पंतप्रधान कार्यालय

ग्रीसच्या पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या ‘बिझनेस  लंच’ मध्ये पंतप्रधानांनी उद्योजकांबरोबर साधला  संवाद

Posted On: 25 AUG 2023 8:31PM by PIB Mumbai

 

अथेन्स येथे ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांनी  25 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित केलेल्या बिझनेस लंचला पंतप्रधान  नरेंद्र मोदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात नौवहन , पायाभूत सुविधा, ऊर्जा, यासह विविध क्षेत्रातील आघाडीच्या भारतीय आणि ग्रीक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा  सहभाग होता.

आपल्या भाषणादरम्यान, पंतप्रधानांनी नवीकरणीय ऊर्जा, स्टार्टअप्स, औषध उत्पादन , माहिती तंत्रज्ञान  डिजिटल पेमेंट आणि पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रात भारताची प्रगती आणि व्यवसायाला चालना देण्यासाठी हाती घेतलेल्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला.द्विपक्षीय संबंध बळकट  करण्यात आणि भारत आणि ग्रीसमधील आर्थिक सहकार्याला चालना देण्यासाठी या उद्योजकांनी बजावलेली  भूमिका त्यांनी अधोरेखित केली.

पंतप्रधानांनी उद्योगपतींना भारतातील गुंतवणुकीच्या संधींचा लाभ गणेयासाठी  आणि भारताच्या विकासगाथेचा  एक भाग होण्यासाठी प्रोत्साहित केले.

या कार्यक्रमात खालील मुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी झाले होते.

 

 अनु.क्र

 कंपनी

   कार्यकारी

1.

एल्पेन

थिओडोर . ट्रायफॉन, सीओ /सीईओ

2.

गेक टेरना ग्रुप

जॉर्जिओस पेरिस्टेरिस, संचालक मंडळ अध्यक्ष

3.

नेपच्युन्स लाइन्स शिपिंग आणि मॅनेजिंग एंटरप्राइजेस एस. .

मेलिना ट्रॅव्हलो, संचालक मंडळ  अध्यक्ष

4.

चिपिता  एस.

स्पायरोस थियोडोरोपौलोस, संस्थापक

5.

युरोबँक  एस..

फोकिओन कराविअस, मुख्य कार्यकारी अधिकारी

6.

टेम्स   एस..

अकिलीस कॉन्स्टँटाकोपोलोस, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी

7.

मायटिलिनोस समूह

इव्हान्जेलोस मायटिलिनोस, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी

8.

टायटन सिमेंट समूह

दिमित्री पापालेक्सोपौलोस, संचालक मंडळ  अध्यक्ष

9.

इंटास फार्मास्युटिकल्स

बिनिश चुडगर, उपाध्यक्ष

10.

ईईपीसी

अरुण गरोडिया, अध्यक्ष

11.

एमक्युअर  फार्मास्युटिकल्स

समित मेहता, व्यवस्थापकीय संचालक  आणि मुख्य कार्यकारी अधिकारी

12.

जीएमआर समूह

श्रीनिवास बोम्मीदला, समूह संचालक

13.

आयटीसी

संजीव पुरी, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

14.

युपीएल

विक्रम श्रॉफ, संचालक

15.

शाही एक्सपोर्ट्स  

हरीश आहुजा, व्यवस्थापकीय संचालक

***

S.Bedekar/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1952313) Visitor Counter : 100