारामुळेच आज मोदी यांना ‘दीनमित्र’ म्हणून ओळखले जात आहे, असे अमित शाह म्हणाले. नरेंद्र मोदी हे नव्या भारताचे शिल्पकार आहेत ज्यांनी आपल्या प्राचीन वारशाच्या आधारे एका महान आणि स्वयंपूर्ण भारताचा एक भक्कम पाया उभारण्यासाठी काम केले आहे, असे शाह यांनी सांगितले. एखादी संघटना असो वा सरकार, आपल्या सर्वांना नरेंद्र मोदी यांच्या ‘ देश सर्वप्रथम’ या दृष्टीकोनापासून प्रेरणा मिळते. अशा असामान्य नेत्याच्या मार्गदर्शनाखाली देशाची सेवा करण्याची संधी मिळणे हे आपले मोठे भाग्य आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 9 वर्षात आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी ज्याचे स्वप्न पाहिले होतो त्या भारताची उभारणी होत आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक्सवर एक व्हिडिओ देखील सामाईक केला आहे.
***
N.Chitale/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1958201)
Visitor Counter : 117