पंतप्रधान कार्यालय
उत्तर प्रदेशातील झाशी येथे जलसंधारण आणि भूजल पातळी वाढवण्याच्या दिशेने केल्या जात असलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी केले कौतुक
Posted On:
05 SEP 2023 10:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील झाशी येथे जलसंधारण आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी लोकसहभागातून होत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. या उदात्त कार्यात सहभागी असलेल्या सर्वांचे मोदी यांनी अभिनंदन केले.
लुप्त होत चाललेल्या नद्यांचे पुनरुज्जीवन आणि मतदारसंघातील विविध अमृत सरोवरांच्या बांधकामाबाबत झाशीच्या खासदारांच्या X थ्रेडला उत्तर देताना पंतप्रधानांनी X पोस्टमध्ये म्हटले आहे;
“उत्तर प्रदेशामधील झाशी येथे जल संधारण आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी लोकसहभागातून होत असलेल्या प्रयत्नांचे परिणाम अतिशय उत्साहवर्धक आणि त्याबरोबरच संपूर्ण देशासाठी एक आदर्श उदाहरण आहेत. या उदात्त कार्यात सहभागी असलेल्या सर्वांचे खूप-खूप अभिनंदन!”
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1955028)
Visitor Counter : 155
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam