सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाचा सर्वसमावेशी दृष्टीकोन : नवोन्मेषी उपक्रमांद्वारे जीवन परिवर्तन


प्रवर्तक बदल : दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाच्या पाच उपक्रमांनी दिव्यांग हक्क मानचित्राला दिला आकार

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या राज्यमंत्री कुमारी प्रतिमा भौमिक यांच्याद्वारे दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाच्या पाच उपक्रमांचा प्रारंभ

Posted On: 10 SEP 2023 12:53PM by PIB Mumbai

 

भारतातील दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाने (DEPwD) एक परिवर्तनात्मक प्रवास सुरू केला आहे. अधिक समावेशक समाज निर्माणाच्या अथक प्रयत्नात दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाने महत्त्वपूर्ण भागीदारी निभावली आहे आणि शाश्वत बदल घडवून आणण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम देखील राबवले आहेत. वास्तुकला परिषदेसोबत अमुलाग्र बदल घडवून आणणारा सामंजस्य करार करण्यापासून ते संशोधनाच्या उद्देशाने युनिक डिसॅबिलिटी आयडी (यूडीआयडी) पोर्टलद्वारे निनावी डेटा जारी करण्यापर्यंत आणि दिव्यांग व्यक्तींना कौशल्य विकास आणि रोजगार संधी शोधाद्वारे सक्षम बनविण्यासाठी तयार केलेले पीएम दक्ष पोर्टल सुरू करण्यापर्यंत या विभागाने असे अनेक उपक्रम राबविले आहेत. या व्यतिरिक्त, भारतीय न्यायालयांद्वारे सर्वसमावेशक पुस्तिकेत प्रमुख दिव्यांग अधिकारांच्या निकालांचे संकलन करण्यात आले असून दिव्यांग व्यक्तींसाठी मुख्य आयुक्तांद्वारे अत्याधुनिक ऑनलाइन केस मॉनिटरिंग पोर्टलच्या साहसी प्रवासावर प्रकाश टाकण्यात आला आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या राज्यमंत्री कुमारी प्रतिमा भौमिक नवी दिल्लीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र (DAIC) येथे खाली नमूद केलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाच्या (DEPwD) पाच उपक्रमांचा शुभारंभ करतील. हे उपक्रम भारतातील दिव्यांग व्यक्तींचे जीवन सुधारण्यासाठी सर्वसमावेशकता वाढवणे, दिव्यांगांचे अधिकार वाढवणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करणे यासाठी एकत्रितरित्या दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाची वचनबद्धता दर्शवतात.

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाच्या पाच उपक्रमांमध्ये अनेक महत्त्वाच्या कृतींचा समावेश आहे:

1. वास्तुकला परिषदेसोबत सामंजस्य करार : बॅचलर ऑफ आर्किटेक्चर अभ्यासक्रमात सार्वत्रिक अभ्यासक्रम प्रवेशयोग्यता अनिवार्य करण्यासाठी विभाग वास्तुकला परिषदेला (COA) सहयोग करतो. ही भागीदारी वास्तुविशारद आणि नागरी अभियंत्यांसाठी एक प्रमाणित अभ्यासक्रम विकसित करण्यापर्यंत विस्तारित आहे, ज्यामुळे प्रवेशयोग्यता मानकांचे पालन सुनिश्चित होईल.

2. UDID चा निनावी डेटा जाहीर करणे: दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग संशोधनाच्या उद्देशाने UDID पोर्टलद्वारे निनावी डेटा जाहीर करत असून यामुळे दिव्यांग क्षेत्रातील माहिती आधारित निर्णय घेणे सुलभ होते, तसेच दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत समज वाढविण्यासाठी आणि लक्ष्यित उपाययोजनांची माहिती देण्यासाठी विविध स्तरांवर अंतर्दृष्टी प्रदान करते.

3. पीएम दक्ष पोर्टल : दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी शोधणार्‍या अपंग व्यक्तींसाठी एक सर्वसमावेशक डिजिटल व्यासपीठ म्हणून पीएम दक्ष पोर्टल सादर करतो. हे पोर्टल दिव्यांगांना विनाअडथळा नोंदणी, कौशल्य प्रशिक्षण पर्याय, नोकरीची सूची आणि सुव्यवस्थित प्रशासकीय प्रक्रिया या सेवा प्रदान करते.

4. प्रवेशाचे मार्ग- दिव्यांग अधिकारांबाबत न्यायालयाचे मत : भारतातील सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचे दिव्यांग हक्कांवरील उल्लेखनीय निकाल एका पुस्तिकेत संकलित केले गेले आहेत, ज्यामध्ये दिव्यांग व्यक्ती आणि या क्षेत्रातील भागधारकांसाठी संदर्भ मार्गदर्शन प्रदान केले आहे.

5. दिव्यांग व्यक्तींसाठीचे मुख्य आयुक्त (CCPD) यांच्या द्वारे ऑनलाइन केस देखरेख पोर्टल: दिव्यांग व्यक्तींसाठीचे मुख्य आयुक्त दिंव्यांग व्यक्तींनी दाखल केलेल्या तक्रारी हाताळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करतात. यामुळे संपूर्ण प्रक्रिया पेपरलेस आणि कार्यक्षम बनवते, विनाअडथळा ऑनलाइन तक्रार दाखल करता येते, स्वयंचलित स्मरणपत्रे आणि तक्रारीच्या सुनावणीचे सरलीकृत वेळापत्रक देखील प्राप्त करता येते.

***

S.Thakur/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1956040) Visitor Counter : 110