माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाच्या प्रधान महासंचालक पदाचा मनीष देसाई यांनी स्वीकारला कार्यभार

प्रविष्टि तिथि: 01 SEP 2023 8:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2023

पत्र सूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक म्हणून मनीष देसाई यांनी आज पदभार स्वीकारला. राजेश मल्होत्रा काल या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर मनिष देसाई यांनी त्यांचा पदभार स्वीकारला आहे.

मनिष देसाई 1989च्या तुकडीमधील भारतीय माहिती सेवा अधिकारी आहेत.यापूर्वी देसाई यांनी केंद्रीय संचार ब्युरोचे प्रधान महासंचालक म्हणून सरकारी जाहिराती आणि आऊटरीच उपक्रमांचे काम पाहिले आहे.

सुमारे तीन दशकांच्या उल्लेखनीय कारकिर्दीमध्ये देसाई यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या हाताळल्या आहेत. यामध्ये चित्रपट प्रभागाचे महासंचालक, आयआयएमसीचे अतिरिक्त महासंचालक(प्रशासन आणि प्रशिक्षण), सीबीएफसीचे सीईओ यांचा समावेश आहे.

चित्रपट प्रभागातील त्यांच्या कार्यकाळादरम्यान मुंबईत राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालय उभारण्याच्या कामामध्ये त्यांचा सहभाग होता.

त्यांनी एक दशकाहून जास्त काळ पीआयबी मुंबईमध्येही अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यम उपक्रमांची आणि भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव(इफ्फी), गोवा या महोत्सवासह अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांची हाताळणी केली.

 

 

S.Bedekar/S.Patil/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1954202) आगंतुक पटल : 185
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Assamese , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada