पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’(104 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

Posted On: 27 AUG 2023 11:45AM by PIB Mumbai

 

माझ्या प्रिय परिवारातील  सदस्यांनो, नमस्कार. मन की बात च्या ऑगस्ट भागात आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मला आठवत नाही की असं झालं असेल की श्रावणाचा महिना असेल आणि दोन दा मन की बातचा कार्यक्रम प्रसारित झाला असेल. पण यावेळी असंच होत आहे. श्रावण म्हणजे सदाशिवाचा महिना, उत्सव आणि उल्हासाचा महिना. चांद्रयानाच्या यसस्वीतेने या उत्सवाच्या वातावरणाला कित्येक पटींनी उत्साहपूर्ण बनवलं आहे.  चांद्र यान चंद्रमावर पोहचण्याच्या घटनेस आता तीन दिवसांहून अधिक काळ गेला आहे. हे यश इतकं मोठं आहे की त्याची चर्चा जितकी केली तर ती कमीच आहे. जेव्हा मी आपल्याशी चर्चा करत आहे तर मला एक जुनी कविता आठवत आहे.

आसमान  में  सर उठाकर,

घने बादलों को चीरकर

रोशनी का संकल्प ले,

अभी तो सुरज उगा है

 

दृढ निश्चय के साथ चलकर

हर मुश्किल को पार कर

घोर अंधेरे को मिटाकने

अभी तो सूरज उगा है

 

आसमान  में  सर उठाकर,

घने बादलों को चीरकर

अभी तो सुरज उगा है

माझ्या परिवारातील सदस्यांनो, २३ ऑगस्टला भारतानं आणि भारताच्या चंद्रयानानं हे सिद्ध केलं  आहे की संकल्पाचे काही सूर्य चंद्रावरही उगवत असतात.  मिशन चांद्रयान भारताच्या त्या प्रवृत्तीचं प्रतीक बनलं आहे. जिला जी कोणत्याही स्थितीत विजयी होव्हायचं आहे आणि जी कोणत्याही स्थितीत जिंकायचं कसं तेही  जाणते. मित्रांनो या मोहिमेचा एक बाजू अशीही होती की मी त्याची चर्चा आज आपल्याशी विशेषत्वाने करू इच्छितो. आपल्याला आठवत असेलच की मी यावेळी लाल किल्ल्यावरून बोलताना म्हटलं होतं की आम्हाला महिला प्रणित विकासाला राष्ट्रीय चरित्राच्या स्वरूपात विकसित करायचं आहे. जेथे महिला शक्तीचं सामर्थ्य जोडलं जातं. तेथे अशक्यही शक्य करून दाखवलं जाऊ शकतं. भारताचं मिशन चांद्रयान नारीशक्तीचं ही जिवंत उदाहरण आहे. या संपूर्ण मोहिमेत अनेक महिला वैज्ञानिक आणि अभियंत्या जोडल्या  गेल्या होत्या. त्यांनी विविध प्रणालींचे प्रकल्प संचालक, प्रकल्प व्यवस्थापिका, अशा  महत्वपूर्ण जबादार्या सांभाळल्या होत्या.  भारताच्या  कन्या आता अनंत समजल्या जाणार्या आकाशाला आव्हान देऊ लागल्या आहेत. एखाद्या देशाच्या कन्या इतक्या महत्वाकांक्षी होतात तर त्या देशाला विकसित होण्यापासून कोण अडवू शकेल?

मित्रांनो, आपण इतकी उंच उड्डाण यासाठी घेतलं आहे कारण आपली स्वप्नंही मोठी आहेत आणि प्रयत्नही मोठे आहेत. चांद्र यान -३ च्या यशात आमच्या वैज्ञानिकांसोबतच इतर क्षेत्रांचीही महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे. यानाचे सर्व भाग आणि तांत्रिक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी  कितीतरी देशवासियांनी योगदान दिलं  आहे. जेव्हा सर्वांचे प्रयत्न लागले तेव्हा यशही मिळालं. हेच चांद्रयान ३चं सर्वात मोठं यश आहे. मी मनोकामना व्यक्त करतो की पुढेही आपलं अंतराळ क्षेत्र आणि सर्वांचे प्रयत्न असंच यश मिळवत राहील.

माझ्या परिवारातील सद्स्यांनो, सप्टेंबरचा महिना हा भारताचच्या सामर्थ्याचां साक्षीदार बनू पहात आहे. पुढील महिन्यात होणार्या जी २० नेत्यांच्या शिखर परिषदेसाठी भारत पूर्णतः तयार आहे.  या परिषदेत भाग घेण्यासाठी ४० देशांचे राष्ट्राध्यक्ष, अनेक जागतिक संयोजक राजधानी दिल्ली इथं  येत आहेत. जी २० च्या इतिहासात हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सहभाग असेल. आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत भारताने जी २० ला जास्त समावेशक व्यासपीठ बनवलं आहे. भारताच्या निमंत्रणावरूनच  आफ्रिकन संघ जी २० शी जोडला  गेला आहे. आफ्रिकन लोकांचा आवाज जगातील महत्वच्या व्यासपीठावर पोहचला. मित्रांनो, गेल्या वर्षी बाली मध्ये भारताला जी २० चं अध्यक्षपद मिळाल्यानंतर आतापर्यंत इतकं काही घडलं आहे की ते आपल्याला स्वाभिमानानं भरून टाकतं. मोठमोठे कार्यक्रम दिल्लीत आयोजित करण्याच्या परंपरेपासून वेगळं होऊन आपण ही परिषद देशातील ६० वेगवेगळ्या शहरांत नेली. देशातील ६० शहरांमध्ये या परिषदेशी संलग्न अशा २०० बैठकांचं आयोजन आम्ही केलं. जी २० प्रतिनिधी जिथं जिथं गेले, तेथे लोकांनी त्यांचे अतिशय उत्साहानं स्वागत केलं. हे प्रतिनिधी भारताची विविधता, आपली चैतन्यशील लोकशाही, पाहून खूपच प्रभावित झाले. भारतात असणाऱ्या विविध शक्यतांचा त्यांना अनुभव आला.

मित्रांनो, G20ची आपली अध्यक्षता ही लोकांची अध्यक्षता आहे, ज्यात लोकसहभागाची भावना सर्वात अग्रेसर आहे. जी २० चे जे ११ कार्यकारी गट होते, त्यात शिक्षणतज्ञ, महिला, नागरी समाज, युवावर्ग,  व्य़ावसायिक, आपले  संसद सदस्य आणि नागरी प्रशासन यांच्याशी जोडलेल्या लोकांनी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावली. याच्यासशी संबंधित जे आयोजन केले जात आहेत, त्यात कोणत्या ना कोँणत्या स्वरूपात जवळपास दीडकोटीहून जास्त लोक जोडले गेले आहेत. लोकसहभागाच्या आपल्या या प्रयत्नात एक नाही तर दोन दोन जागतिक विक्रम स्थापित झाले आहेत. वाराणसीत झालेल्याजी २०  प्रश्नमंजुषा कार्यक्रमात ८०० शाळांच्या सव्वालाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला हा विश्वविक्रम होता. तिथंच लंबानी कारागिरांनी कमाल केली.  450 कारागिरांनी 1800 अभूतपूर्व पॅचेसचं आश्चर्यजनक संकलन करून आपल्या कौशल्याचा आणि कलाकुसरीचा परिचय करून दिला. जी २० मध्ये आलेले सर्व प्रतिनिधी आपल्या कारागिरीतील वैविध्य पाहून आश्चर्यचकित झाले. असाच एक शानदारकार्यक्रम सुरत येथे आयोजित करण्यात आला. साडी वॉकॅथॉनमध्ये  १५ शहरांतील १५००० महिलांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमामुळे सुरतच्या वस्त्रोदयोगाला चालना तर मिळालीच, पण व्होकल फॉर लोकललाही बळ मिळालं आणि लोकलसाठी ग्लोबल होण्याचाही मार्ग सापडला. जी २० ची बैठक श्रीनगरमध्ये झाल्यानंतर तेथील पर्यटकांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. मी सर्वांना आवाहन करतो जी २० संमेलनाला यशस्वी करा, देशाचा मान वाढवा.

माझ्या परिवारातील सदस्यांनो, मन की बातच्या भागांमध्ये आपण नेहमीच आपल्या युवा पिढीच्या सामर्थ्याची चर्चा करत असतो. आज क्रीडा क्षेत्र असं आहे की ज्य़ात आपले युवक खेळाडू निरंतर नवीन यश मिळवत आहेत.

आज मन ती बात मध्य़े अशा एका क्रीडास्पर्धेची चर्चा करू या की ज्यात आपल्या खेळाडूंनी विजयाचा झेंडा फडकवला आहे. काही दिवसांपूर्वी चीनमध्ये विश्व विद्यापीठ स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत भारताची कामगिरी सर्वोत्कृष्ट राहिली. आपल्या खेळाडूंनी एकूण २६ पदकं जिंकली ज्यात ११ सुवर्ण पदकं होती. आपल्याला हे जाणून चांगलं वाटेल की १९५९ पासून आतापर्यंत जितके विश्व विद्यापीठ स्पर्धा झाल्या आहेत, त्यात आतापर्यंत जिंकलेल्या सर्व पदकांची संख्या मोजली तर ती  १८ च होते. इतक्या दशकांत केवळ १८ पदकं तर आता यावेळी देशानं २६ पदकं जिंकली आहेत. म्हणून विश्वविद्यापीठ स्पर्धेत पदकं जिंकलेले  काही खेळाडू,विद्यार्र्थी माझ्याशी फोन लाईनवर आहेत. सर्वात प्रथम आपल्याला सांगतो की उत्तरप्रदेशची रहिवासी असलेल्या प्रगतीने तिरंदाजी पदक जिंकलं आहे. आसामचा रहिवासी असेलेल्या अम्लाननं अथलेटिक्समध्ये पदक जिंकलं आहे.  उत्तरप्रदेशची रहिवासी असलेल्या प्रियांकानं रेसवॉकमध्ये पदक जिंकलं आहे. महाराष्ट्राची रहिवासी अभिज्ञानं नेमबाजीत पदक जिंकलं आहे.

पंतप्रधान मोदीः माझ्या प्रिय युवक खेळाडूंनो नमस्कार.

युवक खेळाडू:  नमस्कार. सर.

मोदी जीः मला तुमच्याशी चर्चा करून खूप छान वाटत आहे. आपण भारताचं नाव जगात चमकवलं आहे, म्हणून मी आपलं अभिनंदन करतो. आपण विश्वविद्यापीठ स्पर्धेत आपल्या कामगिरीनं प्रत्येक देशवासियांचीं मान अभिनामानाननं ताठ केली आहे. तर मी आपल्याला सर्वप्रथम आपलं अभिनंदन करतो.

प्रगती, मी या चर्चेची सुरूवात तुझ्यापासून करतो. दोनपदकं जिंकल्यानंतर आपण इथून गेलात तेव्हा याबाबत विचार केला होता काय़.. आणि इतका मोठा विजय संपादन केला तर आता काय वाटतं आहे...

प्रगतीः सर मला खूप अभिमान वाटत होता. मी माझ्य़ा देशाचा झेंडा इतका उंच फडकवून आले आहे, यामुळे मला खूप छान वाटत होतं. सुवर्ण पदकासाठीच्या लढाईत आम्ही हरलो तेव्हा मला खूप खेद वाटत होता. आता काही झालं तरीही आम्ही लढत गमावणार नव्हतो. हेच आमच्या मनात होतं. दुसर्या वेळेला हेच मनात होतं की काहीही झालं तरीही या झेंड्याला आता खाली जाऊ द्यायचं नाहीये. दरवर्षी आम्हाला सर्वाच उंचावर झेंड़ा फडकवूनच यायचं आहे. जेव्हा आम्ही शेवटच्या लढाईत जिंकलो तेव्हाच आम्ही तेथेच विजय साजरा करून आलो होतो. तो क्षण खूपच छान होता. इतकाअभिमान वाटत होता की त्याचा काही हिशोबच नाही.

मोदी जीः प्रगती आपल्याला तर खूप शारीरिक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यातून आपण मात करून वर आला आहात.

प्रगती : सर,  मे २०२२ ला मला ब्रेन हमरेज झाला होता, मी व्हेनटीलेटर वर होते, मी वाचेन कि नाही याची काही शाश्वती नव्हती. पण इतक होत कि, मला पुन्हा मैदानावर जाऊन उभ राहायचं आहे याची आतून हिम्मत होती.  मला वाचवण्यात सर्वात मोठा हात परमेश्वराचा आहे आणि त्यानंतर डॉक्टरांचा आहे आणि नंतर तिरंदाजीचा आहे.

मोदी : आपल्या बरोबर आमलान सुद्धा आहे. आमलान हे सांगा कि, अथलेटिक्समध्ये आपल्याला इतकी आवड कशी निर्माण झाली आणि आपण ती विकसित कशी केली.

आमलान: जी नमस्कार सर,

मोदी: नमस्कार नमस्कार

आमलान : सर,अथलेटिक्सममध्ये पहिल्यांदा इतकी आवड नव्हती. प्रथम मी फुटबॉल मध्ये जास्त रसघेत होतो. पण माझ्या भावाचा एक मित्र आहे त्याने मला सांगितले कि तुला अथलेटिक्सस्पर्धेत गेल पाहिजे, तर मी विचार केला ठीक आहे. राज्य स्पर्धा खेळलो, तिथे हरलो. पण मला पराभव चांगला वाटला नाही , अस करत करत मी अथलेटिक्समध्ये आलो. हळू हळू त्यातही मला आनद वाटू लागला, माझी आवड वाढली.

मोदी: आमलान जरा सांगा कि तुम्ही सराव कुठे केलात?

आमलान : जास्तीतजास्त सराव मी हैद्राबाद ला केला आहे. साई रेड्डी सरांच्या मार्ग्द्शानाखाली, त्यानंतर आम्ही भुवनेश्वरला स्तलांत्रित झालो. नंतर माझी व्यावसायिक सुरवात झाली.

मोदी: आपल्या बरोबर प्रियांका सुद्धा आहे, प्रियांका आपण वीस किलोमीटर रेसावाक संघाचा भाग होतात, सारा देश आपल्याला आज ऐकतो आहे.  या क्रीडा प्रकाराबद्दल लोक आपल्याकडून जाणून घेऊ इच्छितात. आम्हाला हे सांगा कि, या खेळासाठी कोणत्या प्रकारचे कौशल्य आवश्यक असत. आणि आपली कारकीर्द कुठून कुठे पोहचली आहे .

प्रियांका : माझा खेळ खूप अवघड आहे, कारण आमचे पाच परीक्षक उभे असतात , आम्ही पळालो तरीही ते आम्हाला काढून टाकतील, आम्ही गुढघा वाकवला तरी आम्हाला ते काढतील, मला तर वार्निंग आली होती. त्यानंतर मी माझ्या वेगाला इतक नियंत्रित केल कि मी ठरवले मला किमान इथून पदक तर जिंकायचं आहे कारण देशासाठी आम्ही इथे आलो आहोत. आम्हाला इथून रिक्त हस्ते जायचं नाही.

मोदी: जी पिताजी आणि भाऊ सर्व ठीक आहेत ना ?

प्रियांका : जी सर, सर्व छान आहेत, मी तर सर्वाना सांगते आपण इतक सर्वांना प्रेरित करता आम्हाला इतक छान वाटत.  विश्व विद्यापीठ क्रीडाना देशात इतक कोणी महत्व देत नाही. पण इतका पाठींबा मिळत असेल अगदी ऑलिंपिकप्रमाणे, प्रत्येक जण ट्विट करत आहे, आम्ही इतकी पदकं जिंकली आहेत. याला पण इतकी चालना मिळत आहे.

मोदी जीः प्रियंका, माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. आपण इतकं नाव  झळकवलं आहे. या आता अभिज्ञाशी आपण चर्चा करू या.

मोदी जीः अभिज्ञा, सांगा आपल्याबद्दल.

अभिज्ञाः सर  मूळची कोल्हापूर, महाराष्ट्राची आहे. नेमबाजीत २५ मीटर पिस्तुल आणि १० मीटर एअर पिस्तुल दोन्ही क्रीडाप्रकारात भाग घेत असते. माझे आईवडील शाळेत शिक्षक आहेत.  मी २०१५ मध्ये नेमबाजीची सुरूवात केली आणि  तेव्हा इतक्या सुविधा कोल्हापुरात मिळत नव्हत्या. बसने वडगावहून कोल्हापूरला जाण्यासाठी दीड तास लागत असे. दीड तास परत येण्यासाठी आणि सराव चार तासाचा. सहा तास तर येण्याजाण्यात जायचे आणि माझी शाळाही बुडत होती. नंतर ममी पपा मला म्हणाले की आम्ही तुला शनिवारी रविवारी शुटिंगसाठी घेऊन जात जाऊ. उरलेल्या  वेळात दुसरे खेळ करत जा. ममी पापा यांना खेळात खूप रस होता. पण ते काही करू शकले नाहीत. आर्थिक पाठिंबाही तितकासा  नव्हता. तितकी माहिती ही नव्हती. माझ्या आईचं एक स्वप्न होत मी देशाच प्रतिनिधित्व केलं पाहिजे आणि मग देशासाठी पदकंही  जिंकली पाहिजेत तर मी त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लहानपणापासून खेळातही खूप रुची घेत असे. नंतर मी तायक्वांदो शिकले. मी ब्लॅकबेल्ट आहे. मुष्टीयुद्ध आणि जुडो, तलवारबाजी, थाळीफेक अशा खेळातही भाग घेऊन 2015 मध्ये नेमबाजीत आले. दोन तीन वर्षे मी खूप संघर्ष केला आणि मलेशियात माझी निवड झाली, मला तिथे कांस्य पदक मिळाले. तिथून मला खूप प्रोत्साहन मिळालं.  माझ्या शाळेने माझ्यासाठी एक शुटींग रेंज बनवली . नंतर शाळेने मला प्रशिक्षणासाठी पुण्याला पाठवलं. मी आता गगन नारंग प्रतिष्ठान मध्ये आहे. गगन सरांनी मला चांगला पाठिंबा दिला.

मोदीजी : बरं, तुम्हा चौघांनाही मला काही सांगायचं असेल तर मला ऐकायला आवडेल. प्रगती आहे,  अम्लान आहे, प्रियांका आहे, अभिज्ञा आहे, तुम्ही सर्वजण माझ्याशी जोडलेले आहात, त्यामुळे तुम्हाला काही सांगायचे असेल तर मी नक्की ऐकेन.

अम्लान : सर, मला एक प्रश्न आहे सर.

मोदीजी : होय.

अम्लान : सर तुम्हाला सर्वात जास्त कोणता खेळ आवडतो?

मोदीजी : भारताने क्रीडा क्षेत्रात खूप चमकले पाहिजे आणि त्यामुळे मी या गोष्टींचा भरपूर प्रचार करत आहे, पण हॉकी, फुटबॉल, कबड्डी, खो-खो हे खेळ आपल्या मातीशी निगडीत आहेत. त्यामुळे त्यात तर आपण कधीही मागे राहता कामा नये. आणि मी पाहतोय की तिरंदाजी मध्ये, नेमबाजी मध्ये आपले खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. आणि दुसरं मी पाहतो आहे ते म्हणजे आमच्या तरुणपणात आणि कुटुंबातही खेळाबद्दलची भावना पूर्वीसारखी राहिलेली नाही. पूर्वी मुलं खेळायला जायची तर घराचे लोक त्यांना अडवायचे. पण आता काळ खूप बदलला आहे आणि तुम्ही सगळे जे यश मिळवून आणत आहात, त्यामुळे सर्व परिवारांना प्रोत्साहन मिळते आहे. प्रत्येक खेळात आज आपली मुले कुठे कुठे जातात, देशासाठी काही न काही करून येतात.  आणि ह्या बातम्या आज देशभरात ठळकपणे दाखवल्या जातात, सांगितल्या जातात आणि शाळा, महाविद्यालये ह्यातून ह्या बातम्यांविषयी चर्चा होत राहते. चला. तुमच्याशी बोलून मला खूप चांगले वाटले. तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. खूप खूप शुभेच्छा.

युवा खेळाडू : खूप खूप धन्यवाद! धन्यवाद साहेब! धन्यवाद

मोदीजी : धन्यवाद! नमस्कार |

माझ्या कुटुंबियांनो, यावेळी 15 ऑगस्टला देशाने 'सबका प्रयास’ - सर्वांचे प्रयत्न ह्यातील सामर्थ्य पाहिले. सर्व देशवासीयांच्या प्रयत्नाने 'हर घर तिरंगा अभियान' प्रत्यक्षात 'हर मन तिरंगा अभियान' झाले. या मोहिमेदरम्यान अनेक विक्रमही झाले. देशवासीयांनी करोडोंच्या संख्येने तिरंगा खरेदी केला. सुमारे दीड लाख पोस्ट ऑफिसेस मधून दीड कोटी तिरंग्यांची विक्री झाली. ह्यातून आमचे कामगार, विणकर आणि विशेषतः महिलांनीही शेकडो कोटी रुपये कमावले आहेत.

यावेळी देशवासियांनी तिरंग्यासोबत सेल्फी पोस्ट करण्याचा नवा विक्रम केला. गेल्या वर्षी १५ ऑगस्टपर्यंत सुमारे ५ कोटी देशवासियांनी तिरंग्यासोबत सेल्फी पोस्ट केल्या. या वर्षी त्या संख्येने 10 कोटींचा टप्पाही पार केला आहे.

मित्रांनो, सध्या देशात 'मेरी माती, मेरा देश' - ‘ माझी माती - माझा देश - ही देशभक्तीच्या भावनांना उजाळा देण्याची मोहीम जोरात सुरू आहे. सप्टेंबर महिन्यात देशातील प्रत्येक गावातून, प्रत्येक घरातून माती गोळा करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. देशातील पवित्र माती हजारो अमृत कलशांमध्ये जमा केली जाईल. ऑक्टोबर अखेरीस हजारोंच्या संख्येने अमृत कलश यात्रा देशाची राजधानी दिल्लीला पोहोचतील.  या मातीतून दिल्लीत अमृतवाटिका बांधण्यात येईल. मला विश्वास वाटतो आहे की प्रत्येक देशवासीयाच्या प्रयत्नांनी ही मोहीमही यशस्वी होईल.

माझ्या कुटुंबियांनो, यावेळी मला अनेक पत्रे संस्कृत भाषेतील मिळाली आहेत. याचे कारण म्हणजे श्रावण पौर्णिमा या तिथीला जागतिक संस्कृत दिन साजरा केला जातो.

सर्वेभ्य: विश्व-संस्कृत-दिवसस्य हार्द्य: शुभकामना: - सर्वांना जागतिक-संस्कृत-दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपणा सर्वांना जागतिक संस्कृत दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की संस्कृत ही जगातील सर्वात प्राचीन भाषांपैकी एक आहे. तिला अनेक आधुनिक भाषांची जननी देखील म्हटले जाते. संस्कृत भाषा आपल्या प्राचीनतेबरोबरच, भाषेची वैज्ञानिकता आणि व्याकरण ह्या साठी देखील प्रसिद्ध आहे.

भारताचे हजारो वर्षांचे प्राचीन ज्ञान संस्कृत भाषेतच जतन केले गेले आहे. योग, आयुर्वेद आणि तत्त्वज्ञानासारख्या विषयांवर संशोधन करणारे लोक आता जास्त करून संस्कृत शिकत आहेत. अनेक संस्थाही या दिशेने चांगले काम करत आहेत. जसे की संस्कृत प्रमोशन फाउंडेशन, योगासाठी संस्कृत, आयुर्वेदासाठी संस्कृत आणि बौद्ध धर्मासाठी संस्कृत ह्या सारखे अनेक पाठ्यक्रम - कोर्सेस करून घेतात. लोकांना संस्कृत शिकवण्यासाठी 'संस्कृत भारती' मोहीम चालवते. यामध्ये आपल्याला 10 दिवसांच्या 'संस्कृत संभाषण शिबिरात सहभागी होता येईल. मला आनंद वाटतो आहे की आज लोकांमध्ये संस्कृत विषयी जागरूकता आणि अभिमानाची भावना वाढली आहे. ह्याच्या पाठीमागे गेल्या काही वर्षांतील देशाच्या विशेष योगदानाचाही मोठा सहभाग आहे. जसे की तीन संस्कृत डीम्ड विद्यापीठांना 2020 मध्ये केंद्रीय विद्यापीठे करण्यात आली. वेग- वेगळ्या शहरांमध्ये संस्कृत विद्यापीठांची अनेक महाविद्यालये आणि संस्थादेखील चालू आहेत. आयआयटी आणि आयआयएम सारख्या संस्थांमध्ये संस्कृत केंद्रे बरीच लोकप्रिय होत आहेत.

मित्रांनो, अनेकदा तुम्ही एक गोष्ट अनुभवली असेल, आपल्या मुळांशी, आपल्या संस्कृतीशी, आपल्या परंपरेशी जोडण्यासाठी एक अतिशय शक्तिशाली माध्यम म्हणजे आपली मातृभाषा. जेव्हा आपण आपल्या

मातृभाषेशी जोडले जातो तेव्हा साहजिकच आपण आपल्या संस्कृतीशी जोडले जातो, आपल्या संस्कारांशी जोडले जातो,  आपल्या परंपरांशी जोडले जातो. आपल्या चिरंतन प्राचीन भव्य वैभवाशी जोडले जातो.

अशीच भारतातील आणखी एक मातृभाषा आहे, तेलुगू भाषा. 29 ऑगस्ट हा दिवस तेलुगु दिवस म्हणून साजरा केला जातो.

अन्दरिकी तेलुगू भाषा दिनोत्सव शुभाकांक्षलु | तेलुगु दिनानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

तेलुगू भाषेच्या साहित्यात आणि परंपरेत भारतीय संस्कृतीची अनेक मौल्यवान रत्ने दडलेली आहेत. तेलुगूच्या या वारशाचा लाभ संपूर्ण देशाला मिळावा यासाठी, अनेक प्रयत्नही केले जात आहेत.

माझ्या कुटुंबियांनो, 'मन की बात'च्या अनेक भागांमध्ये आपण पर्यटनाबद्दल बोललो आहोत.  काही गोष्टी किंवा ठिकाणे स्वतः प्रत्यक्ष पाहणे, समजून घेणे आणि काही काळ तिथे घालवणे हा एक वेगळाच अनुभव असतो. समुद्राचे कोणी कितीही वर्णन केले तरी समुद्र पाहिल्याशिवाय त्याची विशालता जाणवू शकत नाही. हिमालयाचे कोणी कितीही गुणगान करू दे, आपण प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्याचे सौंदर्य समजू शकत नाही. म्हणूनच मी नेहमी सर्वांना विनंती करतो की, जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपण आपल्या देशातील सौंदर्य आणि विविधता पाहण्यासाठी अवश्य भेट दिलीच पाहिजे.

अनेकदा आपण आणखी एक गोष्ट पाहतो की आपण जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन येतो पण आपल्या स्वतःच्या शहर किंवा राज्यातील अनेक उत्तमोत्तम ठिकाणांविषयी आणि गोष्टींबद्दल आपण अनभिज्ञ असतो.

अनेक वेळा असे घडते की लोकांना त्यांच्याच शहरातील ऐतिहासिक ठिकाणांबद्दल जास्त माहिती नसते. असेच काहीसे धनपालजींच्या सोबत झाले. धनपाल जी, बेंगळुरूमधील परिवहन कार्यालयात चालक म्हणून काम करायचे. सुमारे 17 वर्षांपूर्वी त्यांना साईटसीइंग विंग- स्थलदर्शन विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यालाच आता सर्वजण बंगलोर दर्शनी या नावाने ओळखतात. धनपाल जी पर्यटकांना शहरातील विविध पर्यटनस्थळी घेऊन जायचे. अशाच एका सहलीच्या वेळी एका पर्यटकाने त्यांना विचारले की बंगळुरूमध्ये टाकीला सेनकी टाकी का म्हणतात? आपल्याला ह्याप्रश्नाचे उत्तर माहित नाही याचं त्यांना खूप वाईट वाटलं. मग असेच त्यांनी स्वतःचे ज्ञान वाढवण्यावर भर दिला. आपला वारसा जाणून घेण्याच्या वेडापायी त्यांना अनेक दगड आणि शिलालेख सापडले. धनपाल जींचे मन या कामात इतके रमले - इतके रमले की त्यांनी एपिग्राफी मध्ये म्हणजेच शिला लेखांशी संबंधित विषयांत डिप्लोमादेखील केला. जरी ते आता निवृत्त झाले असले तरीपण इतिहास शोधण्याचा त्यांचा छंद आजही अबाधित आहे.

मित्रांनो, मला ब्रायन डी. खारप्राण ह्याच्या विषयी सांगताना अत्यंत आनंद होत आहे. ते मेघालय इथले निवासी आहेत आणि त्यांना Speleology (स्पेलियो-लॉजी) मध्ये खूप रस आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर त्याचा अर्थ आहे - गुहांचा अभ्यास. काही वर्षांपूर्वी ही आवड तेव्हा प्रथम निर्माण झाली जेव्हा त्यांनी अनेक कथांची पुस्तके वाचली. 1964 मध्ये त्यांनी शाळकरी मुलगा म्हणून आपली पहिली शोध मोहीम केली. 1990 मध्ये तो त्यांनी आपल्या मित्रांसोबत मिळून एक संघटना स्थापन केली आणि त्याद्वारे मेघालयमधील अज्ञात गुहांची माहिती शोधू लागले. पाहता पाहता त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत सोबत मेघालयातील 1700 हून अधिक गुंफा शोधल्या आणि मेघालय राज्याला जागतिक गुहा नकाशावर नेऊन ठेवले.

भारतातील काही सर्वात लांब आणि खोल गुहा मेघालयात आहेत. ब्रायन जी आणि त्यांच्या टीमने cave fauna म्हणजेच गुहांमधील अशा जीवसृष्टीचे दस्तऐवजीकरण केले आहे, जे इतरत्र जगात कोठेही आढळत नाहीत. या संपूर्ण टीमच्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. त्या सोबतच मी आपणा सर्वांना मेघालयच्या लेण्यांना भेट देण्याची विनंती करतो.

माझ्या कुटुंबियानो, तुम्हा सर्वांना माहिती आहेच की डेअरी क्षेत्र, आपल्या देशातील सर्वात महत्त्वाच्या क्षेत्रांपैकी एक आहे. आपल्या माता आणि बहिणींच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणण्यात तर ह्या क्षेत्राची महत्वाची भूमिका आहे. काही दिवसांपूर्वी मला गुजरातच्या बनास डेअरीच्या एका विशेष उपक्रमा विषयी माहिती मिळाली. बनास डेअरी, आशियातील सर्वात मोठी डेअरी मानली जाते. येथे सरासरी दररोज 75 लाख लिटर दुधावर प्रक्रिया केली जाते. या नंतर ते इतर राज्यांत देखील पाठवले जाते. इतर राज्यांमध्ये दूध वेळेवर पोचावे म्हणून, आतापर्यंत टँकर किंवा दुधाच्या गाड्यांची - मिल्क ट्रेन्स ची मदत घेतली जायची.पण ह्यांत देखील आव्हाने काही कमी नव्हती. एक म्हणजे लोडिंग आणि अनलोडिंगला खूप वेळ लागायचा.त्यात अनेक वेळा दूध खराबही व्हायचे. ह्या समस्येवर मात करण्यासाठी भारतीय रेल्वेने एक नवा प्रयोग केला. रेल्वेने पालनपूर ते नवीन रेवाडीपर्यंत ट्रक-ऑन-ट्रॅक ही सुविधा सुरू केली. यामध्ये दुधाचे ट्रक थेट रेल्वेवर चढवले जातात. म्हणजेच त्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या दूर झाली आहे. ट्रक ऑन ट्रॅक सुविधेचे परिणाम अतिशय समाधानकारक आहेत. पूर्वी दूध पोहोचायला जे 30 तास लागायचे ते आता निम्म्याहून कमी वेळात पोहोचत आहे. यामुळे एकीकडे इंधनामुळे होणारे प्रदूषण थांबले आहेच, तर दुसरीकडे इंधन खर्चातही बचत होत आहे. याचा मोठा फायदा ट्रक चालकांना होत आहे. त्यांचे जीवन सोपे झाले आहे.

मित्रांनो, सामूहिक प्रयत्नांमुळे आज आपल्या दुग्धशाळाही आधुनिक विचार करून पुढे जात आहेत. बनास डेअरीने पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दिशेने कसे एक पाऊल पुढे टाकले आहे ते सीडबॉल वृक्षारोपण अभियानातून कळून येते. वाराणसी मिल्क युनिअन - वाराणसी दूध संघ आपल्या डेअरी- (दुग्ध उत्पादक ) शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी खत व्यवस्थापनावर काम करते आहे. केरळच्या मलबार दूध संघ डेअरीचा प्रयत्नही अद्वितीय आहे. प्राण्यांच्या आजारांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे विकसित करण्यात ते मग्न आहेत.

मित्रांनो, आज अनेक लोक दुग्धव्यवसायाचा अवलंब करून त्यात विविधता आणत आहेत.  राजस्थानमधील कोटा येथे डेअरी फार्म चालवत असलेल्या अमनप्रीत सिंगबद्दल तर तुम्ही अवश्य जाणून घ्यायला हवे. त्यांनी दुग्धव्यवसाया बरोबरच बायोगॅसवरही लक्ष केंद्रित करून दोन बायोगॅस प्रकल्प उभारले. त्यामुळे त्यांचा विजेवरील खर्च सुमारे ७० टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यांचा हा प्रयत्न देशभरातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा आहे. आज अनेक मोठ्या डेअरीज बायोगॅसवर भर देत आहेत. या प्रकारचे समुदाय चालित मूल्यवर्धनाचे प्रकल्प अतिशय उत्साहवर्धक आहेत. मला विश्वास वाटतो की असे प्रकल्प देशभर नेहमी चालू राहतील.

माझ्या कुटुंबियांनो, आज मन की बातमध्ये एवढेच. आता सणांचा मौसमही आला आहे. तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या अग्रीम हार्दिक शुभेच्छा. उत्सव साजरा करताना व्होकल फॉर लोकल हा मंत्र लक्षात ठेवायला हवा. 'आत्मनिर्भर भारत' अभियान ही प्रत्येक देशवासियाची स्वतःची मोहीम आहे. आणि जेव्हा सणासुदीचा काळ असतो तेव्हा तर आपण आपली श्रद्धास्थानं आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवलाच पाहिजे. पण कायमही स्वच्छ ठेवला पाहिजे. पुढच्या वेळी पुन्हा तुमच्यासोबत मन की बात होईल, काही नवीन विषय घेऊन भेटेन.  आपल्या देशवासीयांच्या काही नवीन प्रयत्नांबद्दल, त्यांच्या यशाबद्दल तपशीलवार चर्चा केली जाईल. मग तो पर्यंत निरोप द्या. खूप खूप धन्यवाद. नमस्कार

***

N.Joshi/AIR/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1952642) Visitor Counter : 277