पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांचे भारतात परतल्यानंतर बेंगळुरूतील एचएएल विमानतळाबाहेर जोरदार स्वागता प्रसंगीचे भाषण

Posted On: 26 AUG 2023 8:13AM by PIB Mumbai

भारत माता की जय, भारत माता की जय!

भारत माता की जय, भारत माता की जय!

भारत माता की जय!

कृपया माझ्यासोबत हा नारा द्या, जय जवान - जय किसान, जय जवान - जय किसान,

पुढे मी आणखी काही तरी बोलणार आहे. मी जय विज्ञान म्हणेन आणि तुम्ही जय अनुसंधान म्हणाल. जय विज्ञान – जय अनुसंधान, जय विज्ञान - जय अनुसंधान, जय विज्ञान - जय अनुसंधान! जय जवान – जय किसान, जय जवान – जय किसान, जय विज्ञान - जय अनुसंधान, जय विज्ञान - जय अनुसंधान, जय विज्ञान - जय अनुसंधान!

बेंगळुरूमधील सुंदर सूर्योदय आणि हे अप्रतिम दृश्य पाहून जेव्हा देशातील शास्त्रज्ञ देशाला एवढी मोठी देणगी देतात, आणि एवढी उल्लेखनीय कामगिरी करतात, तेच दृश्य मी ग्रीसमध्येही पाहिले जे मी आज बेंगळुरूमध्ये पाहत आहे. आणि जोहान्सबर्ग आणि जगाच्या कानाकोपऱ्यात हीच परिस्थिती होती. भारतीय विज्ञानावर विश्वास ठेवणारे, भविष्य पाहू शकणारे च नव्हे, तर मानव कल्याणासाठी वाहिलेले इतर सगळेही अशा उत्साहाने आणि उल्हासाने भरलेले आहेत. तुम्ही सकाळी लवकर इथे आलात. मी इथून खूप दूर परदेशात असल्यामुळे मी स्वत:ला रोखू शकलो नाही. त्यामुळे मला वाटले की, भारतात परतल्यावर त्या शास्त्रज्ञांना सलाम करण्यासाठी मी सर्वप्रथम बेंगळुरूला जावे. आता एवढ्या लांब पल्ल्याचा प्रवास करताना कधी कधी काही मिनिटांचा उशीर होतो. मी इथल्या आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपालांना विनंती केली होती की, इतक्या पहाटे कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची तसदी घेऊ नका, कारण शास्त्रज्ञांना सलाम करून मी लगेच निघणार आहे. म्हणून मी त्यांना विनंती केली होती; जेव्हा मी औपचारिकपणे कर्नाटकात येईन, तेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रोटोकॉल पाळू शकतील. त्यांनी सहकार्य केले आणि मी त्यांचे आभार मानतो.
मित्रांनो,

इथे माझे भाषण देण्याची ही वेळ नाही, कारण मी त्या शास्त्रज्ञांना भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे. पण मी तुमचे आभार मानतो कारण बेंगळुरूचे लोक अजूनही तो क्षण मोठ्या जोमाने आणि उत्साहाने अनुभवत आहेत. मला इथे सकाळी लहान मुलंही दिसतात. ते भारताचे भवितव्य आहेत. माझ्याबरोबर पुन्हा बोला; भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, जय जवान-जय किसान, जय जवान-जय किसान, जय जवान-जय किसान। आता, जय विज्ञान - जय अनुसंधान, जय विज्ञान - जय अनुसंधान, जय विज्ञान - जय अनुसंधान, जय विज्ञान – जय अनुसंधान, जय विज्ञान – जय अनुसंधान!

मित्रांनो, मनःपूर्वक धन्यवाद.

***

S.Thakur/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1952388) Visitor Counter : 127