महिला आणि बालविकास मंत्रालय

6व्या राष्ट्रीय पोषण माहच्या सुरुवातीच्या 12 दिवसात देशभरातील जनचळवळ  डॅशबोर्डवर 6 कोटींहून अधिक कार्यांची नोंद

Posted On: 16 SEP 2023 3:02PM by PIB Mumbai

 

मार्च 2018 मध्ये पोषण अभियानाला प्रारंभ झाल्यापासून, देशात पहिल्यांदाच पोषणावर केंद्रित देशव्यापी जनचळवळ  सुरू झाली आहे. पोषण अभियानांतर्गत  वर्तणुकीतील बदलांना , विशेषतः तळागाळात आवश्यक पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करण्याला  प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने  काळजीपूर्वक याची आखणी केली जाते. गरोदर महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुली आणि 6 वर्षांपर्यंतची मुले यांसारख्या विशिष्ट लाभार्थ्यांसाठी याची रचना  केली  आहे.

ही जनचळवळ  वर्षातून दोनदा  म्हणजेच सप्टेंबरमध्ये पोषण माह दरम्यान  आणि मार्च-एप्रिलमध्ये पोषण पंधरवडा दरम्यान आयोजित  केली जाते .आजपर्यंत, 10 जनचळवळी  यशस्वीरित्या आयोजित करण्यात आल्या असून (प्रत्येक माह आणि पंधरवड्यासाठी 5), 60 कोटींहून अधिक संवेदीकरण कार्यांची नोंद झाली आहे. यातून  2018 पासून देशभरातील वाढता आणि शाश्वत सहभाग दिसून येतो.

सध्या, देशात महिला आणि बाल विकास मंत्रालयाअंतर्गत  आयोजित 6 वा राष्ट्रीय पोषण माह साजरा केला  जात आहे.  जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध प्रमुख मंत्रालये आणि विभाग यांच्या सहकार्यातून केलेले प्रयत्न  या कार्यक्रमातून दिसून येत आहेत.  यावर्षी राष्ट्रीय पोषण माहच्या सुरुवातीच्या  12 दिवसांत देशभरातील जनआंदोलन डॅशबोर्डवर 6 कोटींहून अधिक कार्यांची  नोंद झाली आहे.

या संपूर्ण महिनाभराच्या कार्यक्रमात, तळागाळातील घटकांचे  पोषण सुधारण्यासाठी आणि वर्तनातील बदलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध हितधारक सक्रियपणे सहभागी झाले आहेत. भारतातील सर्व प्रदेशांमध्ये विविध संकल्पनांच्या अंतर्गत अनेक उपक्रम राबवले जात आहेत.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1958018) Visitor Counter : 121