पोलाद मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मॉयल लिमिटेडने जुलै 2023 मध्ये केले विक्रमी उत्पादन आणि विक्रीमध्ये गाठली नवी उंची

Posted On: 03 AUG 2023 2:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2023

भारतातील मॅंगनीज धातूची सर्वात मोठी उत्पादक कंपनी, मॉयल (MOIL) लिमिटेडने जुलै महिन्यात स्थापनेपासून आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. कंपनीने गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 71% ची उल्लेखनीय वाढ नोंदवत जुलै 2023 मध्ये 1.20 लाख टन मॅंगनीज धातूचे उत्पादन केले आहे. मॉयलने आपल्या इतिहासात जुलै महिन्यात केलेले हे सर्वोच्च उत्पादन आहे.

मॉयल लिमिटेडने गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 69% ची प्रभावी वाढ नोंदवत जुलै 2023 मध्ये 0.94 लाख टनांची आतापर्यंतची सर्वोत्तम विक्री केली आहे. कंपनीच्या विक्रीचे आकडे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मॅंगनीज धातूची मजबूत मागणी दर्शवतात.

S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1945379) Visitor Counter : 141