राष्ट्रपती कार्यालय
मलावी देशाच्या संसदीय शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट
Posted On:
31 JUL 2023 7:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 जुलै 2023
मलावी देशाच्या संसदीय शिष्टमंडळानं आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. मलावीच्या नॅशनल असेब्लीच्या स्पीकर कॅथरिन गोतानी हारा यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ भारताच्या दौऱ्यावर आले आहे.
भारत आणि मलावी यांच्यात दीर्घकाळापासून सौहार्दपूर्ण आणि मैत्रिपूर्ण संबंध असून दोन देशातील संबंध अधिक दृढ करण्याला मोठा वाव आहे असे राष्ट्रपतींनी शिष्टमंडळाचे स्वागत करताना सांगितले. लोकशाही मूल्ये आणि सामाजिक वैविध्य यावर भारत आणि मलावी यांचा सारखाच विश्वास असल्यामुळे हे दोन देश नैसर्गिक भागीदार आहेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
भारत हा मलावीचा सगळ्यात मोठा व्यापार आणि खाजगी गुंतवणूक भागीदारांपैकी एक राहिला आहे तसेच आरोग्य सेवांचा लाभ आणि शिक्षण घेण्यासाठी मलावीच्या नागरिकासाठी भारत हे पसंतीचे ठिकाण आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले. मलावी आणि भारताचा एक ठोस विकास भागीदारी कार्यक्रम असून मलावीत भारताने पायाभूत सुविधा, आरोग्य, जलसंपदा, क्षमता उभारणी आणि शिक्षण क्षेत्रातील विविध प्रकल्प कार्यान्वित केले आहेत, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
* * *
N.Chitale/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1944440)
Visitor Counter : 102