आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) प्रतिबंधक वार्षिक राष्ट्रव्यापी व्यापक औषध सेवन (एमडीए) उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचे केले उद्‌घाटन


जागतिक लक्ष्यापेक्षा तीन वर्षे आधी म्हणजे 2027 पर्यंत हत्तीपाय या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी भारत कटिबद्ध: डॉ. मनसुख मांडविया

Posted On: 10 AUG 2023 6:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2023

"मिशन मोड, बहु भागीदार , बहु क्षेत्र लक्ष्यित मोहिमेद्वारे जागतिक लक्ष्यापेक्षा तीन वर्षे आधी म्हणजेच 2027 पर्यंत हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे." असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी सांगितले. डॉ मनसुख मांडविया यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे वार्षिक राष्ट्रव्यापी व्यापक  औषध सेवन (एमडीए) उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन झाले, या कार्यक्रमात ते बोलत होते. उद्घाटनप्रसंगी आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रो. एस. पी. सिंह बघेल  हे देखील उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, जन भागीदारी, ‘ सरकारचा संपूर्ण सहभाग' आणि ‘संपूर्ण समाजाचा सक्रिय सहभाग’ या दृष्टिकोनाद्वारे आपण हा आजार देशातून नष्ट करू शकू. असा विश्वास डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला. 10 ऑगस्ट 2023 पासून सुरू होणारा या उपक्रमाचा दुसरा टप्पा या आजाराचा प्रादुर्भाव जास्त असणाऱ्या 9 राज्यांमधील (आसाम, बिहार, छत्तीसगड, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, ओदिशा, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश) 81 जिल्ह्यात राबवला जाणार आहे.

"हा आजार आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केवळ औषधे घेण्यापुरते मर्यादित नसावेत, तर डासांच्या माध्यमातून याचा प्रसार  रोखण्यासाठीही पावले उचलली पाहिजेत, यावर डॉ. मांडविया यांनी यावर भर दिला. त्याशिवाय आपले ध्येय साध्य करण्याच्या मार्गावरील प्रगती खुपच मर्यादित राहील." असेही ते म्हणाले.

आरोग्य संपन्न  राष्ट्र सुनिश्चित करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमधील समन्वय वाढवण्यावरही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी भर दिला.

याप्रसंगी डॉ. मांडविया यांनी डेंग्यू ताप 2023 आणि चिकुनगुनिया तापाच्या चिकित्सा  व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.

 

 N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1947548) Visitor Counter : 184