पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 12 ऑगस्ट रोजी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर
संत शिरोमणी गुरुदेव श्री रविदास जी स्मारक स्थळावर पंतप्रधान करणार भूमिपूजन
पंतप्रधानांच्या हस्ते 100 कोटी रुपयांहून अधिक खर्चातून बांधण्यात येणाऱ्या संत शिरोमणी गुरुदेव श्री रविदासजी स्मारकाची होणार पायाभरणी
पंतप्रधान करणार 1580 कोटींहून अधिक खर्चाच्या दोन रस्ते प्रकल्पांची पायाभरणी
दुहेरीकरण केलेला 2475 कोटी रुपयांहून अधिक खर्चातून विकसित कोटा-बिना रेल्वे मार्ग पंतप्रधान करणार राष्ट्राला समर्पित
प्रविष्टि तिथि:
10 AUG 2023 7:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑगस्ट, 2023 रोजी मध्य प्रदेशचा दौरा करणार आहेत. ते दुपारी 2:15 वाजता, सागर जिल्ह्यात पोहोचतील. तिथे ते संत शिरोमणी गुरुदेव श्री रविदास जी स्मारक स्थळी भूमिपूजन करतील. पंतप्रधान दुपारी 3:15 च्या सुमारास ढाना येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. तिथे ते संत शिरोमणी गुरुदेव श्री रविदास जी स्मारकाची पायाभरणी करतील.
महान संत आणि समाजसुधारकांचा सन्मान करणे हे पंतप्रधानांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे. याच दृष्टीकोनाला अनुसरून संत शिरोमणी गुरुदेव श्री रविदास जी यांचे स्मारक 11.25 एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर आणि 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून आकाराला येणार आहे. या भव्य स्मारकामध्ये संत शिरोमणी गुरुदेव श्री रविदास जी यांचे जीवन, तत्वज्ञान आणि शिकवण यांचे दर्शन घडवणारे एक प्रभावी कला संग्रहालय आणि दालन असेल. स्मारकाला भेट देणाऱ्या भाविकांसाठी यात भक्त निवास, भोजनालय आदी सुविधा असतील.
पंतप्रधान कार्यक्रमादरम्यान, 4000 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे रेल्वे आणि रस्ते क्षेत्रातील प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील आणि पायाभरणी करतील.
कोटा-बिना रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले असून हा प्रकल्प पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील. हा प्रकल्प अंदाजे 2475 कोटींहून अधिक खर्चातून उभारला आहे. हा राजस्थानमधील कोटा आणि बारन आणि मध्य प्रदेशातील गुना, अशोकनगर आणि सागर जिल्ह्यातून जातो. अतिरिक्त रेल्वे मार्गामुळे चांगल्या वाहतुकीची क्षमता वाढेल आणि मार्गावरील रेल्वेगाड्यांचा वेग सुधारण्यासही मदत होईल.
पंतप्रधान, 1580 कोटींहून अधिक खर्चाच्या दोन रस्ते प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. यामध्ये मोरीकोरी - विदिशा - हिनोतिया यांना जोडणारा चौपदरी रस्ता प्रकल्प आणि हिनोतिया ते मेहलुवा यांना जोडणारा रस्ता प्रकल्प यांचा समावेश आहे.
N.Chitale/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1947577)
आगंतुक पटल : 135
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam