आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताचे G20 अध्यक्षपद
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते इंडिया मेडटेक एक्सपो 2023 चे उद्घाटन
भारताला "जगाची फार्मसी" म्हणून ओळखले जाते. आता भारताने वैद्यकीय उपकरणांच्या क्षेत्रात नेतृत्व करण्याची आणि परवडणारी, अभिनव आणि दर्जेदार वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीमध्ये अव्वल बनण्याची वेळ आली आहे: डॉ मांडविया
भारतीय मेडटेक क्षेत्राने आपला विकास आणि उत्कृष्टता यांना गती दिली असून आता जागतिक स्तरावर व्याप्ती , गुणवत्ता आणि पोहोच या दृष्टीने जलद गतीने वाटचाल करण्याच्या वळणावर आहे: डॉ व्ही के पॉल
Posted On:
17 AUG 2023 4:36PM by PIB Mumbai
"जगाची फार्मसी” म्हणून भारताला ओळखले जाते. आता भारताने वैद्यकीय उपकरणांच्या क्षेत्रात पुढे येण्याची आणि परवडणारी, अभिनव आणि दर्जेदार वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीमध्ये नेतृत्व करण्याची वेळ आली आहे” असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी केले. G20 आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीच्या निमित्ताने गुजरातमधील गांधीनगर येथे 'इंडिया मेडटेक एक्स्पो 2023' या भारताच्या पहिल्या वैद्यकीय तंत्रज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते आज बोलत होते.
डॉ. मांडविया म्हणाले की, “मेडटेक एक्स्पो 2023 भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेने प्रेरित आहे. भारतीय वैद्यकीय उपकरणे परिसंस्थेचे सामर्थ्य आणि क्षमता प्रदर्शित करण्याचे हे एक वैशिष्ट्यपूर्ण, सर्वसमावेशक व्यासपीठ ठरेल.” उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये भारत ही वैद्यकीय उपकरणांची सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
"वैद्यकीय उपकरण क्षेत्रात स्वयंपूर्ण बनणे आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हे आमचे ध्येय असून आत्मनिर्भर भारत आणि "मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड" च्या आपल्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे असे केंद्रीय मंत्री म्हणाले. वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीसाठी स्वयंचलित मार्गाने 100% पर्यंत थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी आहे.”
या क्षेत्रांतर्गत केंद्र सरकारने हाती घेतलेल्या नवीन उपक्रमांचा उल्लेख करताना डॉ मांडविया म्हणाले की, “राष्ट्रीय वैद्यकीय उपकरण धोरण 2023 व्यतिरिक्त, देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी तसेच वैद्यकीय उपकरणांसाठी चाचणी सुविधा बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने अलिकडेच वैद्यकीय उपकरणांसाठी निर्यात-प्रोत्साहन परिषद आणि वैद्यकीय उपकरण क्लस्टरच्या सहाय्यासाठी एक योजना सुरू केली आहे. "
वैद्यकीय उपकरणांच्या देशांतर्गत निर्मितीला चालना देण्यासाठी वैद्यकीय उपकरणांच्या चार लक्ष्यित विभागांसाठी 3,420 कोटी रुपयांच्या एकूण खर्चासह उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आली (पीएलआय) असे त्यांनी सांगितले.
डॉ. मांडविया म्हणाले की, भारतातील वैद्यकीय उपकरण क्षेत्रातील स्टार्ट-अप परिसंस्था वैविध्यपूर्ण आणि ऊर्जाशील आहे, ज्यामध्ये 250 हून अधिक संस्था महत्त्वाच्या आरोग्यविषयक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी अभिनव संशोधन करत आहेत.
"भारतीय मेडटेक क्षेत्राने आपला विकास आणि उत्कृष्टता यांना गती दिली असून आता जागतिक स्तरावर व्याप्ती, गुणवत्ता आणि पोहोच या दृष्टीने जलद गतीने वाटचाल करण्याच्या टप्प्यावर आहे " असे डॉ व्ही के पॉल यांनी अधोरेखित केले. केंद्र सरकारची धोरणे आरोग्य क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने देशात एक परिसंस्था निर्माण करण्यावर केंद्रित असल्याचे त्यांनी नमूद केले. केंद्र सरकारने अलिकडेच सुरू केलेल्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेमुळे औषध निर्मितीबरोबरच वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीसाठी एपीआयच्या (सक्रिय औषधी घटक) उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात मदत झाली आहे असे ते म्हणाले.
***
S.Thakur/S.Kane/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1950061)
Visitor Counter : 128