पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी भारत दौर्यावर आलेले जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांचे केले स्वागत
गुजरातमधील गांधीनगर येथे होणाऱ्या पारंपारिक औषधांवरील जागतिक आरोग्य संघटना शिखर परिषदेत डॉ. टेड्रोस होणार सहभागी
प्रविष्टि तिथि:
16 AUG 2023 4:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांचे भारतात स्वागत केले आहे. मोदी यांनी डॉ टेड्रोस यांच्यासाठी 'तुलसीभाई' हे नाव वापरले, जे पंतप्रधानांनी त्यांच्या मागील भारतभेटी दरम्यान महासंचालकांना दिले होते.
डॉ. टेड्रोस 17-18 ऑगस्ट 2023 रोजी गुजरातमधील गांधीनगर येथे पारंपारिक औषधांवरील जागतिक आरोग्य संघटना शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.
आयुष मंत्रालयाच्या ट्विट संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
“माझे प्रिय मित्र तुलसीभाई हे नवरात्रीसाठी उत्तम तयारी करून आले आहेत ! भारतात आपले स्वागत आहे @DrTedros !”
* * *
S.Kakade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1949443)
आगंतुक पटल : 181
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam