पंतप्रधान कार्यालय

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पंतप्रधानांची त्यांच्या निवासस्थानी घेतली भेट

Posted On: 22 JUL 2023 10:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 22 जुलै 2023


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांनी पंतप्रधानांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
सदर भेटीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले ट्विट सामायिक करत पंतप्रधान म्हणाले;

“महाराष्ट्राचे अष्टपैलू आणि मेहनती मुख्यमंत्री @mieknathshinde आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटणे अत्यंत आनंददायी होते. महाराष्ट्राची अधिकाधिक प्रगती व्हावी यासाठीची त्यांची तळमळ आणि त्यांच्या स्वभावातील नम्रपणा मनाला अत्यंत भावणारा आहे.”
 
 


***


Jaydevi PS/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1944918) Visitor Counter : 82