पंतप्रधान कार्यालय
सरकारवरच्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 ऑगस्ट 2023 ला लोकसभेत दिलेले उत्तर
Posted On:
10 AUG 2023 11:12PM by PIB Mumbai
सन्माननीय अध्यक्ष महोदयजी,
गेले तीन दिवस अनेक वरिष्ठ आदरणीय सदस्यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत.जवळपास सर्वांचे विचार विस्ताराने माझ्यापर्यंत पोहोचलेही आहेत. मी स्वतः काही भाषणे ऐकली आहेत. सन्माननीय अध्यक्ष जी, देशातल्या जनतेने आमच्या सरकार प्रती वारंवार जो विश्वास दर्शवला आहे, आज देशातल्या कोट्यवधी नागरिकांचे आभार मानण्यासाठी मी उपस्थित आहे. अध्यक्ष जी, देव दयाळू आहे आणि देवाच्या मनात असेल तर तो कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्या इच्छेची पूर्तता करतो, कोणाला ना कोणाला तरी माध्यम करतो असे म्हणतात.मी हा देवाचा आशीर्वाद मानतो की ईश्वराने विरोधकांना प्रस्ताव मांडण्याचे सूचित केले आणि त्यांनी हा प्रस्ताव आणला. 2018 मध्येही हा ईश्वराचाच आदेश होता जेव्हा विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्या वेळीही मी सांगितले होते की अविश्वास प्रस्ताव आमच्या सरकारची शक्ती परीक्षा नाही तर त्यांचीच शक्ती परीक्षा आहे,आणि तसेच झाले, जेव्हा मतदान झाले तेव्हा विरोधकांकडे जितकी मते होती तेव्हढी मते त्यांना जमवता आली नाहीत. इतकेच नव्हे तर जनमताचा कौल घेतला तेव्हा जनतेने संपूर्ण शक्तीनिशी विरोधकांसाठी अविश्वास जाहीर केला आणि निवडणुकीत एनडीएलाही जास्त जागा मिळाल्या आणि भाजपालाही जास्त जागा मिळाल्या.म्हणजेच एका प्रकारे विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ असतो, आणि आज मी पहात आहे आपण निश्चय केला आहे की एनडीए आणि भाजप 2024 च्या निवडणुकीत,मागचे सारे विक्रम मोडत विक्रमी विजय प्राप्त करत जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा येईल.
माननीय अध्यक्ष जी,
विरोधकांच्या प्रस्तावावर इथे तीन दिवस वेगवेगळ्या विषयांवर बरीच चर्चा झाली.अधिवेशनाच्या सुरवातीपासूनच विरोधकांनी गांभीर्याने सदनाच्या कामकाजात भाग घेतला असता तर चांगले झाले असते. मागच्या दिवसात या सदनाने आणि आपल्या दोन्ही सदनांनी जनविश्वास विधेयक, मध्यस्थ विधेयक,दंतवैद्यक आयोग विधेयक,आदिवासींशी संबंधित विधेयक,डिजिटल डेटा संरक्षण विधेयक,राष्ट्रीय रिसर्च फाउंडेशन विधेयक, किनारी जलजीव संस्कृतीशी संबंधित विधेयक अशी अनेक महत्वाची विधेयके संमत केली.यामध्ये असे एक विधेयक आहे जे आपल्या मच्छिमार बांधवांच्या हक्कांसाठी होते आणि केरळला त्याचा सर्वात जास्त लाभ होणार असल्याने केरळमधल्या खासदारांकडून अधिक अपेक्षा होती. कारण अशा विधेयकांवर तरी त्यांनी योग्य रीतीने सहभागी व्हावे मात्र राजकारण वरचढ ठरल्याने त्यांना मच्छीमारांची चिंता उरली नाही.
इथे राष्ट्रीय रिसर्च फाउंडेशन विधेयक मांडले होते.देशाच्या युवा शक्तीच्या आशा- आकांक्षांना नवी दिशा देणारे हे विधेयक होते.विज्ञान क्षेत्रात सामर्थ्यवान ताकद म्हणून भारत कसा पुढे येईल याबाबत दूरदृष्टी ठेवत विचार करण्यात आला होता त्यालाही तुमची हरकत.डिजिटल डेटा संरक्षण हे विधेयक आपल्या देशाच्या युवकांच्या आकांक्षेत प्राधान्य असलेल्या बाबीशी निगडीत होते.येणारा काळ हा तंत्रज्ञानाचे वर्चस्व असलेला काळ आहे. आज डाटा म्हणजे एक प्रकारे दुसरे इंधन, दुसरे सोने म्हणून मानले जाते, अशा विषयावर किती गंभीर चर्चा आवश्यक होती.मात्र तुमच्यासाठी राजकारणाला प्राधान्य होते. अनेक विधेयके अशी होती जी गावांसाठी, गरिबांसाठी,दलित,मागास,आदिवासींसाठी,त्यांच्या कल्याणावर चर्चेसाठी होती. त्यांच्या भविष्याशी निगडीत होती.मात्र यांना त्यामध्ये स्वारस्य नव्हते.देशाच्या जनतेने यांना ज्या कामासाठी निवडून दिले आहे त्या जनतेचा यांनी विश्वासघात केला आहे. काही विरोधी पक्षांच्या सदस्यांनी त्यांच्या आचरणातून, त्यांच्या व्यवहारातून हे सिद्ध केले आहे की देशापेक्षा त्यांच्या पक्षाला त्यांचे प्राधान्य आहे. त्यांच्यासाठी देशापेक्षा त्यांचा पक्ष मोठा आहे,देशापेक्षा त्यांचे प्राधान्य त्यांच्या पक्षाला आहे.तुम्हाला गरिबांची चिंता नाही,सत्तेची लालसा आहे.देशाच्या युवकांच्या भविष्याची तुम्हाला चिंता नाही, तुमच्या राजकीय भविष्याची तुम्हाला चिंता आहे.
आणि माननीय अध्यक्ष जी,
विरोधकांनी एकत्र येत एक दिवस सदनाचे कामकाज होऊ दिले,कोणत्या कामासाठी ? तुमची एकजूट अविश्वास प्रस्तावासाठी होती ? आणि तुमचे भ्रष्ट सहकारी नाईलाजाने आले आणि या अविश्वास प्रस्तावावर तुम्ही चर्चा कशी केली ? मी पाहतोय सोशल मिडियाचे तुमचे समर्थकदेखील दुःखी आहेत, ही तुमची परिस्थिती आहे.
आणि अध्यक्ष जी, या चर्चेची मजा पहा, फिल्डिंग विरोधकांनी लावली मात्र चौकार आणि षटकारांची आतषबाजी झाली ती आमच्याकडून. विरोधक अविश्वास प्रस्तावावर नो बॉल वर नो बॉल टाकत राहिले आणि इकडून शतक होत राहिले आणि तिकडून नो बॉल सुरुच राहिले.
अध्यक्ष महोदयजी,
विरोधी पक्षातल्या सदस्यांना मी सांगू इच्छितो की आपण तयारी करून का येत नाही ?थोडे परिश्रम घ्या, मी तुम्हाला मेहनत करण्यासाठी पाच वर्षे दिली, 2018 मध्ये सांगितले होते की 23 मध्ये या, 5 वर्षही तुम्ही करू शकला नाहीत, काय परिस्थिती आहे तुमची, काय दारिद्र्य आहे.
सन्माननीय अध्यक्ष जी,
विरोधी पक्षातल्या आमच्या मित्रांना दिखाऊपणाची फारच इच्छा आहे आणि ते स्वाभाविकही आहे. मात्र तुम्ही हे विसरू नका की देशही तुम्हाला पहात आहे.तुमचा एक-एक शब्द लक्षपूर्वक ऐकत आहे. मात्र तुम्ही प्रत्येक वेळी निराशेशिवाय काहीच दिले नाही, आणि विरोधकांच्या वृत्तीबद्दल मी म्हणेन ज्यांचा स्वतःचा ताळेबंदच चुकलेला आहे, ज्यांचा स्वतःचा ताळेबंदच नीट नाही ते आमच्याकडून आमचा हिशेब मागत फिरत आहेत.
माननीय अध्यक्ष जी,
या अविश्वास प्रस्तावामध्ये अशा काही विचित्र बाबी दिसून आल्या आहेत ज्या याआधी ना कधी ऐकल्या आहेत,ना कधी पाहिल्या आहेत आणि ना कधी कल्पना केल्या आहेत.सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याचे, चर्चेत सहभागी होणाऱ्या नेत्यांच्या सूचीमध्ये नावच नव्हते.मागची उदाहरणे आपण पहा.1999 मध्ये वाजपेयी सरकारवर अविश्वास प्रस्ताव आला. तेव्हा शरद पवार यांनी चर्चेचे नेतृत्व केले. 2003 मध्ये अटल जी यांचे सरकार होते,सोनिया जी विरोधी पक्षांच्या नेत्या होत्या, त्यांनी प्रथम येत अविश्वास प्रस्ताव मांडला. 2018 मध्ये खरगे जी विरोधी पक्ष नेता होते, त्यांनी विषय पुढे नेला. मात्र या वेळी अधीर बाबू यांची परिस्थिती काय झाली, त्यांच्या पक्षाने त्यांना बोलण्याची संधी दिली नाही. काल अमित भाई यांनी सांगितले की ठीक वाटत नाही.आणि आपण उदारपणाने, त्यांची वेळ संपल्यानंतरही त्यांना आज संधी दिली.मात्र हाती आलेल्या संधीचे सोने करण्याऐवजी त्याची माती करण्यात हे माहीर आहेत. तुमची विवशता काय आहे मला माहित नाही.काय अधीरबाबू,का बाजूला सारले गेले ? माहित नाही कोलकाता मधून एखादा फोन आला असेल आणि कॉंग्रेस वारंवार त्यांचा अपमान करत आहे. कधी निवडणुकीच्या नावाखाली त्यांना अस्थायी स्वरुपात सदनाच्या नेते पदावरून हटवते. अधीर बाबू यांचे दुःख आम्ही समजू शकतो.सुरेश जी जरा मोठ्याने हसा.
सन्माननीय अध्यक्ष जी,
कोणत्याही देशाच्या इतिहासात एक काळ असा येतो जेव्हा तो देश जुन्या श्रुंखला तोडत नव्या उर्जेने,नव्या उमेदीने, नवी स्वप्ने घेऊन,नवे संकल्प घेऊन आगेकूच करण्यासाठी पाऊले उचलतो.21 व्या शतकाचा हा कालखंड आणि लोकशाहीच्या या पवित्र मंदिरात मी गांभीर्याने आणि दीर्घ अनुभवाअंती बोलत आहे,या शतकाचा हा भारतासाठी असा कालखंड आहे ज्यात प्रत्येक स्वप्नांची पूर्तता करण्याची संधी आपल्याकडे आहे. आपण सर्व अशा कालखंडात आहोत मग आम्ही असू,तुम्ही असू देत,देशातली कोट्यवधी जनता असू दे. हा कालखंड अतिशय महत्वाचा आहे. बदलणाऱ्या जगामध्ये आणि या शब्दांमध्ये मी अतिशय आत्मविश्वासाने हे सांगेन की या कालखंडात जे काही घडेल त्याचा प्रभाव या देशावर येणाऱ्या 1000 वर्षांपर्यंत राहणार आहे. 140 कोटी देशवासी त्यांचा पुरुषार्थ, या कालखंडामध्ये आपल्या पराक्रमाने आपल्या पुरुषार्थाने आपल्या शक्तीने आपल्या सामर्थ्याने जे करेल, त्यामुळे आगामी काळातील 1000 वर्षांचा मजबूत पाया घातला जाणार आहे आणि म्हणूनच या कालखंडात आपल्या सर्वांचे हे उत्तरदायित्व आहे, खूपच मोठी जबाबदारी आहे आणि अशा काळात आपल्या सर्वांचे लक्ष केवळ एकाच गोष्टीवर केंद्रित असले पाहिजे ते म्हणजे देशाचा विकास. देशाच्या लोकांची स्वप्ने पूर्ण करण्याचा संकल्प आणि या संकल्पांना सिद्धी पर्यंत घेऊन जाण्यासाठी आपले सर्व काही अर्पण करून झोकून दिले पाहिजे, हीच काळाची गरज आहे. 140 कोटी देशवासी, या भारतीय समुदायाची सामूहिक ताकद आपल्याला त्या उंचीवर घेऊन जाऊ शकते. आपल्या देशाच्या युवा पिढीचे सामर्थ्य, आज जगाने ज्याची क्षमता मान्य केली आहे त्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आपली युवा पिढी जी काही स्वप्ने पाहत आहे, त्या स्वप्नांना संकल्पासह प्रत्यक्षात साध्य करण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. आणि म्हणूनच,
माननीय अध्यक्ष महोदय,
2014 मध्ये तीस वर्षानंतर देशातल्या जनतेने पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन केले आणि 2019 मध्ये देखील आधीच्या कामगिरीचा कल विचारात घेत, आपल्या स्वप्नांना साकार करण्याचे सामर्थ कुठे आहे त्यांच्या संकल्पांना पूर्ण करण्याची ताकद कोणामध्ये आहे हे देशाने खूप चांगल्या प्रकारे ओळखले आहे आणि म्हणूनच 2019 मध्ये पुन्हा एकदा आम्हा सर्वांना सेवा करण्याची संधी दिली आणि अधिक जास्त ताकदीने दिली.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
या सदनात बसलेल्या प्रत्येक व्यक्तीची ही जबाबदारी आहे की तो भारताच्या युवा वर्गाच्या स्वप्नांना, त्यांच्या महत्त्वाकांक्षांना, त्यांच्या आशा अपेक्षा यानुसार त्यांना जे काम करण्याची इच्छा आहे त्यासाठी आपण त्यांना संधी दिली पाहिजे. सरकारमध्ये असताना आम्ही सुद्धा हे उत्तरदायित्व पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. आम्ही भारताच्या युवा वर्गाला घोटाळ्यांपासून मुक्त सरकार दिले आहे. आम्ही भारताच्या युवा वर्गाला आजच्या आपल्या व्यावसायिकांना खुल्या आकाशात विहार करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. आम्ही जगात भारताची पत कमी झाली होती ती देखील सुधारली आहे आणि पुन्हा एकदा तिला नव्या उंचीवर घेऊन गेलो आहोत. अजूनही काही लोक हा प्रयत्न करत आहेत की जगात आपली प्रतिमा मलीन व्हावी, पण जगाने आता आपल्या देशाला ओळखले आहे, जगाच्या भवितव्यासाठी भारत कशा प्रकारे योगदान देऊ शकतो, याविषयी जगाचा आपल्यावरील विश्वास वाढला आहे.
आणि या काळात आमच्या विरोधी सहकाऱ्यांनी काय केले, जेव्हा इतके अनुकूल वातावरण, चारही बाजूंनी संधीच-संधी असताना, अविश्वास प्रस्तावाच्या आडून जनतेचा आत्मविश्वास भंग करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. आज भारताचा युवा वर्ग विक्रमी संख्येने नव्या स्टार्टअपसह जगाला चकित करत आहे. आज भारतात विक्रमी परदेशी गुंतवणूक येत आहे. आज भारताची निर्यात नवी शिखरे गाठत आहे. पण हे लोक आज भारतातील कोणतीही चांगली गोष्ट ऐकू शकत नाहीत, हीच त्यांची अवस्था आहे. आज गरिबांच्या मनात आपली स्वप्ने साकार करण्याचा विश्वास निर्माण झाला आहे. आज देशातील गरिबीमध्ये वेगाने घट होत आहे. नीती आयोगाच्या अहवालानुसार गेल्या पाच वर्षात साडेतेरा कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या बाहेर आले आहेत.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
आयएमएफ ने आपल्या एका वर्किंग पेपरमध्ये(कार्य पत्रिकेत) लिहिले आहे की भारताने अतिगरिबीला जवळजवळ संपुष्टात आणले आहे. आयएमएफ ने भारताची डीबीटी आणि आपल्या इतर सामाजिक कल्याणाच्या योजनांविषयी आयएमएफने यामध्ये म्हटले आहे की हे लॉजिस्टिक्स मार्बल आहे.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे ही जलजीवन मिशनच्या माध्यमातून भारतातील चार लाख लोकांच्या जीविताचे रक्षण झाले आहे. चार लाख कोण आहेत- माझे गरीब,पीडित,शोषित,वंचित कुटुंबातील माझे आप्तस्वकीय आहेत. आपल्या कुटुंबातील निम्न स्तराचे जीवन जगण्याचा ज्यांचा नाईलाज झाला आहे,असे लोक आहेत. अशा चार लाख लोकांचा जीव वाचला असल्याची माहिती ‘डब्लूएचओ’ देत आहे. विश्लेषण करून ते सांगत आहेत की स्वच्छ भारत अभियानामुळे तीन लाख लोकांचा जीव वाचला आहे.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
भारत स्वच्छ होत आहे, तीन लाख लोकांचे जीव वाचत आहेत, हे तीन लाख कोण आहेत- हे तेच लोक आहेत ज्यांना नाईलाजाने बकाल वस्त्या आणि झोपड्यांमध्ये आपले आयुष्य व्यतीत करावे लागत आहे. ज्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. माझे गरीब कुटुंबातील लोक शहरातील वस्त्यांमध्ये जीवन जगणारे, गावात राहणारे लोक आणि उपेक्षित स्तरातील लोक आहेत, ज्यांचा जीव वाचला आहे. युनिसेफने काय म्हटले आहे, युनिसेफने सांगितले आहे की स्वच्छ भारत अभियानामुळे दरवर्षी गरिबांचे 50 हजार रुपये वाचत आहेत. पण भारताच्या या कामगिरीबाबत काँग्रेस सह विरोधी पक्षातील लोकांना अविश्वास आहे. जे सत्य जग इतक्या दुरून पाहत आहे, या लोकांना इतक्या जवळ असून ते दिसत नाही.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
अविश्वास आणि घमेंड यांच्या नसानसामध्ये भरलेली आहे. यांना जनतेचा विश्वास कधीच दिसत नाही. आता यांचा जो शहामृगी दृष्टिकोन आहे, याबद्दल देश काय करू शकतो.
आदरणीय अध्यक्ष महोदय.
जुनी विचारसरणी असलेले जे लोक आहेत, त्यांच्या या विचारसरणीसोबत मी सहमत नाही आहे. पण ते लोक म्हणतात जरा बघा ना, काहीतरी चांगले होत आहे, काही मंगल होत आहे, घरामध्ये काही चांगले होत आहे, मुले चांगले-चुंगले कपडे घालत आहेत, थोडे काही साफसूफ आहे, तर मग एक काळी तीट लावूया. आज देशाचे जे मंगल होत आहे, चारही बाजूंना, देशाच्या चारही बाजूंनी प्रशंसा होत आहे, देशाचा जो जयजयकार होत आहे, तर मी यासाठी आपले आभार मानतो की काळी तीट म्हणून काळे कपडे घालून तुम्ही सदनात येऊन हे मांगल्य देखील सुरक्षित राखण्याचे काम केले आहे, याबद्दल देखील मी तुमचा आभारी आहे.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
गेल्या तीन दिवसांपासून आमच्या विरोधी सहकाऱ्यांनी डिक्शनऱ्यांमध्ये शोधून शोधून पोट भरेल इतके सापडतील तितके अपशब्द घेऊन आले आहेत. जितक्या अपशब्दांचा वापर करू शकतात, भरपूर. माहित नाही कुठून कुठून घेऊन येतात. पण घेऊन आले आहेत आणि ते बाहेर पडल्यामुळे त्यांचे मन थोडेसे हलके झाले आहे, इतके अपशब्द ते बोलले आहेत आणि तसेही हे लोक दिवस रात्र माझ्यावर टीका करतच असतात हा त्यांचा स्वभाव आहे आणि त्यांच्यासाठी सर्वात लोकप्रिय घोषणा काय आहे ‘मोदी तेरी कब्र खुदेगी, मोदी तेरी कब्र खुदेगी’ ही त्यांच्या आवडीची घोषणा आहे. पण माझ्यासाठी यांच्या शिव्या, यांचे अपशब्द, ही असंसदीय भाषा, मी त्याचे देखील टॉनिक बनवत आहे आणि हे असे का करतात आणि हे असे का होत आहे. आज या सदनामध्ये मी काही गुपिते सांगणार आहे. मला ठाम विश्वास आहे की विरोधी पक्षातील लोकांना एक गुप्त वरदान मिळाले आहे. होय गुप्त वरदान मिळाले आहे आणि वरदान हे आहे की हे लोक ज्याचे वाईट चिंततील त्याचे भलेच होईल. एक उदाहरण म्हणून इथे मी सांगेन, वीस वर्षे झाली काय काय झाले नाही आणि काय काय करण्यात आले नाही पण सर्व काही चांगलेच होत गेले. तर तुम्हाला एक गुप्त वरदान आहे बरं का आणि मी तीन उदाहरणांनी या गोपनीय वरदानाला सिद्ध करू शकतो तुम्हाला माहित असेल की या लोकांनी सांगितले होते बँकिंग क्षेत्राविषयी. बँकिंग क्षेत्र बुडणार आहे, बँकिंग क्षेत्र उध्वस्त होणार आहे. देश संपणार आहे, देश उध्वस्त होईल, न जाणो, काय काय म्हणाले होते आणि मोठमोठ्या विद्वानांना परदेशातून घेऊन येत होते. त्यांच्याकडून हे वदवले जात होते, जेणेकरून यांचे कोणी ऐकत नसेल तर कदाचित त्यांचे बोलणे तरी लोक ऐकतील. आमच्या बँकांच्या तंदुरुस्ती विषयी वेगवेगळ्या प्रकारच्या निराशा, अफवा पसरवण्याचे काम यांनी पुरेपूर केले आणि ज्यावेळी यांनी वाईट इच्छा व्यक्त केली बँकांविषयी, तेव्हा काय झाले, आमच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका, आमच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचा निव्वळ नफा दुपटीपेक्षा जास्त झाला आहे. या लोकांनी फोन बँकिंग घोटाळ्याविषयी सांगितले होते याच कारणाने देशाला गंभीर संकटामध्ये डुबवले होते.
सरलेल्या काळाबद्दल बोलणं सुरू आहे, पण त्यांनी मागे ठेवलेला एनपीएचा अडसर पार करून आज आपण एका नव्या ताकदीने बाहेर पडलो आहोत. आणि किती नफा झाला हे आज श्रीमती निर्मलाजींनी सविस्तर सांगितले आहे. दुसरे उदाहरण - एचएएल या संरक्षण हेलिकॉप्टर बनवणाऱ्या सरकारी कंपनीचे. त्यांनी एचएएलबद्दल किती भल्या-बुऱ्या गोष्टी सांगितल्या, काय काय सांगितलं गेलं एचएएल विषयी. आणि जी भाषा वापरली गेली त्याने जगाचे खूप नुकसान केले. आणि एचएएल उध्वस्त झाली, एचएएल बुडली, भारताचा संरक्षण उद्योग संपला. एचएएल साठी असे काय काय बोलले गेले होते.
एवढेच नाही तर आजकाल शेतात जाऊन व्हिडीओ शूटिंग केले जाते, माहीत आहे ना? शेतात व्हिडीओ शूटिंग केले जाते, तसे त्यावेळी एचएएल कारखान्याच्या प्रवेशद्वारावर कामगारांची सभा घेऊन व्हिडिओ शूट करण्यात आले होते आणि तेथील कामगारांना भडकवण्यात आले, आता तुम्हाला कोणते भविष्य नाही, तुमची मुले मारतील, उपाशी मरतील, एचएएल बंद पडणार आहे. देशातील महत्वाच्या संस्थेविषयी इतकी वाईट इच्छा, इतकी वाईट इच्छा, इतके अपशब्द, एक गुपित, आज एचएएल यशाची नवनवीन शिखरे गाठत आहे. एचएएल ने आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल नोंदवला आहे. यांनी मनसोक्त गंभीर आरोप करूनही, तिथल्या कामगारांना भडकवण्याचे भरपूर प्रयत्न करूनही एचएएल आज देशाची शान म्हणून उदयास आली आहे.
आदरणीय अध्यक्षजी
ज्याचे वाईट चिंतले जाते तो कसा प्रगती करतो याचे तिसरे उदाहरण मी देतो, एलआयसी विषयी काय बोलले गेले होते ते तुम्हाला माहीत असेल. एलआयसी उध्वस्त झाली आहे, गरिबांचा पैसा बुडत आहे, गरीब जाणार कुठे, बिचाऱ्याने मोठ्या कष्टाने एलआयसीत पैसे गुंतवले होते, काय-काय- त्यांची जितकी कल्पनाशक्ती होती, जितकी त्यांच्या समर्थकांनी कागदपत्रे सादर केली तितकी वाचून दाखवायचे. मात्र आज एलआयसी निरंतर मजबूत होत आहे. शेअर बाजारात स्वारस्य असणाऱ्यांनाही हा गुरुमंत्र आहे की किती सरकारी कंपन्यांच्या लोकांनी तुम्हाला वेड्यात काढले तरी तुम्ही पैज लावा, सर्व काही चांगलेच होईल.
आदरणीय अध्यक्षजी,
देशातील ज्या संस्थांच्या मृत्यूची घोषणा हे लोक करतात, त्या संस्थांचे भाग्य उजळते. आणि माझा विश्वास आहे की ते ज्या प्रकारे देशाला कोसतात, लोकशाहीला कमी लेखतात, माझा ठाम विश्वास आहे, देशही मजबूत होणार आहे, लोकशाही देखील बळकट होणार आहे, आणि आपण तर होणारच आहोत.
आदरणीय अध्यक्षजी,
हे असे लोक आहेत ज्यांचा देशाच्या सामर्थ्यावर विश्वास नाही. या लोकांचा देशाच्या मेहनतीवर विश्वास नाही, देशाच्या पराक्रमावर विश्वास नाही. काही दिवसांपूर्वी मी म्हणालो होतो की, आमच्या सरकारच्या पुढील कार्यकाळात, तिसर्या कार्यकाळात, भारत जगातील तिसरी अव्वल अर्थव्यवस्था बनेल.
आदरणीय अध्यक्षजी,
आता देशाच्या भवितव्याबाबत थोडा जरी भरवसा असता, येत्या पाच वर्षांत म्हणजेच तिसऱ्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणू, असा आम्ही दावा करत असताना जबाबदार विरोधक काय करणार? तो प्रश्न विचारणार, बरं निर्मला जी, आम्हाला सांगा तुम्ही ते कसे करणार आहात? बरं मोदीजी सांगा – कसे करणार आहात, तुमचा आराखडा काय आहे – असे केले असते. आता मला हेही शिकवावे लागत आहे. पण त्यांना काही सूचना देता आल्या असत्या. किंवा म्हणाला असतात की आम्ही निवडणुकीत जनतेसमोर जाऊन सांगू की ते तिसर्याबद्दल बोलत आहेत, आम्ही एक नंबरवर आणून दाखवू आणि अशाप्रकारे आणू.. काहीतरी करायचे होते तुम्ही. पण हीच आपल्या विरोधकांची शोकांतिका आहे आणि त्यांचे राजकीय विचारमंथन ऐका. काँग्रेसचे लोक काय बोलतात, आता बघा त्यांची कल्पनाशक्ती किती कमी आहे. इतकी वर्षे सत्तेत राहूनही कोणत्या न पटणाऱ्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत.
ते काय म्हणतात, ते म्हणतात की हे लक्ष्य गाठण्यासाठी काहीही करण्याची गरज नाही, तिसऱ्या क्रमांकावर हेच घडणार आहे. मला सांगा, मला वाटतं याच विचारधारेने ते इतकी वर्षे निद्रिस्त होते की आपोआप होईल. काहीही न करता तिसर्यापर्यंत पोहोचू, असे त्यांचे म्हणणे आहे. आणि जर काँग्रेसचं मानलं, जर सर्व काही आपोआप घडणार असेल, तर याचा अर्थ काँग्रेसकडे धोरण नाही, नियत नाही, संकल्प नाही, दृष्टी नाही, जागतिक अर्थव्यवस्थेची समज नाही आणि भारताच्या आर्थिक शक्तीची उमज नाही. आणि म्हणूनच निद्रिस्तपणे जर होणार आहे, हेच एक.
आदरणीय अध्यक्षजी,
याच कारणामुळे काँग्रेसच्या राजवटीत गरिबी आणि गरिबी वाढतच राहिली. 1991 मध्ये देश कंगाल होण्याच्या अवस्थेत होता. काँग्रेसच्या राजवटीत अर्थव्यवस्था जगाच्या क्रमवारीत दहा, अकरा, बाराच्या आसपास वर खाली होत होती, हेलकावत होती. पण 2014 नंतर भारताने पहिल्या पाचमध्ये आपले स्थान निर्माण केले. हे कुठल्यातरी जादूच्या छडीने घडले आहे, असे काँग्रेसच्या लोकांना वाटेल. पण मला आज सभागृहाला सांगायचे आहे की, आदरणीय अध्यक्षजी, रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म, एक निश्चित आयोजन, नियोजन आणि कठोर परिश्रम, परिश्रमाची पराकाष्टा यामुळे आज देशाने हा टप्पा गाठला आहे. आणि हे नियोजन आणि मेहनतीमधील सातत्य यापुढेही राखले जाईल. त्यात आवश्यकतेनुसार नवीन सुधारणा केल्या जातील आणि कामगिरीसाठी पूर्ण ताकद वापरली जाईल आणि त्याचा परिणाम असा होईल की आपण तिसऱ्या क्रमांकावर पोहोचू.
आदरणीय अध्यक्षजी,
देशाचा विश्वास मला शब्दांत व्यक्त करायचा आहे. आणि देशाला विश्वास आहे की 2028 मध्ये तुम्ही अविश्वास ठराव घेऊन याल, तेव्हा हा देश पहिल्या तीन क्रमांकात असेल, हा देशाचा विश्वास आहे.
आदरणीय अध्यक्षजी,
अविश्वास हा आपल्या विरोधी मित्रांच्या स्वभावातच आहे. आम्ही लाल किल्ल्यावरून स्वच्छ भारत अभियानाचे आवाहन केले. मात्र त्यांनी नेहमीच अविश्वास व्यक्त केला. हे कसे शक्य आहे? गांधीजीही येऊन गेले, सांगून गेले त्याचे काय झाले? आता स्वच्छता कशी होणार? त्यांच्या विचारसरणीतच अविश्वास भरलेला आहे. माता-मुलींना उघड्यावर शौचास जाण्यापासून मुक्त करण्यासाठी, त्या मजबुरीतून वाचण्यासाठी शौचालय सारख्या गरजेवर आम्ही भर दिला आणि मग ते म्हणत आहेत, लाल किल्ल्यावरून असे विषय बोलले जातात का? हे देशाचे प्राधान्य आहे का? आम्ही जन-धन खाती उघडण्याबाबत बोललो तेव्हाही तेच निराशाजनक वक्तव्य. काय आहे जन धन खाते? त्यांच्या हातात पैसा कुठे आहे? त्यांच्या खिशात काय पडणार? काय आणणार, काय करणार? आम्ही योगाबद्दल बोललो, आयुर्वेदाबद्दल बोललो, जेव्हा आम्ही त्याचा प्रसार करण्याबद्दल बोललो, तेव्हा त्यांनी त्याचीही खिल्ली उडवली. जेव्हा आम्ही स्टार्ट-अप इंडियाबद्दल चर्चा केली तेव्हा त्यांनी त्याबद्दलही निराशा पसरवली. कोणीही स्टार्ट-अप होऊ शकत नाही. जेव्हा आम्ही डिजिटल इंडियाबद्दल बोललो तेव्हा प्रख्यात अभ्यासकांनी कोणती भाषणे दिली. भारतातील लोक निरक्षर आहेत, भारतातील लोकांना मोबाईल फोन कसा वापरायचा हे देखील माहित नाही. भारतातील लोक डिजिटल कसे होतील? आज देश डिजिटल इंडियामध्ये अग्रेसर आहे. आम्ही मेक इन इंडियाबद्दल बोललो. ते जिथे गेले तिथे मेक इन इंडियाची खिल्ली उडवली. ते जिथे गेले तिथे मेक इन इंडियाची खिल्ली उडवली.
आदरणीय अध्यक्षजी,
काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या मित्रांचा असा इतिहास आहे की त्यांनी भारतावर, भारताच्या क्षमतेवर कधीही विश्वास ठेवला नाही.
आदरणीय अध्यक्षजी,
आणि त्यांनी कोणावर विश्वास ठेवला? मला आज सभागृहाला आठवण करून द्यायची आहे. पाकिस्तान, सीमेवर आक्रमण करायचा. आपल्याकडे दिवसागणिक दहशतवादी पाठवायचा आणि त्यानंतर पाकिस्तान हात झटकून आपण जबाबदार नसल्याचे भासवत पळ काढायचा. जबाबदारी घ्यायला कोणी तयार नसायचे. आणि त्यांचे पाकिस्तानवर इतकं प्रेम होतं की,ते पाकिस्तानच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवायचे. दहशतवादी हल्ले होतच राहतील आणि चर्चा होत राहतील, असे पाकिस्तान म्हणायचे. हे तर असेही म्हणायचे कि जर तो पाकिस्तान म्हणत असेल तर ते बरोबर असणार. ही त्यांची विचारसरणी राहिली आहे. काश्मीर दहशतवादाच्या आगीत रात्रंदिवस होरपळत होता. जाळपोळ व्हायची, पण काँग्रेस सरकारवर काश्मीर आणि काश्मीरच्या सामान्य नागरिकाचा विश्वास नव्हता. त्यांचा हुर्रियतवर विश्वास होता, फुटीरतावाद्यांवर विश्वास होता, पाकिस्तानचा झेंडा फडकवणार्या लोकांवर त्यांचा विश्वास होता. भारताने दहशतवादावर सर्जिकल स्ट्राईक केला. भारताने हवाई हल्ला केला, त्यांना भारतीय सैन्यावर विश्वास नव्हता. शत्रूच्या दाव्यांवर त्यांचा विश्वास होता. ही त्यांची वृत्ती होती.
अध्यक्ष महोदय,
आज जगामध्ये कोणीही भारताविषयी अपशब्द बोलला, तर या लोकांचा त्यावर लगेचच विश्वास बसतो. त्या गोष्टी लगेच पकडून ठेवल्या जातात. यांच्याकडे अशी काही चुंबकीय शक्ती आहे की, भारताच्या विरोधातील प्रत्येक गोष्ट ते लगेचच घट्ट पकडून ठेवतात. ज्यावेळी एखादी विदेशी संस्था सांगते की, भूकबळीच्या समस्येचा सामना करणारे अनेक देश भारतापेक्षा चांगल्या स्थितीत आहेत, अशा खोट्या गोष्टीही त्यांना बरोबर वाटतात. आणि त्यांचाच ते हिंदुस्तानामध्ये प्रचार करायला सुरू करतात. पत्रकार परिषदा घेतात. भारताला बदनाम करण्यामध्ये यांना खूप मजा येते. जगामध्ये कोणीही अशा खोट्या, कुचकामी गोष्टींवर केलेले भाष्य म्हणजे मातीचा ढिगारा असून त्याला वास्तविक काहीही किंमत नाही, त्यालाच खूप अवाजवी महत्व देणे ही कॉंग्रेसची नियत आहे. आणि याच गोष्टी ताबडतोब भारतामध्ये प्रचंड मोठ्या करून पसरवल्या जातात. त्यांचा प्रचार करण्यासाठी संपूर्ण शक्तिनिशी प्रयत्न कॉंग्रेस पक्षाकडून केला जातो. कोरोना महामारी आली, भारताच्या संशोधकांनी ‘मेड इन इंडिया’ लस बनवली. त्यांना भारताच्या या लसीवर विश्वास नाही. मात्र विदेशी लसीवर विश्वास आहे, अशी यांची विचार पद्धती आहे.
आदरणीय अध्यक्ष जी,
देशाच्या कोट्यवधी नागरिकांनी भारताच्या लसीवर विश्वास व्यक्त केला. यांना मात्र भारताच्या सामर्थ्यावर विश्वास नाही. त्यांना भारताच्या लोकांवर विश्वास नाही. परंतु या सभागृहामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो, या देशातील, भारतातील लोकांमध्येही कॉंग्रेसवरील अविश्वासाची भावना आता खूप खोलवर रूजली आहे. कॉंग्रेस आपल्या अहंकारामध्ये इतका गुरफटला गेला आहे, त्यांना पायाखालची जमीनही दिसत नाही.
आदरणीय अध्यक्ष जी,
देशातील अनेक भागांमध्ये कॉंग्रेसला विजय मिळवण्यासाठी अनेक दशके लागली आहेत. तामिळनाडूमध्ये कॉंग्रेसला 1962 मध्ये अखेरचा विजय मिळाला होता. 61 वर्षांपासून तामिळनाडूचे लोक म्हणताहेत ‘‘ कॉंग्रेस नो कॉन्फीडन्स’’! तामिळनाडूचे लोक म्हणताहेत ‘‘ कॉंग्रेस नो कॉन्फीडन्स’’!! पश्चिम बंगालमध्ये त्यांना अखेरचा विजय 1972 मध्ये मिळाला होता. पश्चिम बंगालचे लोक गेल्या 51 वर्षांपासून म्हणत आहेत, ‘‘ कॉंग्रेस नो कॉन्फीडन्स’’!!‘‘ कॉंग्रेस नो कॉन्फीडन्स’’!! उत्तर प्रदेश आणि बिहार आणि गुजरातमध्ये कॉंग्रेसला शेवटचा विजय मिळाला होता, 1985 मध्ये म्हणजे या राज्यातील जनता गेल्या 38 वर्षांपासून कॉंग्रेसवर ‘‘नो कॉन्फीडन्स’’!! म्हणत आहे. त्रिपुरामध्ये त्यांना अखेरचा विजय 1988 मध्ये मिळाला होता. म्हणजे 35 वर्षांपासून त्रिपुराचे लोक कॉंग्रेसला नो कॉन्फीडन्स’’!! कॉंग्रेस नो कॉन्फीडन्स’’!!असेच म्हणत आहे. ओडिशामध्ये कॉंग्रेसला शेवटी 1995 मध्ये जागा मिळाल्या होत्या. याचा अर्थ, ओडिशामध्येही 28 वर्षांपासून कॉंग्रेसला एकच उत्तर मिळत आहे. कॉंग्रेस नो कॉन्फीडन्स’’!! कॉंग्रेस नो कॉन्फीडन्स’’!!
आदरणीय अध्यक्ष जी,
नागालॅंडमध्ये कॉंग्रेसला अखेरचा विजय 1988 मध्ये मिळाला होता. इथल्या लोकांनीही गेल्या 25 वर्षांपासून कॉंग्रेस नो कॉन्फीडन्स’’!! कॉंग्रेस नो कॉन्फीडन्स’’!! म्हटले आहे. दिल्ली, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये तर कॉंग्रेसच्या पारड्यात विधानसभेची एकही जागा, आमदार नाही. जनतेने कॉंग्रेसवर वारंवार कॉंग्रेस नो कॉन्फीडन्स’’!! जाहीर केला आहे.
आदरणीय अध्यक्ष जी,
आज याप्रसंगी मी आपल्याला एक कामाची गोष्ट सांगू इच्छितो. तुमच्या भल्यासाठीच बोलत आहे. तुम्ही थकून, दमून जाल. तुम्ही खूपच दमून जाल. मी आपल्या भल्यासाठी काही गोष्टी सांगू इच्छितो. आज मी या प्रसंगी आमच्या विरोधक सहका-यांविषयी संवेदनाही व्यक्त करू इच्छितो. काही दिवसांपूर्वी बंगळुरूमध्ये आपण सर्वांनी मिळून जवळपास दीड-दोन दशक जुन्या यूपीएचे क्रियाकर्म केले आहे. यूपीएवर अंत्यसंस्कार केले आहे, त्याबद्दल लोकशाहीच्या व्यवहारानुसार तर मलाही आपल्याविषयी सहानुभूती व्यक्त केली पाहिजे. सहवेदना व्यक्त केली पाहिजे होती. परंतु ही सहवेदना व्यक्त करण्यामध्ये मला जो विलंब झाला आहे, त्यामध्ये काही माझी चूक नाही. कारण तुम्ही मंडळीच स्वतःच एकीकडे यूपीएवर क्रियाकर्म करीत होता आणि दुसरीकडे उत्सव साजरा करीत होता. आणि तो उत्सव तर कोणत्या गोष्टीचा होता? तर पडझड झालेल्या, पडक्या यूपीएच्या वास्तूवर नवीन प्लास्टर लावण्याचा उत्सव तुम्ही साजरा करीत होता. तुम्ही नवीन रंग चोपडण्याचा सण साजरा करण्यात गुंतला होता. दशकांपूर्वीच्या जुन्या खटारा गाडीला इलेक्ट्रिक वाहन म्हणून दाखविण्यासाठी इतका मोठा उत्सव तुम्ही आरंभला होता. आणखी मजेदार गोष्ट म्हणजे हा उत्सव साजरा करण्याचे कार्य पूर्ण होण्याआधीच त्याचे श्रेय लाटण्यासाठी तुमच्यामध्ये एकमेकांची डोकी फोडण्याची कवायत सुरू झाली. हे सगळे पाहून, मी तर हैराण झालो होतो. आणि अशी आघाडी घेवून तुम्ही जनतेसमोर जाणार आहात. विरोधी पक्षांमधील सहकारी मंडळींना मी सांगू इच्छितो की, तुम्ही ज्यांच्यामागे जात आहात, त्यांना तर या देशाचा जवान, या देशाचे संस्कार यांच्याविषयीही काहीही माहिती नाही. पिढ्यांन पिढ्या या लोकांना लाल मिरची आणि हिरवी मिरची यांच्यातील नेमका फरकही समजलेला नाही. परंतु, तुमच्यापैकी अनेक सहकारी मंडळींना मी चांगले ओळखतो. तुम्हा मंडळींना तर भारतीय जनमानस चांगले ठावूक आहे. तुम्हा मंडळींना भारताची मानसिकता चांगली परिचित आहे. वेशभूषा बदलून धोका देण्याचा प्रयत्न करण्यांचे खरे रूप कधीना कधी सर्वांसमोर येतच असते. ज्यांना केवळ आपल्या नावाचा आधार आहे, त्यांच्यासाठी असे म्हटले आहे....
‘‘ दूर युद्ध से भागते, दूर युद्ध से भागते नाम रखा रणधीर ,
भाग्यचंद की आज तक , सोई है तकदीर! ‘’
आदरणीय अध्यक्ष जी,
यांची अडचण अशी आहे की, स्वतःला सिद्ध करण्यासाठी, स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी त्यांना एनडीएचाच आधार घ्यावा लागत आहे. परंतु त्यांच्यामध्ये असलेल्या सवयीमुळे त्यांच्याकडे असलेला गर्व/ घमेंड काही त्यांना सोडत नाही. आणि म्हणूनच एनडीएमध्ये आणखी दोन ‘आय’ म्हणजे गर्व घातले आहेत. एक नावाच्या सुरूवातीला आणि एक मधे आय म्हणजे ‘मी‘ पणाची घमेंड आहेच. एक ‘आय’ म्हणजे सव्वीस पक्षांची घमेंड आणि दुसरा ‘आय’ म्हणजे एका परिवाराची घमेंड! एनडीएही चोरून घेतले आहे. काहीतरी वाचविण्यासाठी इंडियाचेही तुकडे केले आहेत. आय डॉट एन डॉट डी डॉट आय डॉट ए डॉट.
आदरणीय अध्यक्ष जी,
आमच्या डीएमकेच्या बंधूंनी थोडे ऐकावे, थोडे कॉंग्रेसच्याही लोकांनी ऐकावे. अध्यक्ष महोदय, यूपीएला वाटते की, देशाचे नाव वापरून आपली विश्वसनीयता वाढवता येईल. परंतु कॉंग्रेसचे सहकारी पक्ष, कॉंग्रेसचे अतूट सहकारी तामिळनाडू सरकारमधील एक मंत्री, दोन दिवसांपूर्वीच म्हणाले आहेत, तामिळनाडू सरकारमधील एका मंत्र्यांनी म्हटले आहे की, आय डॉट एन डॉट डी डॉट आय डॉट ए डॉट ला त्यांच्यादृष्टीने काहीही महत्व नाही. कारण त्यांच्यामते तर तामिळनाडू भारतातच नाही.
आदरणीय अध्यक्ष जी,
आज मी अभिमानाने सांगू इच्छितो, तामिळनाडू हा असा प्रदेश आहे, जिथून नेहमीच देशभक्तीचा प्रवाह निघाला आहे. ज्या राज्याने आपल्याला राजा जी यांच्यासारखा नेता दिला. ज्या राज्याने आपल्याला कामराज दिले. ज्या राज्याने आपल्याला एनटीआर दिले. ज्या राज्याने आपल्याला अब्दुल कलाम दिले. आज त्या तामिळनाडूतून असा आवाज ऐकू येत आहे.
आदरणीय अध्यक्ष जी,
ज्यावेळी आपल्या आघाडीमध्ये आपआपसांमध्ये आतूनच लोक अशा प्रकारे आपल्या देशाचे अस्तित्व नाकारतात, त्यावेळी आपली गाडी कुठे जावून थांबणार आहे, याचे जरा आत्मचिंतन करण्याची संधी मिळाली आणि आत्मा शिल्लक राहिला असेल तर जरूर करावे.
आदरणीय अध्यक्ष जी,
नावाविषयी त्यांचा एक चष्मा आजचा नाही. नावाचा जो मोह आहे ना, तो काही आजचा नाही. हा तर दशकांपासूनचा जुना चष्मा आहे. त्यांना वाटते की, नाव बदलल्यामुळे देशावर राज्य करता येईल. गरीबाला चोहोदिशांनी त्यांचे नाव तर नजरेसमोर पडते आहे. परंतु त्यांचे काम मात्र कुठेही दिसून येत नाही. रूग्णालयांना त्यांची नावे आहेत, परंतु औषधोपचार मात्र केले जात नाहीत. शैक्षणिक संस्थांना त्यांच्या नावाच फलक टांगलेले दिसतात, रस्ते असो, उद्याने असो, त्यांची नावे आहेत. गरीब कल्याण योजनांही त्यांच्या नावाने आहेत. क्रीडा पुरस्कारांना त्यांचे नाव आहे. विमानतळांना त्यांची नावे दिली आहेत. संग्रहालयांना त्यांची नावे, आपल्या नावाने योजना सुरू केल्या आणि मग त्याच योजनांमध्ये हजारो-कोट्यवधींचे भ्रष्टाचार केले. समाजाच्या अखेरच्या पायरीवर उभ्या असलेल्या व्यक्तीचे काम होईल, या आशेने देश त्यांच्याकडे पहात होता. परंतु देशाला काय मिळाले? तर फक्त आणि फक्त कुटुंबाचे नाव!
अध्यक्ष महोदय,
कॉंग्रेसची ओळख सांगणारी अशी एकही गोष्ट त्यांची स्वतःची नाही. कोणतीही गोष्ट कॉंग्रेसची नाही. निवडणूक चिन्हापासून ते विचारांपर्यंत सर्वकाही कॉंग्रेस आपलेच असल्याचा दावा करतो परंतु ते सर्व काही दुस-याचं आहे, कुणाकडून तरी घेतलेले आहे.
आदरणीय अध्यक्ष जी,
आपल्यामधील त्रुटी, कमतरता यांना झाकण्यासाठी निवडणूक चिन्ह आणि विचारांनाही चोरण्याचे काम त्यांनी केले आहे. आणि नंतर जे परिवर्तन झाले आहे, त्यावर पक्ष अहंकार करीत आहे. यावरून असेच दिसून येते की, 2014 पाासून हा पक्ष ‘डिनायल‘ -नाकारला जाण्याच्या स्थितीमध्ये आहे. या पक्षाचे संस्थापक कोण तर ऐ.ओ. ह्यूम, हे एक विदेशी होते. त्यांनी पक्ष बनवला. आपल्याला ठावूक आहे, 1920 मध्ये भारताच्या स्वांतत्र्य संग्रामाला एक नवीन ऊर्जा मिळाली होती. 1920 मध्ये एक नवीन ध्वज मिळाला आणि देशाने तो ध्वज स्वीकारला, त्यावेळी कॉंग्रेसने त्या ध्वजाची ताकद पाहून तोही हिसकावून घेतला आणि प्रतीक म्हणून आपली गाडी चालविण्यासाठी हाच ठीक आहे, असा विचार केला. 1920 पासून असाच खेळ सुरू आहे. आणि त्यांना वाटते की, त्यांनी तिरंगा ध्वज दाखवला तर लोक पाहतील आणि त्यांचीच चर्चा होईल. असाच खेळ त्यांनी केला आहे. मतदारांना भ्रमित करण्यासाठी गांधी नावाचा वापरही त्यांनी असाच केला. प्रत्येक वेळी हे नाव चोरले. कॉंग्रेसची निवडणूक चिन्हे पहा. बैलजोडी, गाय-वासरू, आणि नंतर हाताचा पंजा. ही सारे त्यांचीच कारनामे आहेत, त्यांच्या प्रत्येक प्रकारच्या मनोवृत्तीचे प्रतिबिंब दाखवत आहेत. यावरून त्यांची मानसिकता प्रकट होते आणि स्पष्टपणे दिसते की, सर्व काही एकाच परिवाराच्या हातामध्ये केंद्रीत झाले आहे.
आदरणीय अध्यक्षजी,
ही I.N.D.I.A. आघाडी नाही, ही I.N.D.I.A. आघाडी नाही, ही एक अहंकारी आघाडी आहे. आणि वरातीत प्रत्येकाला नवरदेव व्हायचे आहे. सर्वांना पंतप्रधान व्हायचे आहे.
आदरणीय अध्यक्षजी,
या आघाडीने हा ही विचार केला नाही की, कोणत्या राज्यात आपण, कोणासोबत कुठे पोहोचलो? पश्चिम बंगालमध्ये तुम्ही टीएमसी आणि कम्युनिस्ट पक्षाच्या विरोधात आहात. आणि दिल्लीत एकत्र आहात. आणि अधीर बाबू, 1991 च्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत या कम्युनिस्ट पक्षाने अधीर बाबूंना काय वागणूक दिली याची आजही इतिहासात नोंद आहे. बरं, 1991 ची गोष्ट आता जुनी झाली म्हणा, ज्यांनी गेल्या वर्षी केरळच्या वायनाडमध्ये काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केली होती, हे लोक त्यांच्याशी मैत्री करुन बसलेत. बाहेरुन तर ते आपले, बाहेरुन तर ते आपले लेबल बदलू शकतात, परंतु जुन्या पापांचे काय होणार? हीच पापे तुम्हाला बुडवतील. हे पाप जनता जनार्दनपासून कसे लपवणार? तुम्ही लपवू शकत नाही आणि आज त्यांची जी स्थिती आहे, त्यामुळेच मला सांगायचे आहे,
आता परिस्थिती अशी आहे, आता परिस्थिती अशी आहे
यासाठी हातात हात,
जिथे परिस्थिती बदलली, तर मग सुरेही निघतील.
आदरणीय अध्यक्षजी,
ही अहंकारी आघाडी देशातील घराणेशाहीच्या राजकारणाचे सर्वात मोठे प्रतिबिंब आहे. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांनी, आपल्या संविधानाच्या निर्मात्यांनी नेहमीच घराणेशाहीच्या राजकारणाला विरोध केला होता. महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, बाबासाहेब आंबेडकर, डॉ.राजेंद्र प्रसाद, मौलाना आझाद, गोपीनाथ बॉरडोलोई, लोकनाथ जयप्रकाश, डॉ.लोहिया अशा सर्वच नावांनी उघडपणे घराणेशाहीवर टीका केली आहे, कारण देशाच्या सामान्य नागरिकाला त्याचा त्रास सहन करावा लागतो. घराणेशाही, सामान्य नागरिकाच्या, त्याच्या हक्कांच्या, त्याच्या अधिकारांच्या पासून वंचित ठेवते, यासाठी या विभूतींनी नेहमीच यावर जोर दिला की देशास परिवार, नाव आणि पैश्यावर आधारित व्यवस्थे पासून दूर ठेवावे लागेल. परंतु कॉंग्रेसला कधीच ही बाब आवडली नाही.
आदरणीय अध्यक्षजी,
आम्ही नेहमीच घराणेशाहीला विरोध करणाऱ्यांबाबत नेहमीच पाहिले आहे की त्यांच्या प्रती कशी द्वेषाची भावना होती. काँग्रेसला घराणेशाही आवडते. काँग्रेसला दरबारीपणा आवडतो. जिथे मोठी माणसे, त्यांची मुले-मुलीही मोठ्या पदांवर विराजमान आहेत, जे कुटुंबाबाहेरचे आहेत, त्यांच्यासाठी एकच गोष्ट आहे की जोपर्यंत तुम्ही या मैफिलीत दरबारी बनत नाही, तोपर्यंत तुम्हाला भविष्य नाही. ही त्याची कार्यशैली राहिली आहे. या दरबारी पद्धतीने अनेक बळी घेतले आहेत. या लोकांनी अनेकांचे हक्क मारले आहेत. बाबासाहेब आंबेडकर – काँग्रेसने त्यांचा दोनदा पूर्ण ताकदीने पराभव केला. बाबासाहेब आंबेडकरांच्या कपड्यांची काँग्रेसचे लोक खिल्ली उडवायचे, हेच ते लोक. बाबू जगजीवन राम यांनी आणीबाणीवर प्रश्न उपस्थित केला तेव्हा त्यांनी बाबू जगजीवन बाबूंनाही सोडले नाही, त्यांना त्रास दिला. मोरारजीभाई देसाई, चरणसिंग, चंद्रशेखरजी, तुम्हाला हवी तेवढी नावं घ्या, दरबारीपणामुळे त्यांनी देशाच्या महान लोकांच्या हक्कांवर गदा आणली. जे दरबारी नव्हते, ज्यांचा दरबारीपणाशी संबंध नव्हता, त्यांची तैलचित्रे संसदेत लावण्यासही त्यांना नकोसे वाटे. 1990 मध्ये, भाजप समर्पित बिगरकाँग्रेस सरकार आल्यावर मध्यवर्ती सभागृहात त्यांची तैलचित्रे लावण्यात आली होती. 1991 मध्ये बिगरकाँग्रेस सरकार स्थापन झाले तेव्हा लोहियाजींचे तैलचित्र संसदेतही लावण्यात आले होते. जनता पक्षाची सत्ता असताना 1978 मध्ये मध्यवर्ती सभागृहात नेताजींचे तैलचित्र लावण्यात आले होते. लाल बहादूर शास्त्री आणि चरणसिंग यांचीही तैलचित्रे 1993 मध्ये बिगर काँग्रेस सरकारने लावली होती. सरदार पटेल यांचे योगदान काँग्रेसने नेहमीच नाकारले. सरदार साहेबांना समर्पित जगातील सर्वात उंच पुतळा, स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवण्याचा मानही आपल्याला मिळाला. आमच्या सरकारने दिल्लीत पंतप्रधान संग्रहालय उभारले. सर्व माजी पंतप्रधानांचा सन्मान केला. पंतप्रधान संग्रहालय हे सर्व पंतप्रधानांना समर्पित आहे, मग ते कोणत्याही पक्षाचे असो. त्यांना हे ही कळत नाही कारण त्यांच्या कुटुंबाबाहेरचा कोणी पंतप्रधान झाला आहे, हे त्यांना मान्य नाही. ते हे स्वीकारत नाहीत.
आदरणीय अध्यक्षजी,
अनेकवेळा काही वाईट बोलण्याच्या उद्देशाने सुद्धा जेव्हा प्रयत्न होतो तेव्हा काही सत्य बाहेर येते. आणि खरच आपल्या सर्वांना असे अनुभव येतात तर कधी कधी सत्य बाहेर येते. लंका हनुमानाने जाळली नाही, ती त्यांच्या गर्वाने जाळली आणि हे अगदी खरे आहे. तुम्ही बघा, जनता-जनार्दन हे सुद्धा रामाचेच रूप आहे. आणि म्हणून 400 चे 40 झाले. हनुमानाने लंका जाळली नाही, अहंकाराने जाळली आणि म्हणूनच 400 चे 40 झाले.
आदरणीय अध्यक्षजी,
सत्य हे आहे की देशातील जनतेने तीस वर्षांनी दोनदा पूर्ण बहुमताने सरकार निवडून दिले आहे. पण गरीबाचा मुलगा इथे कसा बसला. तुमचा जो हक्क होता, तुम्ही तुमची घराण्याची पिढी मानली, ती इथे कशी बसली, ही टोचणी अजूनही तुम्हाला त्रास देत आहे, झोपू देत नाही. आणि देशातील जनताही तुम्हाला झोपू देणार नाही. 2024 मध्येही झोपू देणार नाही.
आदरणीय अध्यक्षजी,
एकेकाळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विमानात केक कापले जात होते. आज त्या विमानातून गरिबांसाठी लस जाते, हा फरक आहे.
आदरणीय अध्यक्षजी,
एक काळ असा होता की ड्रायक्लीनिंगचे कपडे विमानाने यायचे, आज चप्पल घातलेला गरीब माणूस विमानातून जातोय.
आदरणीय अध्यक्षजी,
एकेकाळी नौदलाच्या युद्धनौकांना सुट्टीसाठी, मौजमजा करण्यासाठी, मौजमजा करण्यासाठी बोलावले जायचे. आज त्याच नौदलाच्या जहाजांचा उपयोग दूरवरच्या देशात अडकलेल्या भारतीयांना त्यांच्या घरी परत आणण्यासाठी, गरिबांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी केला जातो.
आदरणीय अध्यक्षजी,
जे आपल्या आचरणाने, वागण्याने आणि चारित्र्याने राजा झाले आहेत, ज्यांचे मन आधुनिक राजासारखे काम करते, हा गरीबाचा मुलगा इथे आला तर त्यांना त्रास होणारच होणार. शेवटी ते नामदार लोक आहेत आणि हे कामदार लोक आहेत.
आदरणीय अध्यक्षजी,
मला फार क्वचित प्रसंगी काही गोष्टी सांगायला संधी मिळते. अशा अनेक गोष्टी असतात, योगायोग बघा, खरंतर मी हे ठरवूनही बसत नाही, पण योगायोग बघा- काल बघा, काल येथे मनापासून बोलण्याची चर्चा झाली होती. त्यांच्या मनाची स्थिती देशाला खूप दिवसांपासून माहीत आहे, पण आता त्यांचे मन कसे आहे हे ही कळले आहे.
आणि अध्यक्षजी,
यांचे मोदी प्रेम तर इतके जबरदस्त आहे की, चोवीस तास स्वप्नातही यांच्या मोदीच येतात. मोदींनी भाषण करताना मध्येच पाणी प्यायले तर ते म्हणतात पाणीही प्यायले तर छाती फुलवून इथे पाहा - मोदींना पाणी पाजले. गरमीत मी जर, कडक उन्हातही जनता-जनार्दनाच्या दर्शनासाठी निघतो तेव्हा , कधी घाम पुसतो , तर म्हणतात बघा, मोदींना घाम फोडला. बघा, यांचा जगण्याचा आधार बघा, एका गीताच्या ओळी आहेत -
डूबने वाले को तिनके का सहारा ही बहुत,
दिल बहल जाए फकत, इतना इशारा ही बहुत।
इतने पर भी आसमां वाला गिरा दे बिजलियां,
कोई बतला दे जरा डूबता फिर क्या करे।
आदरणीय अध्यक्षजी,
मला काँग्रेसची अडचण समजते. वर्षानुवर्षे, ते तेच अयशस्वी उत्पादन पुन्हा पुन्हा लाँच करतात. प्रत्येक वेळी लॉंचिग अयशस्वी होते. आणि आता त्याचा परिणाम असा झाला आहे की, मतदारांबद्दलचा त्यांचा द्वेषही गगनाला भिडला आहे. लाँचिंग त्यांचे अयशस्वी होते, तिरस्कार जनतेचा करतात. पण प्रसिद्धी विभागाचे लोक काय करतात? ते प्रेमाच्या दुकानाचा प्रचार करतात, परिसंस्था कामाला लागते.
त्यामुळे देशातील जनताही म्हणत आहे की, हे लुटीचे दुकान आहे, खोट्याचा बाजार आहे. यात द्वेष आहे, घोटाळे आहेत, तुष्टीकरण आहे, यांची मने काळी आहेत. कुटुंबवादाच्या आगीत अनेक दशकांपासून देश धुमसत आहे. आणि तुमच्या दुकानांनी आणीबाणी विकली आहे, फाळणी विकली आहे , शीखांवरील अत्याचार विकले आहेत, किती तरी खोट्या गोष्टी विकल्या आहेत , इतिहास विकला आहे , उरीच्या सत्याचे पुरावे विकले आहेत , द्वेष-करणाऱ्या दुकानदारांनो, जरा लाज बाळगा, तुम्ही सैन्याचा स्वाभिमान विकला आहे.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
इथे बसलेले आमच्यातील बरेच जण ग्रामीण गरीब पार्श्वभूमी असलेले आहोत.इथे या सभागृहात खेड्यापाड्यातून, छोट्या शहरातून मोठ्या संख्येने लोक येतात आणि गावातील एखादी व्यक्ती परदेशात गेली तर त्याचे वर्षानुवर्षे गुणगान गातो. परदेशात तो एकदा जरी गेला , तिथली ठिकाणे पाहून आला तर वर्षानुवर्षे सांगत राहतो की मी हे पाहून आलो, मी हे ऐकले, हे पाहिलं, गरीब माणसाला असं वाटणं स्वाभाविक आहे. गावातील व्यक्ती ज्याने दिल्ली-मुंबई देखील पाहिलेली नाही मात्र अमेरिकेला जाऊन आला आहे, युरोपला जाऊन आला आहे, तर तो वर्णन करत राहतो. ज्या लोकांनी कधी कुंडीत मुळा उगवला नाही, ते शेतं बघून आश्चर्यचकित होणारच आहेत.
अध्यक्ष महोदय,
हे लोक जे कधीही जमिनीवर उतरले नाहीत, नेहमी गाडीच्या काचा खाली करून दुसऱ्यांची गरीबी पाहिली आहे, त्यांना हे सगळेच आश्चर्यकारक वाटतआहे .
जेव्हा असे लोक भारताच्या स्थितीचे वर्णन करतात तेव्हा ते विसरतात की त्यांच्या कुटुंबाने या भारतावर 50 वर्षे राज्य केले होते . एकप्रकारे भारताच्या स्थितीचे वर्णन करताना ते आपल्या पूर्वजांच्या अपयशाचा उल्लेख करतात, हा इतिहास साक्षीदार आहे. आणि त्यांची डाळ शिजणार नाही. म्हणूनच ते नव-नवीन दुकाने उघडून बसतात.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
या लोकांना माहित आहे की त्यांच्या नवीन दुकानालाही काही दिवसात टाळे लागणार आहे. आणि आज या चर्चेदरम्यान, मी देशातील जनतेला या अहंकारी आघाडीच्या आर्थिक धोरणाबाबत अत्यंत गांभीर्याने सावध करू इच्छितो. या देशातील या अहंकारी आघाडीला अशी अर्थव्यवस्था हवी आहे, ज्यामुळे देश कमकुवत होईल आणि तो सामर्थ्यवान बनू शकणार नाही. आपण आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये पाहतो आहोत, जी आर्थिक धोरणे घेऊन काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना पुढे जायचे आहे, ज्याप्रकारे तिजोरीतील पैसा लुटून मते मिळवण्याचा खेळ ते खेळत आहेत, आपल्या आजूबाजूच्या देशांची परिस्थिती पहा. जगातील त्या देशांची स्थिती पहा. आणि मी देशाला सांगू इच्छितो की, ते सुधारतील अशी मला अजिबात अपेक्षा नाही,जनताच त्यांना सुधारेल.
आदरणीय अध्यक्ष महोदय ,
अशा गोष्टींचे दुष्परिणाम आपल्या देशावर तसेच आपल्या राज्यांवरही होत आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी दिलेल्या पोकळ आश्वासनांमुळे या राज्यांमध्ये जनतेवर नवनवीन दंड आकारले जात आहेत. नव-नवीन बोजा टाकला जात आहे आणि विकास प्रकल्प बंद करण्याच्या घोषणा दिल्या जात आहेत, पद्धतशीरपणे घोषणा केल्या जात आहेत.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
या अहंकारी आघाडीच्या आर्थिक धोरणांचे परिणाम मला स्पष्टपणे दिसत आहेत. आणि म्हणूनच मी देशवासियांना सावध करू इच्छितो, देशवासियांना हे सत्य समजावून सांगू इच्छितो. हे लोक, ही अहंकारी आघाडी भारत दिवाळखोर होण्याची हमी आहेत, भारताच्या दिवाळखोरीची हमी आहे. ही अर्थव्यवस्था बुडवण्याची हमी आहे, ही दोन अंकी महागाई दराची हमी आहे, ही धोरण लकव्याची हमी आहे, ही अस्थिरतेची हमी आहे.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
ही भ्रष्टाचाराची हमी आहे ही तुष्टीकरणाची हमी आहे, ही कुटुंबवादाची हमी आहे , ही मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीची हमी आहे, ही मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीची हमी आहे. ही दहशत आणि हिंसाचाराची हमी आहे, ही भारताला दोन शतके मागे नेण्याची हमी आहे.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
ते कधीही भारताला अव्वल 3 अर्थव्यवस्थेमध्ये स्थान मिळवून देऊ शकत नाहीत. हा मोदी देशाला हमी देत आहे की माझ्या तिसऱ्या कार्यकाळात मी भारताला अव्वल 3 अर्थव्यवस्थेमध्ये स्थान मिळवून देईन. हीच माझी देशाला हमी आहे. ते कधीही देशाला विकसित बनवण्याचा विचारही करू शकत नाहीत , त्या दिशेने हे लोक काहीही करू शकत नाहीत.
प्रिय मित्रहो,
आदरणीय अध्यक्ष महोदय,
ज्यांचा आदरणीय लोकशाहीवर विश्वास नाही, ते ऐकायला तयार असतात , मात्र ऐकण्याचे धैर्य त्यांच्यात नसते. वाईट बोलणे, पळणे, कचरा फेकून पळून जाणे पळणे, खोटे बोलणे, पळणे, हा ज्यांचा खेळ आहे. त्यांच्याकडून या देशाला अधिक अपेक्षा करता येणार नाहीत. जर त्यांनी गृहमंत्र्यांच्या मणिपूरच्या चर्चेला संमती दर्शवली असती, तर एकट्या मणिपूरवर सविस्तर चर्चा होऊ शकली असती. प्रत्येक पैलूवर चर्चा होऊ शकली असती. आणि त्यांनाही खूप काही सांगायची संधी मिळू शकली असती. मात्र त्यांना चर्चेत रस नव्हता आणि काल अमित भाईंनी हा विषय सविस्तरपणे मांडला तेव्हा देशालाही आश्चर्य वाटले की हे लोक इतके खोटे बोलू शकतात. हे लोक अशी अशी पापे करून गेले आहेत आणि आज जेव्हा त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणला आणि अविश्वासाच्या मुद्द्यावर , सर्व विषयावर बोलले, तेव्हा पहिल्या रांगेत बसणाऱ्यांवर देखील देशाचा विश्वास प्रकट करण्याची, देशाच्या विश्वासाला नवे बळ देण्याची जबाबदारी असते, ज्यांचा देशावर विश्वास नाही, त्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी आमची आहे . केवळ मणिपूरवर चर्चा करण्यासाठी या असे आम्ही म्हटले होते, गृहमंत्र्यांनी पत्र देखील लिहिले होते. हा त्यांच्या विभागाशी संबंधित विषय होता. मात्र हिंमत नव्हती, हेतू नव्हता आणि पोटात पाप होतं, पोटात दुखत होतं आणि डोके फोड करत होते , त्याचा हा परिणाम होता. मणिपूरमधील परिस्थितीबाबत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी काल दोन तास तपशीलवारपणे आणि राजकारण न करता मोठ्या संयमाने संपूर्ण विषय समजावला , सरकारची आणि देशाची चिंता व्यक्त केली आणि त्यामध्ये देशात जनजागृती करण्याचाही प्रयत्न होता.त्यात संपूर्ण सभागृहाच्या वतीने मणिपूरला एक विश्वासाचा संदेश देण्याचा हेतू होता. त्यात सर्वसामान्यांचे प्रबोधन करण्याचाही प्रयत्न होता. देशाच्या भल्यासाठी आणि मणिपूरच्या समस्येवर मार्ग काढण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न होता. शिवाय राजकारणाशिवाय काही करायचे नाही, म्हणूनच त्यांनी हे खेळ खेळले.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
तसे तर काल अमित भाईंनी सगळ्या गोष्टी तपशीलवार सांगितल्या आहेत. मणिपुरमध्ये न्यायालयाचा एक निर्णय आला. आता न्यायालयांमध्ये काय होत असते ते आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. आणि त्याच्या बाजूने किंवा विरोधी बाजूने जी स्थिती निर्माण झाली, हिंसेला सुरुवात झाली आणि त्यामध्ये अनेक कुटुंबांना अवघड परिस्थितीचा सामना करावा लागला. अनेकांनी आपली जवळची माणसे सुद्धा गमावली. महिलांच्या बाबतीत गंभीर गुन्हा घडला आणि हा गुन्हा अक्षम्य आहे, यातील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्रितपणे भरपूर प्रयत्न करत आहेत. मी देशातील नागरिकांना असे आश्वासन देऊ इच्छितो की ज्या पद्धतीने हे प्रयत्न सुरु आहेत त्यामुळे नजीकच्या भविष्यकाळात नक्कीच या भागात शांतीचा उदय होईल. मणिपुरमधील जनतेला मी हे आग्रहपूर्वक सांगू इच्छितो, तेथील माता-भगिनी आणि सुकन्यांना सांगू इच्छितो की हा देश तुमच्या सोबत आहे, हे सभागृह तुमच्या सोबत आहे. कोणी आपल्यासोबत असो वा नसो, आपण सर्वजण मिळून या समस्येवर उपाय शोधू आणि तेथे पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित करू. मी मणिपूरच्या लोकांना असा शब्द देतो की मणिपूर राज्य पुन्हा एकदा विकासाच्या मार्गावर जलदगतीने पुढे जावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
इथे सभागृहात भारतमातेबद्दल जे बोलले गेले त्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या भावना दुखावल्या आहेत. अध्यक्ष महोदय, मला काय झाले माहित नाही. सत्ता नसेल तर एखाद्याची स्थिती अशी होते का? सत्तेचे सुख नसेल तर जगणे कठीण होते का? आणि इथे कुठल्या प्रकारची भाषा बोलली जात आहे?
आदरणीय अध्यक्ष महोदय,
काही लोक भारतमातेच्या मृत्यूची इच्छा का करत आहेत काही कळत नाही. यापेक्षा मोठे दुर्भाग्य काय असू शकेल? हे तेच लोक आहेत जे कधी लोकशाहीची हत्या झाली असे म्हणतात तर कधी संविधानाची हत्या झाली असे म्हणतात. खरेतर, त्यांच्या मनात जे आहे तेच त्यांच्या कृतीतून दिसून येत असते. मला याचे फार आश्चर्य वाटते. आणि हे बोलणारे लोक आहेत तरी कोण? हा देश विसरला आहे की काय! 14 ऑगस्टला येणारा फाळणी वेदना स्मृती दिन, हा दुःखदायक दिवस आजही त्या आरोळ्या, त्या वेदना घेऊन आपल्यासमोर उभा राहतो. हे तेच लोक आहे ज्यांनी भारतमातेचे तीन-तीन तुकडे केले. जेव्हा भारतमातेला गुलामीच्या बेड्यांतून मुक्त करायला हवे होते, तिचे साखळदंड तोडायला हवे होते तेव्हा या लोकांनी भारतमातेचे दोन्ही हात तोडून टाकले. यांनी भारतमातेचे तीन तुकडे केले आणि हे लोक कोणत्या तोंडाने असे बोलण्याची हिंमत करतात.
आदरणीय अध्यक्षजी,
ज्या वंदे मातरम गीताने देशासाठी प्राणत्याग करण्याची प्रेरणा दिली होती, हिंदुस्तानच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात वंदे मातरम् हा चैतन्याचा सूर बनला, लांगूलचालनाच्या राजकारणाच्या काळात या लोकांनी केवळ भारतमातेचेच तुकडे केले नाहीत तर या वंदे मातरम् गीताचे देखील तुकडे केले या लोकांनी. हे तेच लोक आहेत माननीय अध्यक्षजी, जे, भारता तुझे तुकडे होतील अशा घोषणा देणारे जे लोक आहेत, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पोहोचत असत. भारता तुझे तुकडे होतील.. याला प्रोत्साहन देणारे हे लोक त्या लोकांची मदत करत आहेत, जे म्हणतात की ईशान्य भारताला जोडणारा जो छोटा प्रदेश सिलीगुडीजवळ आहे तो जर कापून टाकला तर ईशान्य भाग पूर्णपणे वेगळा होईल. असली स्वप्ने बघणाऱ्या लोकांचे हे समर्थन करतात.
आदरणीय अध्यक्ष जी,
मी जरा यांना प्रश्न विचारू इच्छितो, जे माझ्या आजूबाजूला बसले आहेत त्यांनी उत्तर द्यावे, किंवा जे बाहेर गेले आहेत त्यांना जरा विचारा की कच्चातिवू काय आहे? कोणीतरी यांना विचारा की कच्चातिवू काय आहे? हे इतक्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतात, त्यांना आज मी सांगू इच्छितो की कच्चातिवू काय आहे? आणि हा कच्चातिवू कुठे आहे तेही विचारा यांना, जे मोठमोठ्या गोष्टी लिहून देशाला भरकटून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि या डीएमके वाल्यांचे काय करावे, यांच्या सरकारचे मुख्यमंत्री मला पत्र लिहितात, अजूनही लिहितात आणि सांगतात की मोदीजी, कच्चातिवू परत घेऊन या. हा कच्चातिवू काय आहे? कोणी केला? तामिळनाडूच्या पुढे श्रीलंकेच्या आधी असलेला एक प्रदेश कुठल्यातरी दुसऱ्या देशाला देऊन टाकला. तो कधी दिला होता, कुठे गेला, तेव्हा ही भारतमाता अस्तित्वात नव्हती का? हा प्रदेश तेव्हा भारतमातेचा भाग नव्हता का? आणि त्याला देखील तुम्ही तोडले. कोण होते त्यावेळी, श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली हे घडले. काँग्रेसचा इतिहास नेहमीच भारतमातेला छिन्नविछिन्न करून टाकणारा होता.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
आणि या काँग्रेसचे भारतमातेप्रती प्रेम कसे होते? भारतवासियांच्या प्रती यांना किती आपुलकी होती? अत्यंत दुःखी मनाने मी एक सत्य या सभागृहासमोर सांगू इच्छितो. ही वेदना ते समजू शकणार नाहीत. मी दवणगिरीच्या कानाकोपऱ्यात फिरलेला माणूस आहे आणि राजकारणात मला काहीच स्थान नव्हते तेव्हा देखील मी त्या भागात फिरुन पाय दमवले आहेत. त्या प्रदेशाशी माझ्या भावना जोडलेल्या आहेत, यांना त्याचा काही अंदाज नाही.
माननीय अध्यक्ष महोदय,
मी या सभागृहासमोर तीन घटना सांगू इच्छितो. आणि मोठ्या गर्वाने हे सांगू इच्छितो. देशवासीय देखील ऐकत आहेत. पहिली घटना आहे 5 मार्च 1966 ची, या दिवशी काँग्रेसने मिझोरमच्या असहाय्य लोकांवर हवाई दलाच्या माध्यमातून हल्ला केला. तेथे गंभीर स्वरूपाचा वाद निर्माण झाला. काँग्रेसने याचे उत्तर द्यावे, ते कोणत्या दुसऱ्याच देशाचे वायुदल होते का? मिझोरमचे लोक माझ्या देशातील लोक नव्हते का? त्यांचे संरक्षण करणे ही भारत सरकारची जबाबदारी नव्हती का? 5 मार्च 1966 ला वायुसेनेचा वापर करून निर्दोष नागरिकांवर हल्ला करण्यात आला.
आणि माननीय अध्यक्ष जी,
आजही मिझोरम मध्ये 5 मार्च रोजी संपूर्ण राज्यात शोक दिन पाळतात. या वेदना मिझोरम विसरू शकलेला नाही. या लोकांनी देखील कधी त्यावर मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला नाही, त्या जखमा भरण्यासाठी काहीच केले नाही. यांना त्याचे कधीच काही वाईट वाटले नाही. आणि मित्रांनो, काँग्रेसने हे सत्य देशापासून नेहमीच लपवून ठेवले. या लोकांनी हे सत्य देशापासून दडवून ठेवले आहे. स्वतःच्याच देशात वायुसेनेच्या सहाय्याने हल्ला करणे?? कोण होते सत्तेत त्यावेळी- इंदिरा गांधी. अकाल तख्तावर हल्ला झाला, तो तर अजूनही आमच्या आठवणीत आहे. यांना त्याआधी मिझोरममध्ये सवय लागली होती. आणि म्हणूनच माझ्याच देशात या लोकांची अकाल तख्तावर हल्ला करण्यापर्यंत मजल गेली. आणि येथे हे आम्हांला उपदेश करत आहेत.
आदरणीय अध्यक्ष जी,
ईशान्य भारतात तेथील जनतेच्या विश्वासाची हत्या या लोकांनी केली आहे. या जखमा या ना त्या समस्येच्या रुपात पुनःपुन्हा उफाळून येत असतात, हे त्यांचेच पराक्रम आहेत.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
मी दुसऱ्या घटनेचे वर्णन करु इच्छितो आणि ती घटना आहे 1962 सालची. त्यावेळचे ते भीतीदायक रेडीओ प्रसारण आजही ईशान्येतील लोकांना काट्यासारखे टोचते आहे. जेव्हा 1962 मध्ये आपल्या देशावर चीनने आक्रमण केले होते, देशाच्या प्रत्येक भागातील जनता स्वतःच्या संरक्षणासाठी देशाकडून अपेक्षा करत होती की त्यांना मदत मिळेल, त्यांच्या प्राणांचे, मालमत्तेचे रक्षण केले जाईल, देश वाचेल. लोक स्वतःच्या हातांनी लढाई लढण्यासाठी मैदानात उतरले होते. अशा बिकट प्रसंगी, दिल्लीच्या सत्तेत बसलेले आणि त्यावेळी असलेले एकमेव नेते पंडित नेहरू यांनी रेडीओवरुन काय सांगितले- त्यांनी म्हटले होते....माझ्या हृदयात आसामच्या जनतेबद्दल दुःख दाटते आहे. ते प्रसारण आजही आसामच्या लोकांच्या मनात काट्यासारखे टोचते आहे. त्यावेळी नेहरूंनी त्या लोकांना त्यांच्या नशिबाच्या भरोशावर जगायला वाऱ्यावर सोडून दिले. ते लोक आज आपल्याकडे याचा जाब विचारत आहेत.
आदरणीय अध्यक्ष जी,
लोहिया यांचे समर्थक येथून निघून गेलेत. मी देखील त्यांना काही गोष्टी ऐकवणार होतो. हे जे लोक स्वतःला लोहियाजींचे वारस म्हणवतात आणि जे काल या सभागृहात जोरजोरात बोलत होते, हातवारे करण्याचा प्रयत्न करत होते. लोहीयाजींनी नेहरुजींवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. आणि लोहीयाजी म्हणाले होते, त्यांनी आरोप केला होता की नेहरूजी मुद्दाम ईशान्य प्रदेशाचा विकास करत नाहीत, जाणूनबुजून तेथील विकास होऊ देत नाहीत. आणि लोहीयाजींचे हे शब्द होते- ही किती बेपर्वाईची आणि किती धोकादायक बाब आहे- हे लोहीयाजींचे शब्द होते- ही किती बेपर्वाईची आणि किती धोकादायक बाब आहे की 30 हजार चौरस मैलांहून मोठ्या क्षेत्राला एखाद्या शीतकपाटात बंद करून ठेवल्यासारखे सर्व प्रकारच्या विकासापासून वंचित ठेवण्यात आले आहे. लोहियाजींनी नेहरूंवर हा आरोप केला होता की, ईशान्य प्रदेशाप्रती तुमचा हा काय दृष्टीकोन आहे? त्यांनी असे म्हटले होते. ईशान्य भारतातील लोकांच्या हृदयाला, त्यांच्या भावनांना समजून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्नच केला नाहीत. माझ्या मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांनी 400 वेळा ईशान्य भारताच्या विविध भागात रात्रीचा मुक्काम केला आहे आणि तोही फक्त राज्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी नाही तर जिल्हा मुख्यालयात. मी स्वतः त्या प्रदेशात 50 वेळा जाऊन आलो आहे. ही केवळ आकडेवारी नाही तर ईशान्य भारताप्रती समर्पणभाव आहे.
आदरणीय महोदय,
काँग्रेसचे प्रत्येक काम राजकारण, निवडणुका आणि सरकारभोवती फिरते. जिथे जास्त जागा मिळतात, तिथे त्यांचे राजकारण शिजते, मग तिथे ते हतबलतेतून काहीतरी करतात. पण ईशान्येत....देश ऐकतोय, ईशान्य भारतात जिथे मोजक्याच जागा आहेत, जिथे मोठा भूभाग नव्हता. असे प्रदेश त्यांना स्वीकारार्ह नव्हते म्हणून त्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. देशातील नागरिकांच्या हिताचा त्यांना कोणताही कळवळा नव्हता.
माननीय अध्यक्ष,
आणि म्हणूनच ज्या ठिकाणी कमी जागा होत्या त्यांना सावत्र आईसारखी वागणूक देणे हे काँग्रेसच्या डीएनएमध्ये आहे.गेल्या अनेक वर्षांचा इतिहास पाहा. ईशान्येत त्यांची हीच वृत्ती होती. पण आता बघा, गेल्या ९ वर्षांच्या माझ्या प्रयत्नातून मी म्हणतो की, आमच्यासाठी ईशान्य भारत हा आमच्या हृदयाचा तुकडा आहे. आज मणिपूरच्या समस्या अशा मांडल्या जात आहेत की, जणू काही आत्ताच तिथे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. कालच अमित भाईंनी ही समस्या काय आहे आणि ही समस्या कशी आहे हे सविस्तरपणे सांगितले. पण आज मला खूप गंभीरपणे सांगायचे आहे की ईशान्येच्या या समस्यांची जर कोणी जन्मदात्री असेल तर ती फक्त काँग्रेसच आहे. याला ईशान्येतील लोक जबाबदार नसून काँग्रेसचे राजकारण जबाबदार आहे.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
भारतीय संस्कृतीत रमलेले मणिपूर, भक्तीचा समृद्ध वारसा असलेले मणिपूर, स्वातंत्र्य लढा आणि आझाद हिंद फौज साठी ज्यांनी असंख्य बलिदान दिले ते मणिपूर. काँग्रेस राजवटीत आमची एवढी महान भूमी विभक्तीच्या आगीत होरपळून निघाली. असे का?
आदरणीय अध्यक्ष महोदय,
मित्रांनो, मला तुम्हा सर्वांना आठवण करून द्यायची आहे, इथे सभागृहात असलेल्या ईशान्येतील माझ्या बांधवांना सर्व काही माहिती आहे. मणिपूरमध्ये एक काळ असा होता की, प्रत्येक यंत्रणा अतिरेकी संघटनांच्या इच्छेनुसार चालत असे. अतिरेकी जे सांगायचे तेच व्हायचे. त्या वेळी मणिपूरमध्ये सरकार कोणाचे होते? काँग्रेसचे. कोणाचे सरकार होते - काँग्रेसचे. सरकारी कार्यालयात महात्मा गांधींचा फोटो लावण्याची परवानगी नव्हती तेव्हा सरकार कोणाचे होते? काँग्रेसचे. मोरांग येथील आझाद हिंद फौज संग्रहालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा फोडण्यात आला तेव्हा मणिपूरमध्ये कोणाचे सरकार होते? काँग्रेसचे. तेव्हा मणिपूरमध्ये कोणाचे सरकार होते? काँग्रेसचे.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
मणिपूरमधील शाळांमध्ये राष्ट्रगीत वाजवण्यास परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा मणिपूरमध्ये कोणाचे सरकार होते? काँग्रेसचे. ग्रंथालयात ठेवलेली पुस्तके जाळण्याची मोहीम राबवून या देशाचा अमूल्य ज्ञानाचा वारसा जळत असताना कोणाचे सरकार होते? काँग्रेसचे. मणिपूरमध्ये जेव्हा दुपारी ४ वाजता मंदिराची घंटा वाजवणे बंद केले जायचे, मंदिरांना कुलूप होते, पूजा करणे अवघड झाले होते, लष्कराला पहारा द्यावा लागत असे, तेव्हा मणिपूरमध्ये कोणाचे सरकार होते? काँग्रेसचे.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
इम्फाळमधील इस्कॉन मंदिरात बॉम्ब फेकून भाविक मारले गेले तेव्हा मणिपूरमध्ये कोणाचे सरकार होते? काँग्रेसचे. जेव्हा अधिकाऱ्यांना बघा हं, परिस्थिती बघा आयएएस, आयपीएस अधिकारी, त्यांना जर मणिपूरमध्ये काम करायचे असेल तर त्यांना त्यांच्या पगाराचा काही भाग या अतिरेकी लोकांना द्यावा लागायचा. मगच ते तिथं राहू शकले, तेव्हा कोणाचे सरकार होते? काँग्रेसचे.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
त्यांची वेदना निवडक असते, त्यांची संवेदनशीलता निवडक असते. त्यांचे कार्यक्षेत्र राजकारणापासून सुरू होते आणि राजकारणामुळेच ते पुढे जाते. जो राजकारणाच्या कक्षेतच असतो, तो ना मानवतेचा विचार करू शकतो, ना देशासाठी विचार करू शकतो, ना देशाच्या या अडचणींचा विचार करू शकतो. त्यांना राजकारणाशिवाय काहीच कळत नाही.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
मणिपूरमध्ये गेली सहा वर्षे जे सरकार आहे ते या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी समर्पित भावनेने आणि सातत्यपूर्ण काम करत आहे. मणिपूरमध्ये सतत संचारबंदी आणि नाकेबंदी असायची.
हा संचारबंदीचा आणि नाकाबंदीचा काळ कोणीही विसरू शकत नाही. आज ती भूतकाळाची गोष्ट झाली आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत आणि भविष्यातही सुरूच राहतील. यापासून आपण जितके राजकारण दूर ठेवू तितकी शांतता जवळ येईल. याबाबत मी देशवासीयांना आश्वस्त करू इच्छितो.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
ईशान्य प्रदेश आज ही आपल्याला दूरचे वाटू शकतात, परंतु ज्या प्रकारे दक्षिण-पूर्व आशिया विकसित होत आहे, ज्या प्रकारे आसियान देशांचे महत्त्व वाढत आहे, तो दिवस दूर नाही, पूर्वेकडील प्रगतीबरोबरच ईशान्य भारत ही विकसित होणार आहे आणि जागतिक दृष्टिकोनातून केंद्रबिंदू असणार आहे.आणि मला हे दिसतंय आणि म्हणूनच मी आज मतांसाठी नव्हे तर ईशान्येच्या प्रगतीसाठी माझ्या सर्व शक्तीनिशी प्रयत्न करत आहे. मला माहीत आहे की जगाची वळण घेणारी नवी रचना दक्षिण-पूर्व आशिया आणि आसियान देशांवर कसा प्रभाव निर्माण करणार आहे आणि ईशान्येचे महत्त्व कसे वाढणार आहे आणि ईशान्येचे वैभवाचे दिवस पुन्हा येणार आहेत. हे घडणार आहे हे मी पाहू शकतो आणि म्हणूनच मी यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
म्हणूनच आमच्या सरकारने ईशान्य भारताच्या विकासाला प्रथम प्राधान्य दिले आहे. गेल्या नऊ वर्षांत आपण ईशान्येकडील पायाभूत सुविधांवर लाखो कोटी रुपये खर्च केले आहेत. आज आधुनिक महामार्ग, आधुनिक रेल्वे, आधुनिक नवे विमानतळ ईशान्ये भारताची ओळख बनत आहेत. आज प्रथमच आगरतळा रेल्वे वाहतुकीच्या माध्यमातून जोडले गेले आहे. एखादी मालगाडी पहिल्यांदाच मणिपूरला पोहोचली आहे. प्रथमच वंदे भारत सारखी आधुनिक रेल्वे ईशान्य भारतात धावली आहे. अरुणाचल प्रदेशात प्रथमच ग्रीन फील्ड विमानतळ उभारण्यात आले आहे. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमसारख्या राज्यांमध्ये पहिल्यांदाच हवाई संपर्क आहे. प्रथमच, ईशान्य भारत जलमार्गाद्वारे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रवेशद्वार बनले आहे. प्रथमच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच AIIMS सारखी वैद्यकीय संस्था ईशान्य भारतात सुरू झाली आहे. मणिपूरमध्ये पहिल्यांदाच देशातील पहिले क्रीडा विद्यापीठ सुरू होत आहे. भारतीय जनसंवाद संस्था सारख्या संस्था पहिल्यांदाच मिझोराममध्ये उघडत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात प्रथमच ईशान्य भारताचा सहभाग एवढा वाढला आहे. नागालँडमधून पहिल्यांदाच एक महिला खासदार राज्यसभेत पोहोचली आहे. प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने ईशान्येकडील लोकांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनात प्रथमच ईशान्येकडील लचित बोरफुकन सारख्या नायकाचे संचलन समाविष्ट करण्यात आले आहे. मणिपूरमध्ये प्रथमच, ईशान्येची राणी गाइदिन्ल्यू यांच्या नावाने पहिले आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय तयार झाले आहे.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
जेव्हा आपण सबका साथ, सबका विकास म्हणतो तेव्हा ती आपल्यासाठी घोषणा नसते, ते फक्त शब्द नाहीत, तर तो आमच्यासाठी विश्वासाचा लेख आहे. आमच्यासाठी ती बांधिलकी आहे आणि आम्ही देशसेवेसाठी बाहेर पडलेले लोक आहोत. कधीतरी अशा ठिकाणी येऊन बसण्याचं सौभाग्य मिळेल असा विचार आम्ही आयुष्यात कधी केला नव्हता. पण ही देशातील जनतेची कृपा आहे की त्यांनी आम्हाला संधी दिली, म्हणून मी देशातील जनतेला आश्वासन देतो –
शरीराचा कण कण,काळाचा प्रत्येक क्षण फक्त आणि फक्त देशवासियांसाठी आहे.
अध्यक्ष महोदय,
मी आपल्या विरोधी पक्षातल्या सहकाऱ्यांची एका गोष्टीसाठी आज कौतुक करू इच्छितो आहे. याचे कारण तसे ते सदनाच्या नेत्याला नेता मानण्यास तयार नाहीत.
माझ्या कोणत्याही भाषणाला त्यांनी पूर्ण होऊ दिले नाही परंतु माझ्यामध्ये धैर्य पण आहे, सहनशक्ती पण आहे आणि मी ते सहन पण करतो आणि ते थकून पण जातात.
परंतु एका गोष्टीसाठी मी त्यांचे कौतुक करतो आहे, सदनाचा नेता या नात्याने मी 2018 मध्ये त्यांना काम दिले होते की 2023 मध्ये तुम्ही अविश्वास ठराव घेऊन यावे आणि माझी ही गोष्ट त्यांनी मान्यही केली.
परंतु मला या गोष्टीचे दुःख आहे की, 18 नंतर 23 मध्ये पाच वर्षे मिळाली, थोडं चांगलं, थोडी चांगली तयारी केली असती. पण, याची तयारी त्यांनी बिलकुल केली नाही.
कोणतेही संशोधन नव्हते, कोणतेही नवे पण नव्हते, ना चर्चेसाठी ते कोणते मुद्दे शोधू शकत होते, माहित नाही या देशाला त्यांनी खूप निराश केलेले आहे अध्यक्ष महोदय,
चला असू द्या काही हरकत नाही 2028 मध्ये आम्ही पुन्हा त्यांना संधी देऊ.
परंतु मी यावेळेस त्यांना आग्रह करत आहे की, जेव्हा 2028 मध्ये आपण अविश्वास प्रस्ताव घेऊन याल आमच्या सरकार विरोधात थोडी तयारी करून यावी. काही मुद्दे शोधून यावेत, असे काय तेच तेच मुद्दे घेऊन फिरत असता आणि देशाच्या जनतेला एवढा विश्वास तरी द्यायला हवा की चला आपण विरोधी पक्षासाठी योग्यतेचे आहोत. एवढे तरी करा. तुम्ही ती योग्यता सुद्धा धुळीस मिळवली आहे.
मी आशा करतो की ते थोडा गृहपाठ करतील. तू तू ,मी मी, नेहमी ओरडणे, आरडणे आणि घोषणाबाजी करण्यासाठी तर दहा लोक सुद्धा मिळू शकतील परंतु थोडं डोकं लावण्याचं काम तरी करा ना.
अध्यक्ष महोदय,
राजकारण आपल्या जागेवर आहे, संसद ही काही, राजकीय पक्षांसाठी व्यासपीठ नाही. संसद देशासाठी सन्मानाचे सर्वोच्च संस्था आहे. आणि यासाठीच संसदेच्या सदस्यांना देखील याबाबतीत अधिक गंभीर होणे गरजेचे आहे. देश यासाठी मोठी गुंतवणूक करत आहे. देशातल्या गरिबांच्या हक्काचा इथे खर्च केला जातो. येथील प्रत्येक क्षणाचा उपयोग देशाच्या कल्याणासाठी झाला पाहिजे. परंतु हे गांभीर्य विरोधी पक्षाकडे दिसून येत नाही. यासाठी अध्यक्ष महोदय, राजकारण अशाप्रकारे तर होऊ शकत नाही. चला वेळ आहे म्हणून संसदेचा फेरफटका मारूयात, यासाठी संसद आहे का? ही कामाची पद्धती असते का?
अध्यक्ष महोदय,
की चला संसदेचा फेरफटका मारूया या भावनेतून राजकारण तर चालू शकते, देश नाही चालू शकत. इथे देश चालवण्यासाठी आम्हाला काम देण्यात आले आहे आणि यासाठी ते जर आपली जबाबदारी पार पाडू शकत नसतील तर ते जनता जनार्दन आपल्या मतदात्यांचा विश्वासघात करत आहेत आणि त्यांनी विश्वासघात केलेला आहे.
अध्यक्ष महोदय,
माझा या देशातल्या जनतेवर अतूट विश्वास आहे, खूप खूप विश्वास आहे आणि मी अध्यक्ष महोदय, विश्वासाने म्हणतो आहे की, आपल्या देशातले लोक एकाप्रकारे प्रचंड विश्वास बाळगणारे लोक आहेत. हजारो वर्षांच्या गुलामगिरीच्या काळात सुद्धा या लोकांनी आपल्या आतल्या विश्वासाला तडा जाऊ दिलेला नव्हता. हा प्रचंड विश्वासाने भरलेला समाज आहे, प्रचंड चैतन्याने भरलेला हा समाज आहे. हा ध्येयासाठी समर्पणाची परंपरा घेऊन चालणारा समाज आहे. वयम् राष्ट्रांग भूता असे म्हणत देशासाठी आपली संवेदना बरोबर घेऊन चालणारा हा समाज आहे आणि यासाठीच अध्यक्ष महोदय,
हे ठीक आहे गुलामगिरीच्या काळखंडात आमच्यावर खूप आघात झाले, खूप काही सोसावं लागलं आम्हाला, परंतु आमच्या देशातल्या वीरांनी, देशातल्या महापुरुषांनी, आमच्या देशासाठी काळजी करणाऱ्यांनी, आमच्या देशातल्या सामान्य नागरिकांमधल्या विश्वासाच्या त्या ज्योतीला कधीही विझू दिले नाही. कधीही ती ज्योत विझलेली नाही आणि जेव्हा ती ज्योत कधी विझलेलीच नाही तेव्हा तर प्रकाशाच्या छायेत आपण तो आनंद घेऊ शकत आहोत.
अध्यक्ष महोदय,
मागच्या नऊ वर्षांमध्ये सामान्य माणसाचा विश्वास नव्या उंचीवर पोहचलेला आहे, नव्या अशा आकांक्षांना साद घालत आहे. माझ्या देशातले तरुण जगाची बरोबरी करण्याचे स्वप्न बघत आहेत आणि यापेक्षा आणखी मोठे भाग्य काय असू शकते की, प्रत्येक भारतीय विश्वासाने भरून गेलेला आहे.
अध्यक्ष महोदय,
आजचा भारत ना दबावाखाली येतो आहे, नाही दबावाला जुमानतो आहे. आजचा भारत नमतही नाही, आजचा भारत थकतही नाही, आजचा भारत थांबत ही नाही. समृद्ध वारशाचा विश्वास ठेवून, ध्येय घेऊन चालले आणि हेच कारण आहे जेव्हा देशाचा सामान्य माणूस देशावर विश्वास करू लागतो तेव्हा जगाला सुद्धा हिंदुस्थानावर विश्वास ठेवण्यासाठी प्रेरणा देत राहतो. आज जेव्हा जगाचा विश्वास भारताप्रति वाढत आहे याचे एक कारण भारतातल्या लोकांचा स्वतःवरचा विश्वास वाढलेला आहे. हेच सामर्थ्य आहे, कृपा करून या विश्वासाला तोडण्याचा प्रयत्न करू नका. संधी आलेली आहे देशाला पुढे घेऊन जाण्याची, समजू शकत नसाल तर कृपया शांत राहा. वाट बघा परंतु देशाच्या विश्वासाला विश्वासघात करून तोडण्याचा प्रयत्न करू नका.
अध्यक्ष महोदय,
मागच्या काही वर्षांमध्ये विकसित भारताची मजबूत पायाभरणी करण्यात आपण यशस्वी झालो आहोत आणि हे स्वप्न बघत आहोत की 2047 मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरा करत असेल, स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्याबरोबरच अमृत काळ सुरू झालेला आहे. या अमृत काळाच्या सुरवातीच्या वर्षामध्ये असताना मी या विश्वासाच्या जोरावर बोलतो आहे की जी पायाभरणी आज विकासाच्या दिशेने केली जात आहे, त्या पायाभरणीची ताकद आहे की 2047 मध्ये हिंदुस्तान एक विकसित हिंदुस्थान असेल, भारत विकसित भारत झालेला असेल मित्रांनो. आणि हे सर्व काही देशवासीयांच्या परिश्रमातून होणार आहे, देशवासीयांच्या विश्वासातून होणार आहे, देशवासीयांच्या ध्येयातून होणार आहे, देशवासीयांच्या सामूहिक शक्तीमधून होणार आहे, देशवासीयांच्या अखंड पुरुषार्थाने होणार आहे, हा माझा विश्वास आहे.
अध्यक्ष महोदय,
हे होऊ शकतं इथे जे बोललं जातं ते रेकॉर्ड होत असेल त्यासाठी हे केवळ शब्द असतील परंतु इतिहास आपल्या कर्माला बघणार आहे, ज्या कार्यामधून एक समृद्ध भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी एक मजबूत पायाभरणी करण्याचा हा कालखंड आहे, त्या रूपामध्ये त्याकडे पाहिले जावे. याच विश्वासाच्या बरोबरीने अध्यक्ष महोदय, आज सदनाच्या समोर मी काही गोष्टी स्पष्ट करण्यासाठी आलो होतो आणि मी आपल्या मनावर संयम ठेवून त्यांच्या प्रत्येक टीकेला हसत, आपल्या मनाला विचलित न होऊ देता 140 कोटी देशवासीयांना समोर ठेवून, त्यांची स्वप्ने आणि ध्येय आपल्या नजरेसमोर ठेवून मी चालतो आहे. माझ्या मनात सुद्धा हेच आहे आणि मी या सदनातल्या सहकाऱ्यांना आग्रह करतो की आपण वेळेचे भान ठेवावे. एकत्र मिळून चालुयात. या देशात मणिपूरमधून गंभीर समस्या याआधी आलेली आहे परंतु आपण सर्वांनी एकत्र येऊन त्यावर तोडगा शोधलेला आहे, या एकत्र येऊन चालूयात, मणिपूरच्या लोकांना विश्वास देऊयात, राजकारण करण्यासाठी मणिपूरच्या समस्येचा कमीत कमी वापर तरी करून घेऊ नका, तिथे जे झाले आहे ते दुःखददायक आहे परंतु त्या दुःखाला समजून घेऊन त्या दुःखावर औषध बनून काम केले पाहिजे हेच आपले ध्येय असले पाहिजे.
अध्यक्ष महोदय,
या चर्चेमध्ये खूप समृद्ध चर्चा आमच्या बाजूने तरी झालेली आहे, एक एक दीड दीड तास विस्ताराने सरकारच्या कामाचा हिशोब देण्याची आम्हाला संधी मिळालेली आहे आणि मी ही हा प्रस्ताव जर आला नसता तर आम्हाला एवढं काही बोलण्याची संधी मिळाली नसती. पुन्हा एकदा हा प्रस्ताव आणलेल्या लोकांचे मी आभार मानतो, परंतु हा प्रस्ताव देशाच्या विश्वासघाताचा प्रस्ताव आहे, हा देशातली जनतेने अस्वीकार करावा असा हा प्रस्ताव आहे आणि याबरोबरच मी पुन्हा एकदा अध्यक्ष महोदय, आपले हृदयापासून आभार व्यक्त करतो आणि मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो खूप खूप धन्यवाद.
***
NM/JPS/SRT/Nilima/Shailesh P/Vasanti/Suvarna/Vinayak/Sushama/Sanjana/Gajendra/Vikas/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1949333)
Visitor Counter : 562
Read this release in:
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia