उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपतींनी पंतप्रधानांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
17 SEP 2023 9:53AM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये उपराष्ट्रपती म्हणाले;
“भारताचे माननीय पंतप्रधान श्री @narendramodi Ji यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचे दूरदर्शी नेतृत्व, ध्यास घेण्याची वृत्ती आणि कामाची अनुकरणीय अंमलबजावणी यामुळे भारताला उल्लेखनीय प्रगती आणि युगप्रवर्तक परिवर्तनाची दिशा दिली आहे. तुमचा वारसा आपल्या देशाच्या इतिहासाच्या अध्यायात कोरला गेला आहे.
जागतिक लोकसंख्येच्या सहाव्या भागाचे वसतिस्थान असलेला भारत तुमची समावेशकता, सार्वजनिक कल्याण याविषयीची बांधिलकी आणि आपल्या सभ्यतेच्या सिद्धांतांशी सुसंगत असलेला तुमचा दूरदर्शीपणा यांचे नेहमीच जतन करेल. तुम्हाला यापुढील काळात भारताची सेवा करण्यासाठी उत्तम आऱोग्य आणि आनंदाचे वरदान ईश्वराकडून प्राप्त होऊ देत.”
***
M.Iyengar/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1958130)
आगंतुक पटल : 141