अर्थ मंत्रालय
आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा जून 2023 या महिन्यापर्यंतचा केंद्र सरकारच्या जमाखर्चाचा मासिक आढावा
Posted On:
31 JUL 2023 6:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 जुलै 2023
केंद्र सरकारच्या जून 2023 या महिन्यापर्यंतचा दरमहा जमा खर्च एकत्रित करण्यात आला असून त्यासंदर्भातील अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालातील ठळक मुद्दे खालील प्रमाणे आहेत:-
केंद्र सरकारला जून 2023 पर्यंत 5,99,291 कोटी रूपये (वर्ष 2023-24 च्या एकूण मिळकतीच्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 22.1%) प्राप्त झाले आहेत. यामध्ये करापोटी मिळालेला महसूल (नेट टू सेंटर) 4,33,620 कोटी रूपये, कराव्यतिरिक्तच्या महसूलापोटी मिळालेले 1,54,968 कोटी रूपये आणि कर्जाव्यतिरिक्तची भांडवली मिळकत म्हणून मिळालेले 10,703 कोटी रूपये यांचा समावेश आहे. या कर्जाव्यतिरिक्तच्या भांडवली मिळकतीपैकी 6,468 कोटी रूपये कर्जाच्या वसुलीतून मिळाले आहेत तर 4,235 कोटीं रुपयांची विविध भांडवली मिळकत झाली आहे. केंद्र सरकारने करातील वाट्याचे हस्तांतरण म्हणून राज्य सरकारांना आतापर्यंत, 2,36,560 कोटी रूपये दिले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षीची ही रक्कम 93,785 कोटी रूपयांनी जास्त आहे.
केंद्र सरकारचा एकूण व्यय 10,50,661 कोटी रूपये (वर्ष 23-24 च्या एकूण मिळकतीच्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 23.3%) आहे. त्यापैकी महसूल खात्यातून झालेला खर्च 7,72,181 कोटी रूपये आणि भांडवल खात्यातील खर्च 2,78,480 कोटी रुपये आहे. एकूण महसुली खर्चापैकी, व्याज देण्यापोटी 2,43,705 कोटी रूपये तर प्रमुख अनुदानांच्या माध्यमातून 87,035 कोटी रूपये खर्च झाले आहेत.
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1944420)
Visitor Counter : 124