आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ईशान्य भारत क्षेत्रातील अग्रगण्य रुग्णालयांत, एकात्मिक आयुष औषधी विभाग सुरू करण्याचे केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे आवाहन


हिमालय क्षेत्रातील समृद्ध वनसंपदा आयुष क्षेत्रात नवनव्या संधी निर्माण करु शकेल, तसेच यातून रोजगार निर्मितीही होईल: सर्बानंद सोनोवाल

Posted On: 26 AUG 2023 2:14PM by PIB Mumbai

* राष्ट्रीय आयुष मिशन संदर्भात प्रादेशिक आढावा बैठकीला ईशान्य भारत क्षेत्रातील सर्व मंत्र्यांची उपस्थिती

* मानवी जीवनाची एकूणच गुणवत्ता वाढवण्यासाठी आरोग्यविषयक उपाययोजनांची सर्वंकष व्यवस्था विकसित करण्यासाठी आधुनिक औषधशास्त्रासोबत पारंपरिक औषधीमध्ये गुंतवणूक, नवोन्मेष आणि एकात्मिक अध्ययन करावे: सर्बानंद सोनोवाल

* अरुणाचल प्रदेशात लवकरच आयुष आरोग्य सेवा संचालनलयाची सुरुवात: आलो लिबांग

* लोकटाक लेक च्या मध्यभागी विशेष पंचकर्म केंद्र सुरू केले जाणार: डॉ. सपम राजन सिंह

 

ईशान्य भारतातील राज्यांच्या राष्ट्रीय आयुष मिशन संदर्भात प्रादेशिक आढावा बैठकीचे उद्घाटन, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासह आसामचे मुख्यमंत्री डॉ हिमंता बिस्वा सरमा यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत करण्यात आले. या कार्यक्रमाला आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम आणि त्रिपुराच्या आरोग्य मंत्र्यांसह मेघालय, नागालँड तसेच या क्षेत्रातील इतर राज्यांतील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

केंद्रीय आयुष मंत्री, सर्बानंद सोनोवाल या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. बैठकीदरम्यान, आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या सर्व सहभागी राज्यांनी आयुष राज्ये आणि अंमलबजावणी अंतर्गत आयुष कार्यक्रमांच्या प्रगतीबद्दल तपशीलवार सादरीकरणे केली.

या बैठकीविषयी माहिती देतांना सर्बानंद सोनोवाल म्हणाले, आज आम्ही देशात आयुष पद्धतीच्या प्रचार आणि प्रसारावर खूप फलदायी चर्चा केली. उर्वरित जगाप्रमाणेच, आपल्या हिमालय क्षेत्रातही पारंपरिक औषध पद्धतीचे महत्त्व आणि लोकप्रियता लक्षणीयरीत्या वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, भारताने आज लोकांचे जीवनमान समृद्ध करण्यासाठी पारंपारिक औषध पद्धतीचे जुने आणि सिद्ध फायदे पुन्हा शोधण्यात लक्षणीय प्रगती केली आहे. मोदी यांनी केवळ पारंपारिक औषधांच्या वापराला प्रोत्साहन दिले नाही; तर आरोग्य सेवाविषयक उपाययोजनांची सर्वांगीण श्रेणी विकसित करण्यासाठी पारंपारिक औषधांमध्ये गुंतवणूक, नवनवीन शोध आणि आधुनिक औषधांसोबत एकीकरण करण्यासाठीच्या जागतिक चळवळीचे ते नेतृत्वही करत आहेत. याच भावनेतून, पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील 19 एम्स मध्ये एकात्मिक आयुष विभाग सुरू केले आहेत. या अनुषंगाने, मला ईशान्य भारतातील सर्व राज्यांना असे आवाहन करायचे आहे की त्यांनीही आपापल्या राज्यातील सर्व प्रमुख आणि प्रसिद्ध रुग्णालयांमधे, एकात्मिक आयुष विभाग सुरू करण्याविषयी चाचपणी करावी. आज आमच्या सर्व आघाडीच्या राज्य-रुग्णालयांमध्ये एकात्मिक औषध विभाग स्थापन करण्यासाठी चळवळ सुरू करण्याची ही अभिनव संधी आमच्यासमोर आहे, ज्यामुळे संपूर्ण देशामध्ये एकात्मिक औषधाची संकल्पना लोकप्रिय आणि अंमलात आणली जाईल. पारंपारिक वैद्यक पद्धतींना आणखी चालना देऊन आणि आपल्या देशातील, विशेषत: हिमालयीन क्षेत्रात रोजगार आणि व्यापाराला चालना देऊन, आयुषच्या नेतृत्वाखालील आर्थिक विकासाचे केंद्र बनून आम्ही मोदीजींच्या दूरदृष्टीची जाणीव करू शकतो, असे सोनोवाल यावेळी म्हणाले.

या चर्चेदरम्यान, अरुणाचल प्रदेशचे आरोग्य मंत्री, अलो लिबांग यांनी सांगितले की माणिपूरमध्ये पारंपारिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी आयुष आरोग्य सेवा संचालनालय स्थापन करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. लोकटक तलावाच्या मध्यभागी एक विशेष पंचकर्म केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव, मणिपूरचे आरोग्य मंत्री डॉ सपम रंजन सिंग यांनी यावेळी मांडला.

मिझोरमचे आरोग्य मंत्री, डॉ आर लालथांगलियाना यांनी देखील पारंपारिक औषधांच्या बाबतीत त्यांच्या राज्यात सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

***

M.Pange/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1952536) Visitor Counter : 144