पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान मोदी यांची जपानच्या पंतप्रधानांसोबत बैठक

प्रविष्टि तिथि: 09 SEP 2023 7:56PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (9 सप्टेंबर 2023) जपानचे पंतप्रधान फुमिओ कीशिदा यांच्या सोबत द्विपक्षीय बैठक घेतली. नवी दिल्लीत सुरू असलेल्या जी-20 शिखर परिषदेच्या दरम्यान ही द्विपक्षीय बैठक झाली.

यावेळी दोन्ही नेत्यांनी, भारत आणि जपान या दोन्ही देशांमधील गेल्या वर्षभरातील अनुक्रमे जी-20 आणि जी-7 च्या अध्यक्षीय कारकीर्दीतील विधायक संवादाची, विशेषत: ग्लोबल साऊथ च्या चिंता आणि आकांक्षाना मुख्य प्रवाहात आणण्याच्या प्रयत्नांची दखल घेतली. 

दोन्ही नेत्यांमधे भारत-जपान द्विपक्षीय भागीदारीचे विविध पैलू, ज्यात पायाभूत सुविधा विकास, तंत्रज्ञानविषयक सहकार्य, गुंतवणूक आणि ऊर्जा अशा विषयांवर चर्चा झाली.

भारत जपान यांच्यातील विशेष राजनैतिक आणि जागतिक भागीदारी अधिकाधिक दृढ करण्याच्या त्यांच्या कटिबद्धतेचा दोन्ही नेत्यांनी पुनरुच्चार केला.

***

S.Thakur/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1955875) आगंतुक पटल : 240
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam